'भारत-पाक सीमेच्या...' पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिका सतर्क; नागरिकांसाठी जारी केले एड्वाइजरी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: भारताच्या जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने केवळ भारत नाही तप संपूर्ण जग हादरले आहे. या हल्ल्यानंतर देशात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. यामुळे हिंसक अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी एड्वाइजरी जारी केले आहे. अमेरिकेने आपल्या नागरिकांना जम्मू-काश्मीर प्रदेशात आणि भारत-पाकिस्ताानच्या सीमेच्या 10 किमी आता प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.
अमेरिकेन बुधवारी (23 एप्रिल) सर्व अमेरिकन नागरिकांसाछी सूचना जारी केली आहे. 22 एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये बहुतेक पर्यटक होते. यापूर्वी 2019 मध्ये पुलवामाच्या हल्ल्यानंतर बसैरान खोऱ्यातील हा हल्ला सर्वात घातक होता. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेन ट्रॅव्हल एड्वाइजरी जारी केली आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने आपल्या नागरिकांसाठी जारी केलेल्या सूचनांनुसार, अमेरिकी लोकांना जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात जाणे टाळाण्यास सांगितले आहे. अमेरिकेन म्हटले आहे की, या प्रदेशात सध्या दहशतवादी हल्ले आणि हिंसक नागरी अशांतातेची शक्यता आहे. यामुळे या राज्यात प्रवेश करु नका.
अमेरिकेने आपल्या सल्लागारात स्पष्ट केले आहे की, या ठिकाणी सतत हिंसाचाराच्या घटना घडत असतात. तसेच भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर देखील हिंसा सामान्य आहे. काश्मीर खोऱ्यातील श्रीनगर, गुलमर्ग आणि पहलगाम मध्ये जाऊ नका.
अमेरिकेने नागरिकांनी भारत-पाकिस्तान सीमेपासून 10 किवोमीटरच्या आत प्रवास करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. सध्या या भागामध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.
पहलगाममधील हल्ल्यानंतर अमेरिकेने भारताला पाठिंबाा दर्शवला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा अमेरिका तीव्र निषेध करतो. तसेच अमेरिका भारतासोबत दहशतवादविरोधीच्या लढाईत खंबीरपणे उभा आहे.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भारताने या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. बुधवारी (23 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीसीएसची महत्वाची बैठक घेतली.
या बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सिंधु जल कराराला स्थिगिती दिली. तसेच भारतातील पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडण्याचा आदेश दिल. 1 मे पर्यंत भारताने अटारी वाघा बॉर्ड बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. तसेच पाकिस्तानमधील भारतीय नागरिकांना देखील मायदेशी परतण्यास सांगितले आहे. तसेच पाकिस्तानसोबत असलेले राजनैतिक संबंध देखील कमी करत लष्करी अधिकाऱ्यांना हद्दपार केले आहे.
भारताने म्हटले आहे की, पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादविरोधी कठोर पाऊल उचलत नाही, तोपर्यंत भारत आपले निर्णय मागे घेणार नाही. यामुळे सध्या पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे.