Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh: नवरात्रीच्या काळात बांगलादेशात मंदिरासमोर चिथावणीखोर कृत्य; मंदिरासमोर गायी कापून शिजवल्याचा गंभीर आरोप

Bangladesh Hindus : बांगलादेशची राजधानी ढाका येथील जगन्नाथ विद्यापीठातील मुस्लिम विद्यार्थ्यांनी दोन गायी कापून शिजवल्या. ही घटना विद्यापीठाच्या आवारातील एका मंदिराजवळ घडल्याचा आरोप आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 16, 2026 | 03:48 PM
Bangladesh temple violence Navratri Dhaka University cow slaughter controversy

Bangladesh temple violence Navratri Dhaka University cow slaughter controversy

Follow Us
Follow Us:
  • मंदिरासमोर चिथावणीखोर कृत्य
  • प्रशासनाचे अपयश आणि विरोध
  • अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न

बांगलादेशची (Bangladesh) राजधानी ढाका येथील प्रसिद्ध जगन्नाथ विद्यापीठाच्या आवारात नवरात्रीच्या पवित्र काळात एक अत्यंत धक्कादायक आणि विवादित घटना समोर आली आहे. विद्यापीठातील काही मुस्लिम विद्यार्थी संघटनांनी आवारात असलेल्या एका मंदिराच्या अगदी जवळ दोन गायींची कत्तल करून ते गोमांस शिजवून खाल्ल्याचा गंभीर आरोप हिंदू संघटनांकडून करण्यात आला आहे. या घटनेमुळे ढाका शहरात आणि संपूर्ण देशात तीव्र पडसाद उमटले असून हिंदू धर्मीयांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

ढाक्यातील विद्यापीठाच्या मंदिरासमोर चिथावणीखोर कृत्याने तणाव

मिळालेल्या माहितीनुसार आणि आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या अहवालानुसार, या वादाची सुरुवात १२ ऑक्टोबर रोजी झाली. नवरात्रीचा सण सुरू असतानाच काही मुस्लिम संघटनांच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील मंदिरासमोर गोमांस घालून बिर्याणी तयार केली होती. या कृत्याला हिंदू विद्यार्थ्यांनी आणि स्थानिक हिंदू संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला. वाढता तणाव पाहता विद्यापीठ प्रशासनाने तातडीने नोटीस जारी करून आवारात असे चिथावणीखोर कृत्य करणे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Air India Saudi: सौदी अरेबियाला जाणारी सर्व उड्डाणे रद्द, एअर इंडिया, इंडिगोने जारी केली सूचना, प्रवाशांना रिफंड मिळणार का?

प्रशासकीय नोटीसनंतरही थेट आव्हान आणि क्राउडफंडिंग

विद्यापीठ प्रशासनाच्या नोटीसला केराची टोपली दाखवत मुस्लिम विद्यार्थी संघटनांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली. ‘मजलिस’ नावाच्या एका विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाच्या आवारातच गोहत्या करण्याची खुली योजना जाहीर करण्यात आली. यासाठी विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष माध्यमातून क्राउडफंडिंग मोहीम राबवून प्रत्येकी ५० रुपयांची देणगी गोळा केली. यातून एक गाय खरेदी करण्यात आली, तर दुसऱ्या एका मुस्लिम संघटनेने विद्यार्थ्यांना दुसरी गाय भेट म्हणून दिली.

Tonight at Dhaka, Muslim students of Jagannath University are cooking beef in front of its central Temple. Hindu students protested, but administration sided with muslims. https://t.co/NS597efcJd — Joy Das 🇧🇩 (@joydas1844417) October 12, 2026

credit – social media and Twitter

प्रशासनाचा स्पष्ट मनाई हुकूम असतानाही या दोन्ही गायींची विद्यापीठाच्या आवारातच कत्तल करण्यात आली आणि मंदिर परिसराजवळच मांस शिजवून खाण्यात आले. या संपूर्ण प्रकरणावर विद्यापीठ प्रशासन आणि बांगलादेशचे अंतरिम सरकार बचावात्मक भूमिकेत दिसतात. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी “यात कोणताही मोठा वाद निर्माण झालेला नाही” असा दावा करत कारवाई करण्यास असमर्थता दर्शवली आहे, ज्यामुळे हिंदू संघटनांमध्ये प्रशासनाविरोधात संताप अधिकच वाढला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Hamas War: ‘बाबा, मला ज्यूंना शूट करायचे आहे’, इस्रायली सैन्याने हमास प्रमुखाच्या 10 वर्षांच्या मुलाचे पत्र आणले समोर

बांगलादेशात सत्तापालटानंतर हिंदू अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण

बांगलादेशातील एकूण लोकसंख्येच्या सुमारे ८ टक्क्यांहून अधिक भाग असलेला हिंदू समुदाय सध्या अत्यंत दहशतीखाली जगत आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या काळात अल्पसंख्याक हिंदू समुदायाला मिळणारे संरक्षण आता राहिलेले नाही, असा आरोप सातत्याने केला जात आहे. शेख हसीना यांच्या सत्तापालटानंतर आणि राजकीय उलथापालथीनंतर बांगलादेशातील मंदिरांवर आणि हिंदू धर्मीयांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

आवामी लीग पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षीच्या दुर्गापूजा उत्सवा दरम्यान देशभरात किमान ३४ हून अधिक ठिकाणी दुर्गादेवीच्या मूर्तींची तोडफोड, मंडपांचे नुकसान आणि भाविकांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनीही या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले असून, नवीन सरकार सत्तेवर आल्यापासून अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार आणि धार्मिक अत्याचार चिंताजनक रीतीने वाढल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title: Bangladesh dhaka jagannath university temple controversy hindu minority hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 03:48 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Hindu
  • World news

संबंधित बातम्या

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट
1

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट

Air India Saudi: सौदी अरेबियाला जाणारी सर्व उड्डाणे रद्द, एअर इंडिया, इंडिगोने जारी केली सूचना, प्रवाशांना रिफंड मिळणार का?
2

Air India Saudi: सौदी अरेबियाला जाणारी सर्व उड्डाणे रद्द, एअर इंडिया, इंडिगोने जारी केली सूचना, प्रवाशांना रिफंड मिळणार का?

Earthquake Prediction: चीन-ब्राझीलच्या शास्त्रज्ञांचे 12 पैकी 10 भूकंपांचे अंदाज ठरले अचूक; जाणून घ्या पृथ्वीच्या पोटातील हालचाली
3

Earthquake Prediction: चीन-ब्राझीलच्या शास्त्रज्ञांचे 12 पैकी 10 भूकंपांचे अंदाज ठरले अचूक; जाणून घ्या पृथ्वीच्या पोटातील हालचाली

Israel Hamas War: ‘बाबा, मला ज्यूंना शूट करायचे आहे’, इस्रायली सैन्याने हमास प्रमुखाच्या 10 वर्षांच्या मुलाचे पत्र आणले समोर
4

Israel Hamas War: ‘बाबा, मला ज्यूंना शूट करायचे आहे’, इस्रायली सैन्याने हमास प्रमुखाच्या 10 वर्षांच्या मुलाचे पत्र आणले समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.