Bangladesh Violence : बांगलादेशातील हिंदू अत्याचारावर PM मोदी काढणार तोडगा? आंतरराष्ट्रीय वर्तुळातून होतीये मागणी (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जागतिक हिंदू समुदायाने लिहिलेल्या पत्रात बांगलादेशातील हिंदूंच्या हत्या, कट्टरपंथी जमावांचे हल्ले, हिंदू मंदिरांची तोडफोड या सर्व घटनांचा तपशील देण्यात आला आहे. यामध्ये भारत सराकरने बांगलादेशातील हिंदूवरील वाढत्या हल्ल्याचा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उपस्थित करावा. हिंदू निरापराध अल्पसंख्यांच्या बचावासाठी यामध्ये आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाच्या दबावा आणणण्याची मागणी करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींना हिंदू डायस्पोराने लिहिलेल्या पत्रात दीपू चंद्र दासच्या लिंचिंग आणि जिवंत जाळण्याच्या भयानक घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच इतर काही थरकाप उडवणाऱ्या घटनांबाबतही सांगण्यात आले आहे. ऑगस्ट २०२५ पासून हिंदूंवरील हल्ले वाढले आहे. लोकांना इशनिंदेच्या आरोपांच्या खाली हिंदू समुदायाच्या लोकांवर हल्ले केले आहे, त्याना मारहाण केली असल्याचे या पत्रात मांडण्यात आले आहे. पत्रात म्हटले आहे की, बांगलादेशातील सध्याची परिस्थितीही जाणूनबुजून प्रस्थारित करण्यात आली आहे. या नरसंहाराकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही असे जागतिक हिंदू समुदायांनी म्हटले आहे.
जागतिक हिंदू समुदायांनी भारत सरकारडे बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी मानवतावादी कॉरिडॉरची आणि निर्वासित छावण्याची मागँणी केली आहे. तसेच संयुक्त राष्ट्रातही याबाबत अपील करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींकडे करण्यात आले आहे. याशिवाय बांगलादेशातून भारतात येऊ इच्छिणाऱ्यांना सुरक्षितपणे सीमापार आणण्याची मागणी करण्यात आली आहे.
या सर्व घडामोडींदरम्यानच भारताचा शेजारी शत्रू देश पाकिस्तानातही एका हिंदूची हत्या करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात जमीनदाराने २३ वर्षीय हिंदू तरुण कैलाश कोहलीची गोळ्या झाडून हत्या केली. मोठ्या आंदोलनानंतर पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.
बांगलादेशात निवडणुकीपूर्वी पुन्हा राजकीय हिंसाचार; BNP पक्षाच्या युवा नेत्याची गोळ्या घालून हत्या






