
India Bnagladesh Flag
भारत सरकारने बांगलादेशातील भारतीय ठिकाणांवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय राजदूत आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंबींयाना परत बोलावून घेतले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंसाचार वाढण्याची शक्यता आहे. यामुळे भारत सरकारने बांगलादेशमध्ये राजदूतांसाठी नॉन फॅमिली पोस्टिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. राजदूतांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेत हे पाऊल उचलण्यात आले आहे.
याच वेळी भारताने बांगलादेशात वाढत्या हिंदू अल्पसंख्याकवरील हल्ल्याबात चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही महिन्यांत हिंदूना मारहणा, त्यांच्यावरील हल्ले आणि हत्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. डिसेंबर २०२५ पासून ही परिस्थिती अधिक बिघडली आहे. आतापर्यंत सात हिंदू अल्पसंख्याक नागरिकांची कट्टरपंथींयाकडून मारहाण करुन हत्या करण्यात आली आहे.
याशिवाय भारतीय दूतावासावरही हल्ला झाला आहे. यामुळे राजदूतांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढत आहे. याच परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरच बांगलदेशातील चितगाव, खुलना, राजशाही आणि सिल्हेट च्या उच्चायुक्तालयात पदे कार्यरत राहणार आहे. सध्या रादूतांचे कुटुंब कधी परतती याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
दरम्यान बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवरील वाढत्या हिंसाचाराबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच मोहम्मद युनूस (Muhummad Yunus) यांच्या नेतृत्वाखालील अंतिरम सरकार अल्पसंख्याक नागरिकांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले असल्याचे म्हटले जात आहे. सध्या वाढत्या हिंसाराचावर अंतरिम सरकार मौन असल्याने सरकार कट्टरपंथीयांच्या कायवायांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
राइट्स अँड रिस्क अनालिसिस ग्रुप (RRAG) च्या माहितीनुसार, डिसेंबर २०२५ ते १५ जानेवारी पर्यंत १५ हिंदूंच्या हत्येच्या घटना घडल्या आहे. या हिंसक घटनांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र विरोध केला जात आहे. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादाक मानली जात आहे.
Ans: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशात हिंसाचार वाढण्याची शक्यता आहे. यामुळे भारत सरकारने बांगलादेशमध्ये राजदूतांसाठी नॉन फॅमिली पोस्टिंग देण्याचा निर्णय घेतला आहे.
Ans: भारत सरकारने बांगलादेशातील भारतीय ठिकाणांवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय राजदूत आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंबींयाना परत बोलावून घेतले आहे.