Bermuda Air Ambulance Crash: बर्म्युडाहून बोस्टनला जाणारे विमान अटलांटिक महासागरात कोसळले; नॅन्टकेटजवळ सापडला मलबा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
अटलांटिक महासागराच्या आकाशात पुन्हा एकदा एका दुर्दैवी अपघाताची घटना समोर आली आहे. बर्म्युडाहून अमेरिकेतील बोस्टन शहराकडे रुग्णाला घेऊन जाणाऱ्या एका कॅनेडियन एअर अॅम्ब्युलन्सचा (Air Ambulance) संपर्क अचानक तुटला आणि काही वेळातच हे विमान समुद्रात कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या तटरक्षक दलाने (US Coast Guard) मॅसॅच्युसेट्स राज्यातील नॅन्टकेट (Nantucket) किनाऱ्याजवळ समुद्रात एका विशेष शोधा मोहिमेदरम्यान विमानाचे अवशेष आणि ढिगाऱ्यांचे क्षेत्र शोधून काढले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण विमान वाहतूक क्षेत्रात आणि निष्पाप प्रवाशांच्या कुटुंबीयांवर शोकाकुल कळा पसरली आहे.(Bermuda)
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, या कॅनेडियन नोंदणीकृत विमानात एकूण सहा जण सवार होते. यामध्ये चार कॅनेडियन नागरिक आणि दोन बर्म्युडाचे स्थानिक रहिवासी समाविष्ट होते. चार विमान कर्मचारी आणि दोन प्रवासी असे या सहा जणांचे स्वरूप होते. बर्म्युडा येथील एल.एफ. वेड आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (L.F. Wade International Airport) या विमानाने बोस्टनच्या दिशेने रात्री उड्डाण केले होते. मात्र, प्रवासादरम्यान अटलांटिक महासागरावर आलेले भीषण वादळ आणि अचानक झालेला तांत्रिक बिघाड या विमानासाठी प्राणघातक ठरला.
विमान बेपत्ता होण्यापूर्वी एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) आणि विमानाच्या वैमानिकामध्ये झालेल्या अंतिम संभाषणाची ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे. या रेकॉर्डिंगमुळे दुर्घटनेच्या वेळी विमानात नेमके काय घडत होते, याचा थरकाप उडवणारा उलगडा झाला आहे. शनिवारी सकाळी आकाशात उडत असताना विमानात अचानक विजेचा पुरवठा खंडित झाला आणि विद्युत यंत्रणा पूर्णपणे कोलमडली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US-India Defence: सागरी सुरक्षेचे नवे पर्व! अमेरिकेचे 5 विमानवाहू जहाजे आणि 4 लाख सैनिकांचे कमांडर भारतात; भेट ठरणार निर्णायक
त्याच वेळी हे विमान एका मोठ्या सागरी वादळाच्या तावडीत सापडले होते. विजेचा पुरवठा खंडित झाल्याने विमानावरील सर्व आधुनिक दिशादर्शक उपकरणे (Navigation Systems) बंद पडली. वैमानिकाने अत्यंत बिकट परिस्थितीत एटीसीला मे-डे (Mayday) म्हणजेच आपत्कालीन संदेश पाठवला. एटीसी नियंत्रकाने वैमानिकाला विचारले, “रॉजर, तुम्ही म्हणालात का की तुम्ही डेड रेकनिंगनुसार (Dead Reckoning – कोणत्याही डिजिटल उपकरणांशिवाय केवळ अंदाजावर) उड्डाण करत आहात?” वैमानिकाचा हाच अंतिम संवाद ठरला आणि काही क्षणांतच विमानाचा रडारशी असलेला संपर्क कायमचा तुटला.
🚨🇨🇦#BREAKING | NEWS ⚠️
Update: The missing jet is a Canadian air ambulance with registration number (#CGRJP) the plane was departing from Bermuda and heading towards Boston before it went down and dropped from radar, the aircraft was carrying six people. Multiple Coast Guard aircraft are searching for the plane this morning doing grid patterns off of Nantucket. ATC was speaking with the aircraft just before it went down. — Todd Paron🇺🇸🇬🇷🎧👽 (@tparon) October 3, 2026
credit – social media and Twitter
फ्लाइट-ट्रॅकिंग संकेतस्थळ ‘फ्लाइटरडार२४’ (Flightradar24) च्या प्राथमिक डेटाचा अभ्यास केला असता, हे विमान सुमारे २४,००० फूट इतक्या प्रचंड उंचीवर प्रवास करत होते. मात्र, वादळात सापडल्यानंतर आणि वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर अवघ्या काही सेकंदांत विमान सुमारे १०,००० फूट खाली आले. विमानाचा हा अचानक झालेला तीव्र उतरता आलेख भीषण दुर्घटनेची साक्ष देतो.
परिवहन विभागाच्या माजी महानिरीक्षक आणि ज्येष्ठ विमानचालन तज्ज्ञ मेरी शियावो (Mary Schiavo) यांच्या मते, अशा प्रकारच्या भीषण वादळात जेव्हा विमानाची सर्व डिजिटल आणि नेव्हिगेशन उपकरणे अचानक बंद पडतात, तेव्हा वैमानिकांसमोर ‘स्पेशियल डिसओरिएंटेशन’ (Spatial Disorientation – अवकाशीय दिशाभूल) ची परिस्थिती निर्माण होते. या स्थितीत आकाशात किंवा ढगांमध्ये उडताना विमान नेमके कोणत्या दिशेने वळत आहे, ते वर जात आहे की वेगाने खाली येत आहे, याचा अंदाज बांधणे मानवी मेंदूसाठी अत्यंत कठीण होऊन बसते. याच मानसिक व तांत्रिक गोंधळामुळे विमान थेट समुद्रात कोसळले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Burj Khalifa Show : चीनच्या 77 व्या राष्ट्रीय दिनानिमित्त चिनी ध्वजाच्या रंगांनी उजळला बुर्ज खलिफा; पाहा नयनरम्य VIRAL VIDEO
दुर्घटनेची माहिती मिळताच अमेरिकन तटरक्षक दलाने तातडीने प्रचंड मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचाव कार्य (Search and Rescue Operation) सुरू केले आहे. तटरक्षक दलाची गस्ती जहाजे आणि हेलिकॉप्टर रात्रंदिवस नॅन्टकेटच्या किनाऱ्याजवळील सागरी भागात शोध घेत आहेत. कॅनडाचे परिवहन मंत्री स्टीव्हन मॅकिनन (Steven MacKinnon) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, कॅनेडियन सरकार सतत अमेरिकन अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट केले आहे.
यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) देखील या घटनेची संपूर्ण माहिती गोळा करत आहे. समुद्रातून विमानाचे उर्वरित अवशेष आणि ब्लॅक बॉक्स (Black Box) बाहेर काढल्यानंतरच अपघाताच्या अधिकृत आणि सखोल चौकशीची घोषणा केली जाईल. सध्या बेपत्ता असलेल्या सर्व ६ जणांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली असून संपूर्ण जग या दुर्घटनेमुळे सुन्न झाले आहे.






