Bangladesh-Pakistan Relations Bangladesh deserves an apology from Pakistan for 1971
ढाका: सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर तणावपूर्ण परिस्थिती आहे. याच दरम्यान बांगलादेशकडून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अलीकडेच परराष्ट्र सचिवांच्या बैठकीमध्ये पाकिस्तानने बांगलादेशसोबत बिघडलेले संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला होता. बांगलादेशने कठोर भूमिका घेतली. बांगलादेशन 1971 च्या युद्धातील अत्याचारांचा उल्लेख करत पाकिस्तानकडून औपचारिक माफीची मागणी केली. तसेच 4.2 अब्ज डॉलर्स नुकसानीची भरपाई देखील मागितली.
1971 मध्ये पाकिस्तानने ऑपरेशन सर्चलाइटला सुरु केले होते. यामध्ये पाकिस्तानी सैन्याने पूर्व पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य मिळवणाऱ्या बंगालींवर क्रूर लष्करी कारवाई केली होती. या कारवाईमध्ये 30 लाख लोक मारले गेले. तसेच 10 लाखांहून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करण्यात आले. या घटनेने बांगलादेश हादरला होता. आजही ही घटना बांगलादेशी नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करते. बांगलादेशने या घटनेला नरसंहार म्हणून संबोधले आहे. या घटनेवर बांगलादेशला कोणतीही तडजोड करायची इच्छा नसून पाकिस्तानकडे औपचारिक माफीची मागमी केली आहे.
पाकिस्तानने मात्र मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्त्वाखील स्थापन झालेल्या नवीन सरकारसोबत संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरु केले होते. यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्र सचिवांनी ढाका भेट दिली. परंतु बांगलादेशने स्पष्ट शब्दा सांगितले की, पाकिस्तान माफी मागत नाही आणि नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास तयार नाही.
बांगलादेशने 1971 मध्ये पूर्व बंगालमध्ये झालेल्या नरसंहाराची आठवण करुन देत माफीची मागणे केली. 1971 च्या पाकिस्तानच्या सर्चलाईट ऑपरेशनमुळेच बांगलादेश आणि पाकिस्तानमधील संबंध गेल्या अनेक दशकांपासून ताणलेले आहेत. यामुळे दोन्ही देशांमध्ये संवाद सुरु होतो त्यावेळी बांगलादेश पुन्हा 1971 च्या आठवणींचा उल्लेख करतो.
बांगलादेशला 1971 मध्ये पाकिस्तानपासून मिळालेल्या स्वातंत्र्यामध्ये भारताने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 1971 च्या युद्धात भारताने बांगलादेशी लोकांना भारतात आश्रय दिला होता. एवढेच नव्हे तर पाकिस्तानी सैन्याविरुद्ध भारताने बांगलादेशची साथ देत निर्णायक भूमिक बजावली होती. पाकिस्तान आणि भारतामध्ये झालेल्या शिमला करारामुळे बांगलादेशची निर्मिती झाली होती.
सध्या भारत आणि बांगलादेशमधील संबंध बांगलादेशच्या हिंदू समुदायवरील हल्ल्यामुळे तणावपूर्ण आहेत, परंतु पाकिस्तानची राजनैतिक चालीमुळे हे संबंध अधिक बिघडण्याची शक्यता आहे. सध्या बांगलादेशने स्पष्ट केले आहे की, पाकिस्तान भूतकाळाची जबाबदारी घेत नाही तोपर्यंत बांगलादेश माफ करणार नाही. बांगलादेशींसाठी, ऑपरेशन सर्चलाइटच्या आठवणी केवळ इतिहास नाहीत, तर त्यांच्या अस्तित्वाचा पाया आहेत.