Bangladesh Elections : 'आम्ही आनंदाने खुर्ची सोडू...' ; युनूस यांनी जाहीर केला निवडणुकीनंतर प्लॅन (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Bangladesh Elections : बांगलादेशाच्या सत्तेची चावी कोणाकडे? ४७% मतदानांतर काऊंटडाऊन सुरु
दरम्यान मोहम्मद युनूस यांनी मतदान सुरु होण्यापूर्वी राष्ट्राला उद्देशून भाषण केले होते. त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले होते की, सराकारचे ध्येय निष्पक्ष निवडणुक आयोजित करणे आहे. त्यांनी निकाल लागल्यानंतर आनंदाने लोकशाही सरकारकडे सत्तेची जबाबदारी सोपवण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी ते शुभ क्षणाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे युनूस यांनी म्हटले. त्यांनी सांगितले की, निकाल लागल्यानंतर त्यांचे सरकार देशाची सूत्रे निवडून आलेल्या सरकारच्या हाती सोपवेल.
ऑगस्ट २०२४ मध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना सत्तेवरुन उलथून टाकल्याच्या दीड वर्षानंतर बांगलादेशात संसदीय निवडणुका पार पडल्या आहेत. २०२४ मध्ये शेख हसीनाच्या पतनानंतर ही पहिलीच लोकशाही प्रक्रिया होती. जुलै २०२४ मध्ये हसीना सरकारच्या सरकारी नोकऱ्यांच्या कोट्याविरोधात देशव्यापीर विद्यार्थी आंदोलन झाले होते. या आंदोलनात प्रचंड हिंसाचार घडला होता. हसीना यांना पदाचा राजीनामा देऊन हेलिकॉप्टरने देश सोडावा लागला होता.
दरम्यान हसीना सरकारच्या पायउतारानंतर ही पहिली लोकशाही प्रक्रिया होती. परंतु या निवडणुकीत बीएनपी आणि जमात-ए-इस्लामीच्या नेत्यांमध्ये चकामक झाली. यामध्ये बीएनपीच्या पक्षातील एका नेत्याचा मृत्यू झाला असून याचा जमातच्या कार्यकर्त्यांवर आरोप करण्यात आला आहे. बीएनपीच्या मते मतदानादरम्यान जमातच्या कार्यकर्त्यांनी हेराफेरी केली आहे.
मुन्शींगज-३ आणि गोपालगंज सदर भागातही मतदान केंद्रांबाहेर बॉम्ब स्फोट झाला होता. यामध्ये कोणाचाही मृत्यूची नोंद नाही. परंतु एक सुरक्षा कर्मचारी आणि १४ वर्षांची मुलगी जखमी झाली आहे. खलीलनगर युनियनमधील मच्छिहारा गावात एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यूी झाला आहे. सध्या याचे कारण स्पष्ट झालेले नाही. याशिवायही आणखी काही भागात दंगली झाले असल्याचे सांगितले जात आहे.
Bangladesh Elections : मतदानानंतर युनूस यांचे खळबळजनक वक्तव्य; शेख हसीनाला दिला ‘हा’ इशारा






