Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

British Army: लष्करी प्रशिक्षणादरम्यान 17 वर्षांच्या मुलीवर सामूहिक अत्याचार; ब्रिटनच्या लष्करी महाविद्यालयातील धक्कादायक उलगडा

British Army Scandal: हॅरोगेट ट्रेनिंग कॉलेजमध्ये चार मुलींनी ब्रिटिश सैन्यावर बलात्काराचा आरोप केला आहे, ज्यामुळे ब्रिटिश सैन्य आणि संरक्षण मंत्रालयाने या गंभीर आरोपांची चौकशी सुरू केली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 07, 2026 | 11:35 AM
british army scandal harrogate military college sexual assault marathi news

british army scandal harrogate military college sexual assault marathi news

Follow Us
Follow Us:
  • हॅरोगेट सैनिकी महाविद्यालयात लैंगिक छळाचा धक्कादायक प्रकार
  • कमी वयात निर्घृण अत्याचार आणि पोलीस तपासात त्रुटी
  • अहवालातून धक्कादायक आकडेवारी उघड

ब्रिटिश (Great Britain) सशस्त्र दलाच्या संरक्षणात आणि शिस्तीत देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण महिला भरतींसोबत एक अत्यंत लज्जास्पद आणि अमानवीय प्रकार घडल्याचे समोर आले आहे. युनायटेड किंगडममधील (UK) नॉर्थ यॉर्कशायर येथे स्थित ब्रिटिश सैन्याच्या सर्वात मोठ्या आणि प्रमुख लष्करी प्रशिक्षण संस्था ‘आर्मी फाउंडेशन College (AFC) हॅरोगेट’ मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या चार माजी कनिष्ठ महिला सैनिकांनी बलात्कार आणि गंभीर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या धक्कादायक खुलाशांमुळे केवळ ब्रिटिश सैन्यच नव्हे, तर ब्रिटनचे संरक्षण मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लष्करी संस्थांमधील महिलांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बीबीसीच्या (BBC) एका विशेष तपासात्मक अहवालातून उघडकीस आलेल्या माहितीनुसार, ज्या वेळी या दुर्दैवी घटना घडल्या, त्या वेळी या सर्व पीडित मुलींचे वय अवघे १७ वर्षे होते. ब्रिटिश सैन्यात १६ आणि १७ वर्षांच्या अल्पवयीन तरुणांना कनिष्ठ सैनिक (Junior Soldiers) म्हणून प्रवेश दिला जातो. या महाविद्यालयात कठोर सैनिकी शिस्त शिकवली जात असताना, पडद्यामागे मात्र महिला सैनिकांना भयंकर मानसिक आणि शारीरिक अत्याचाराचा सामना करावा लागत होता. पीडितांनी केलेले दावे आणि समोर आलेली अधिकृत आकडेवारी ही या संस्थेमधील महिलांविरोधी विकृत मानसिकतेची आणि सुरक्षेतील गंभीर त्रुटींची स्पष्ट साक्ष देत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Munitions Shortage : ‘माहिती लीक करणाऱ्यांना सोडणार नाही!’ ट्रम्प यांचा संतप्त इशारा; अमेरिकन संरक्षण वर्तुळात खळबळ

‘मला मांसाच्या तुकड्यासारखे वागवले’; पीडितेचा अंगावर काटा आणणारा खुलासा

या प्रकरणातील सर्वात गंभीर आरोप ‘टिली’ (बदलेले नाव) नावाच्या एका माजी कनिष्ठ महिला सैनिकाने केला आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार, तिच्याच सोबत प्रशिक्षण घेणाऱ्या काही सहकारी कनिष्ठ पुरुष सैनिकांनी तिला एका वसतिगृहातील खोलीत बोलावले. तिथे तिला ओलीस ठेवून, जबरदस्तीने कपडे काढून तिच्यावर तासनतास निर्घृणपणे सामूहिक बलात्कार करण्यात आला. “त्या क्षणी मला सैनिकाच्या ऐवजी एका मांसाच्या तुकड्यासारखे वागवले जात होते,” अशा अत्यंत वेदनादायी शब्दांत तिने आपला अनुभव मांडला. या घटनेमुळे झालेल्या तीव्र मानसिक आघातातून सावरणे शक्य नसल्याने तिने अवघ्या दोन आठवड्यांतच लष्करातील आपली कारकीर्द सोडून दिली.

