Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठावा; युनूस सरकारचे प्रत्यार्पणासाठी भारताला पत्र

दरम्यान बांगलादेशने भारताकडे आपल्या माजी पंतप्रधान शेख हसीनाच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. बांगलादेश सरकारने भारताला पत्र पाठवले आहे. यात शेख हसीना यांना न्यायालयीन प्रक्रियेच्या अंतर्गत परत पाठवावे असे म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 26, 2024 | 01:54 PM
शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठावा; युनूस सरकारचे प्रत्यार्पणासाठी भारताला पत्र

शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठावा; युनूस सरकारचे प्रत्यार्पणासाठी भारताला पत्र

Follow Us
Close
Follow Us:

ढाका: सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध अधिक बिघडत चालले आहेत. बांगलादेश सोडून आल्यानंतर शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला त्यानंतर वातावरण अधिकच चिघळले. दरम्यान बांगलादेशने भारताकडे आपल्या माजी पंतप्रधान शेख हसीनाच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. बांगलादेश सरकारने भारत सरकारला पत्र पाठवले असून, त्यात शेख हसीना यांना बांगलादेशात न्यायालयीन प्रक्रियेच्या अंतर्गत परत पाठविण्याची विनंती केली आहे.

शेख हसीना यांना परत पाठवण्याची मागणी

बांगलादेशचे परराष्ट्रविषयक सल्लागार तौहीद हुसैन यांनी म्हटले आहे की, “आम्ही भारत सरकारला कळवले आहे की, बांगलादेश सरकारला शेख हसीना न्यायिक प्रक्रियेतील भाग म्हणून बांगलादेशात परत याव्यात.” तसेच बांगलादेशचे गृहविषयक सल्लागार जहांगीर आलम यांनी असेही म्हटले की, त्यांच्या मंत्रालयाने परराष्ट्र मंत्रालयाला पत्र पाठवून शेख हसीनाच्या भारतातून बांगलादेशात परत पाठविण्याची मागणी केली आहे. त्यानंतर बांगलादेशचे परराष्ट्र मंत्रालय भारताकडे शेख हसीनाच्या प्रत्यर्पणाची मागणी करत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- बशर अल-असद यांच्या पत्नीने मागितला घटस्फोट; रशियामध्ये नाखुश असल्याचा दावा

रत आणि बांगलादेशात 2013 सालचा प्रत्यर्पण करार

मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि बांगलादेशात 2013 साली एक प्रत्यर्पण करार करण्यात आला होता. या करारांतर्गत, दोन्ही देशांनी प्रत्यर्पणीय अपराधांसाठी आरोपी किंवा फरार व्यक्तींना एकमेकांना सुपूर्त करण्याचे ठरवले होते. बांगलादेश सरकारने सांगितले की, त्यांच्या या मागणीचा आधार 2013 च्या प्रत्यर्पण संधीवर आहे. तथापि, या संधीत एक क्लॉज असून यामध्ये असे म्हटले आहे की, जर आरोपीवर असलेले आरोप राजकारणाशी संबंधित असतील, तर त्याची प्रत्यर्पणाची मागणी नाकारली जाऊ शकते.

शेख हसीना यांच्यावरील आरोप

भारत आणि बांगलादेश यांच्यातील प्रत्यर्पण करारात काही विशिष्ट गुन्ह्यांसाठी प्रत्यर्पणाची मागणी केली जाऊ शकते. त्यामध्ये दहशतवाद, बॉम्बस्फोट, हत्या आणि अपहरण यांसारखे गंभीर गुन्हे समाविष्ट आहेत. शेख हसीनावर बांगलादेशमध्ये सामूहिक हत्या, लूट आणि जालसाजीचे आरोप आहेत. तसेच, बांगलादेशाच्या एका आयोगाने त्यांच्यावर लोकांना गहाण करून त्यांना गायब करायला सांगितल्याचे आरोप केले आहेत.

“अन्फोल्डिंग द ट्रूथ” या रिपोर्टमध्ये शेख हसीनावर अशा प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत. बांगलादेश सरकारने भारताकडे पाठवलेल्या पत्रात शेख हसीनाच्या प्रत्यर्पणासाठी न्यायालयीन प्रक्रिया आणि द्विपक्षीय कराराचा आधार घेतला आहे. तथापि, राजकीय गुन्ह्यांवरून त्यांच्या प्रत्यर्पणाची मागणी नाकारली जाऊ शकते, यामुळे हा मुद्दा गुंतागुंतीचा बनला आहे.

शेख हसीनासह भारतावर आरोप

भारत आणि बांगलादेश संबंध सध्या तणावपूर्ण टप्प्यावर आहेत. अलीकडेच बांगलादेशने पुन्हा एकदा भारतावर गंभीर आरोप केले आहेत. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने शेख हसीनासह भारतावर बांगला देशातील काही लोकांना गायब केल्याचा आरोप केला आहे. यामुळे दोन्ही देशांतील संबंधांवर अधिक परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Russia-Ukraine War: ‘मोठी किंमत मोजावी लागेल’; रशियाचा युक्रेनला इशारा

Web Title: Bangladesh yunus government sent diplomatic note to india says shaikh haseena extradition nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2024 | 05:25 PM

Topics:  

  • Bangladesh
  • shaikh hasina

संबंधित बातम्या

Iran USA War : इराण युद्धाचा दक्षिण आशियाला विळखा! नेपाळमध्ये गॅसचे रेशनिंग, बांगलादेशात रात्री 7 नंतर अंधार, पाकिस्तानमध्ये….
1

Iran USA War : इराण युद्धाचा दक्षिण आशियाला विळखा! नेपाळमध्ये गॅसचे रेशनिंग, बांगलादेशात रात्री 7 नंतर अंधार, पाकिस्तानमध्ये….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.