फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Independence Day: आजचा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन असून हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस आहे. आज भारताने इंग्रजांच्या दीर्घकालीन गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवले, हा दिवस भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पहिल्यांदा तिरंगा फडकवला आणि आपल्या ऐतिहासिक भाषणात देशाला स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले. या स्वातंत्र्याच्या लढ्यात महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांच्यासह असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं.

