Pahalgam Terror Attack: पाकिस्तानच्या कथित पंतप्रधानाची भारताला धमकी; म्हणाले, किंमत मोजावी लागेल..
इस्लामाबाद: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध फारच चिघळले आहेत. सध्या भारतात संतापाची तीव्र लाट उसळलेली आहे. भारताने देखील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. भारताने म्हटले आहे की, पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादविरोधी कठोर कारवाया करत नाही तोपर्यंत सिंधु जल कराराला स्थगिती देण्यात येत आहे. तसेच पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा बंदी लागू केली आहे. देशातील पाकिस्तानींना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले असून यामध्ये लष्करी अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.
एवढे होऊनही पाकिस्तानाने आपल्या वर्तनामध्ये सुधारणा केलेली नाही. पाकिस्तानमधून आता धमक्याही दिल्या जात आहे. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर च्या फर्जी पंतप्रधानांनी चौधरी अन्वरुल हक भारताविरोधात विष ओकले आहे. त्यांनी भारतातील पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याला उघडपणे पाठिंबा दिला आहे. तसेच या हल्ल्याला त्यांना बलूचिस्तानचा सूड म्हणून संबोधले आहे. त्यांनी म्हटले आहे की, दिल्लीपासून काश्मीरपर्यंत भारतातील त्यांच्या भूमीला किंमत मोजावी लागणार आहे.
#BREAKING: Puppet PM of Pakistan Occupied Jammu & Kashmir Chaudhry Anwarul Haq publicly announces support for Pakistan sponsored terrorism in Kashmir, India.
“Tum Balochistan Mein Pakistaniyon Ke Khoon Se Holi Kheloge, Iski Kimat Tumhe Dilli Se Lekar Kashmir Tak Deni Padegi” pic.twitter.com/2pP44jsWVR
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) April 24, 2025
चौधरी अन्वरुल हक यांनी असेही म्हटले आङे की, “जर भारत बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानींच्या रक्ताने होळी खेळली असेल तर याची किंमत दिल्लीपासून ते काश्मीरपर्यंत मोजावी लागणार आहे.
त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक तज्ज्ञांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे यावर बारताने लवकरात लवकर कारवाई करावी असे म्हटले जात आहे.
हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यात आली आहे. तसेच लष्करी कारवाईची संभाव्य शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. यामुळे पाकिस्तान सतर्क झाला आहे. पाकिस्तानी सैन्य, नौदलासह भारताच्या संभाव्य हल्ल्याला उत्तर देण्यासाठी तयारी करत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान पाकिस्तानमध्ये एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीदरम्यान पहलगामधील दहशतवागी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताच्या कृती बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे. यासाठी शहबाज यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीचयी बैठक बोलावली आहे.
याच वेळी दहशतवादी हल्ल्याच्या विरोदात दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयाबाहेर मोठ्या प्रमाणात निदर्शने काढण्यात आली आहे. निदर्शकांनी पाकिस्तानविरोधी नारे दिले आहे. तसेच पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईची देखील मागणी करण्यात आली आहे.