'Operation Searchlight'चा तो भयानक इतिहास! बांगलादेशने पाकिस्तानला का सुनावलं? तारिक रहमान यांच्या विधानाने इस्लामाबादमध्ये खळबळ ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Bangladesh Genocide Day 25 March : इतिहासाच्या पानात काही तारखा अशा असतात ज्या विसरणे कोणत्याही राष्ट्राला अशक्य असते. बांगलादेशसाठी २५ मार्च हा असाच एक दिवस आहे ‘नरसंहार दिन’ (Genocide Day). १९७१ च्या याच दिवशी पाकिस्तानी लष्कराने मानवतेला काळिमा फासणारे ‘ऑपरेशन सर्चलाइट’ राबवले होते. आज, इतक्या वर्षांनंतर बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांनी या जखमा पुन्हा ताज्या केल्या असून, पाकिस्तानच्या क्रूरतेचा पाढा जगासमोर वाचला आहे. त्यांच्या या विधानामुळे दक्षिण आशियातील राजकारणात पुन्हा एकदा नवे वारे वाहू लागले आहेत.
२५ मार्च १९७१ ची ती मध्यरात्र बांगलादेशच्या (तत्कालीन पूर्व पाकिस्तान) इतिहासातील सर्वात भीषण रात्र ठरली. पाकिस्तानी सैन्याने लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी आणि स्वातंत्र्याचा आवाज दाबण्यासाठी ढाका शहरावर चहूकडून हल्ला चढवला. ढाका विद्यापीठाचे वसतिगृह असो, पिलखाना असो किंवा राजारबाग पोलीस लाईन; पाकिस्तानी सैनिकांनी विचारवंत, शिक्षक, पोलीस आणि निष्पाप नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. एकाच रात्रीत हजारो लोक मारले गेले. या क्रूरतेला पाकिस्तानने ‘ऑपरेशन सर्चलाइट’ असे गोंडस नाव दिले होते, पण प्रत्यक्षात तो एक संघटित नरसंहार होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: ‘आम्ही जिंकलो!’ तेहरानच्या आकाशात अमेरिकन विमानांची गर्जना; ट्रम्प यांना इराणकडून मिळाली ‘खास’ भेट
पंतप्रधान तारिक रहमान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर या दिवसाचे वर्णन “बांगलादेशच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणा आणि क्रूर दिवस” असे केले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, हे हत्याकांड पूर्वनियोजित होते. रहमान यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहताना सध्याच्या आणि भावी पिढीला या बलिदानाची आठवण करून दिली. विशेष म्हणजे, शेख हसीना यांच्या कार्यकाळात २०१७ मध्ये या दिवसाला अधिकृतपणे ‘नरसंहार दिन’ म्हणून मान्यता मिळाली होती, आणि आता तारिक रहमान यांनीही तोच वारसा पुढे नेत पाकिस्तानला आरसा दाखवला आहे.
March 25, 1971 is observed as Genocide Day. On the occasion of Genocide Day, 1 pay my deepest respect to all the martyrs. In the history of freedom-loving Bangladesh, 25 March 1971 remains one of the most disgraceful and brutal days. On that dark night, the Pakistani occupation… pic.twitter.com/ENyyvnz8Tw — Tarique Rahman (@trahmanbnp) March 24, 2026
credit – social media and Twitter
गेल्या काही महिन्यांपासून, विशेषतः मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारच्या काळात, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारत असल्याचे चित्र होते. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयला ढाकामध्ये मोकळे रान मिळत असल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू होती. मात्र, तारिक रहमान यांच्या या रोखठोक विधानामुळे पाकिस्तानच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे. तज्ज्ञांच्या मते, बांगलादेश आपला इतिहास आणि स्वातंत्र्य कधीही विसरणार नाही, हाच संदेश यातून दिला गेला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz: ‘आम्ही या नाटकात नाही’ इस्रायलचा ट्रम्पला घरचा आहेर; अमेरिकेच्या ’15 कलमी’ चक्रव्यूहात अडकणार इराण?
रहमान यांनी केवळ अत्याचारांचीच आठवण करून दिली नाही, तर चित्तगॉंगमधील ८ व्या ईस्ट बंगाल रेजिमेंटच्या शौर्याचाही उल्लेख केला. याच सैनिकांनी पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात बंड पुकारून सशस्त्र क्रांतीला सुरुवात केली होती. या ऐतिहासिक प्रतिकारामुळेच पाकिस्तानच्या योजना धुळीला मिळाल्या आणि नऊ महिन्यांच्या संघर्षानंतर १६ डिसेंबर १९७१ रोजी एका नवीन राष्ट्राचा ‘बांगलादेश’चा जन्म झाला.
Ans: २५ मार्च १९७१ रोजी पाकिस्तानी लष्कराने केलेल्या भीषण नरसंहाराच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस 'नरसंहार दिन' म्हणून पाळला जातो.
Ans: पूर्व पाकिस्तानमधील लोकशाही चळवळ आणि स्वातंत्र्य लढा दडपण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने राबवलेल्या लष्करी कारवाईचे नाव 'ऑपरेशन सर्चलाइट' होते.
Ans: अलीकडे दोन्ही देशांमधील संबंध सुधारत असताना, पंतप्रधानांनी थेट लष्करी अत्याचारांचा उल्लेख केल्यामुळे पाकिस्तानच्या मुत्सद्दी प्रयत्नांना धक्का बसला आहे.






