
bangladesh nsa khalilur rahman meets ajit doval india visit sheikh hasin policy shift america
1. बांगलादेशचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खलीलूर रहमान 19–20 नोव्हेंबर रोजी भारतातील कोलंबो सुरक्षा परिषदेत सहभागी होणार असून अजित डोभाल यांच्याशी महत्त्वाची बैठक अपेक्षित.
2.भारत-पाकिस्तान हालचालींच्या पार्श्वभूमीवर भारत बांगलादेशसोबत द्विपक्षीय सुरक्षा, ढाक्यातील पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांच्या वाढत्या भेटी यासंदर्भात चर्चा करणार.
3.शेख हसीना अलीकडे अमेरिकेवरील टीका टाळताना दिसत असून 2026 निवडणुकांच्या अनिश्चिततेत हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे.
Bangladesh NSA visit India : बांगलादेशचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) खलीलूर रहमान हे येत्या 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा हा दोन दिवसांचा नवी दिल्ली दौरा सध्या दक्षिण आशियातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या भेटीदरम्यान ते भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल(Ajit Doval )यांच्यासोबत सुरक्षा क्षेत्रातील अनेक संवेदनशील मुद्द्यांवर विस्तृत चर्चा करू शकतात.
विशेष म्हणजे, बांगलादेशात 2026 च्या निवडणुकांबाबत अनिश्चितता वाढत असताना आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांची अमेरिकेकडे बदलती भूमिका चर्चेत असताना हा दौरा होत आहे. त्यामुळे या भेटीवर केवळ सुरक्षा नव्हे तर बांगलादेशाच्या भविष्यातील राजकीय वातावरणाचा प्रभावही जाणवणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Saudi-US : सौदीचा अमेरिकेकडे इतिहासातील सर्वात मोठा आग्रह; क्राउन प्रिन्सच्या ‘या’ चार अटींमुळे संपूर्ण जगाचे लक्ष खिळले
सूत्रांच्या माहितीनुसार, खलीलूर रहमान हे कोलंबो सिक्युरिटी कॉन्फरन्सच्या सातव्या बैठकीत सहभागी होण्यासाठी भारताच्या निमंत्रणावर येत आहेत. या परिषदेला भारतासाठी महत्त्व आहे कारण हिंद महासागर क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सहकार्य वाढवण्याचा हा मोठा मंच आहे. या काळात अजित डोभाल आणि रहमान यांच्यात स्वतंत्र बैठक होण्याची शक्यता आहे. त्यांच्या शेवटच्या चर्चा एप्रिलमध्ये बँकॉकमध्ये झाल्या होत्या. या बैठकीतही दोन्ही देशांमधील सुरक्षा सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाईल. भारतीय सुरक्षाविश्लेषकांच्या मते, सध्या भारताची मुख्य चिंता म्हणजे ढाक्यात वाढत असलेली पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांची ये-जा. गेल्या महिन्यातच पाकिस्तानी नेव्ही चीफ आणि जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष यांनी ढाक्याला अधिकृत भेट दिली होती. या हालचालींकडे भारत बारीक लक्ष ठेवून आहे. त्यामुळे या विषयावर भारत बाजूने तीव्र चर्चा होण्याची शक्यता आहे.
या भेटीचा आणखी एक महत्त्वाचा राजकीय पैलू आहे. बांगलादेशातील माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा अलीकडचा सौम्य पवित्रा. गेल्या काही वर्षांत त्यांनी अमेरिकेविरुद्ध टीका करण्याची संधी सोडली नव्हती. परंतु अलीकडील मुलाखतींमध्ये त्यांनी हिंसक निदर्शनांसाठी अमेरिकेला थेट जबाबदार धरणे टाळले. त्यांनी एकही कठोर विधान केले नाही. यामुळे बांगलादेशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे की शेख हसीना अमेरिकेशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत का? काही तज्ज्ञांच्या मते, मोहम्मद युनूस यांनी अवामी लीगवर घातलेल्या बंदीमुळे हसीना यांच्यासाठी परत सत्तेत येणे कठीण झाले आहे. यासाठीच त्या पुन्हा एकदा अमेरिकेचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे संकेत राजकीय वर्तुळात दिले जात आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ChinaNews : चीनने नागरिकांना दिला Japanला प्रवास न करण्याचा सल्ला; जपानी पंतप्रधानांच्या वक्तव्याने वादंग
बांगलादेशातील राजकीय वातावरण सध्या धूसर आहे. नवीन सरकारने फेब्रुवारी 2026 मध्ये निवडणुका घेण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु प्रत्यक्षात अद्याप निवडणूक आयोगाने कोणतीही तयारी सुरू केलेली नाही. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे. या अनिश्चिततेत खलीलूर रहमान यांचा भारत दौरा आणखी महत्त्वाचा बनतो. भारत बांगलादेशात स्थिरता असावी, हे प्राधान्य मानतो. त्यामुळे या दौर्यानंतर इंडो-बांगलादेश संबंधांतील पुढील दिशा स्पष्ट होऊ शकते. भारत-बांगलादेश संबंधांचा हा टप्पा अतिशय निर्णायक मानला जात आहे. खलीलूर रहमान यांचा दौरा केवळ एका सुरक्षा बैठकीपुरता मर्यादित नसून या प्रदेशातील बदलत्या राजकीय समीकरणांना दिशा देणारा ठरू शकतो. देशांतर्गत तणाव, पाकिस्तानचे वाढते कूटनीतिक पाऊल, आणि शेख हसीना यांची अमेरिकेकडे झुकणारी भूमिका — या सर्वाचा परिणाम या दौर्याच्या चर्चांवर होणार हे निश्चित.