We’re at the Army Foundation College where a major graduation parade has been overshadowed by serious allegations of sexual abuse BBC has spoken to 4 former recruits who allege they were victims of assaults, including rape 900 teen recuits leave here today as trained soldiers pic.twitter.com/MYMzBD63x5 — James Wharton (@jameswharton) August 6, 2026

credit – social media and Twitter

या घटनेनंतर पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली, परंतु क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिसने (CPS) नॉर्थ यॉर्कशायर पोलिसांचा प्राथमिक तपास पूर्णपणे ‘अपुरा आणि निष्काळजीपणाचा’ असल्याचे घोषित केले. पोलिसांच्या या अपयशामुळे पीडितेला न्यायापासून वंचित राहावे लागले. त्यानंतर तिने पोलिसांच्या निष्काळजीपणाविरुद्ध प्रदीर्घ कायदेशीर लढा दिला आणि अखेर नॉर्थ यॉर्कशायर पोलिसांसोबत आर्थिक तडजोड झाली; मात्र या तडजोडीदरम्यान पोलिसांनी आपली कोणतीही कायदेशीर जबाबदारी स्वीकारली नाही, ज्यामुळे पीडितेला आजही परिपूर्ण न्याय मिळालेला नाही.

तुटलेल्या कुलुपामुळे दारामागे झोपणारी सैनिक; प्रशिक्षकांकडून आक्षेपार्ह वर्तणूक

अत्याचाराची ही कहाणी केवळ एका मुलीपुरती मर्यादित नाही. इतर तीन महिला सैनिकांनीही हॅरोगेट महाविद्यालयातील भीतीदायक वातावरणाचा उलगडा केला आहे. ‘एमी’ नावाच्या एका कनिष्ठ सैनिकाच्या आईने सांगितले की, तिच्या मुलीच्या खोलीचे दाराचे कुलूप तुटलेले होते. पुरुष सैनिकांच्या सततच्या भीतीमुळे आणि लैंगिक छळाच्या धोक्यामुळे ती रात्रभर दाराला टेकून झोपायची, जेणेकरून रात्रीच्या वेळी कोणी पुरुष सैनिक तिच्या खोलीत शिरू शकणार नाही.

दुसऱ्या एका पीडितेने सांगितले की, संस्थेतील काही पुरुष प्रशिक्षक आणि अधिकारी स्वतःच महिला भरतींवर लज्जास्पद व आक्षेपार्ह टिप्पणी करत असत. महिला सैनिकांच्या दिसण्यावरून आणि शारीरिक बांध्यावरून त्यांना रेटिंग दिले जात असे. इतकेच नव्हे तर, कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा दार न ठोठावता हे प्रशिक्षक मुलींच्या खोल्यांमध्ये अचानक शिरत असत, जेव्हा त्या अर्धवट कपड्यांमध्ये असायच्या. या संपूर्ण प्रकारामुळे सैनिकी प्रशिक्षण संस्थेत महिलांचे शोषण करणारी एक धोकादायक संस्कृती वाढीस लागल्याचे उघड झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mojtaba Khamenei: इराणच्या सर्वोच्च नेत्यांशी बोलणे अत्यंत कठीण; राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी उकलले त्या ‘गुप्त’ भेटीचे गूढ

संरक्षण मंत्रालयाची आकडेवारी आणि तक्रारींचा डोंगर

बीबीसीने माहितीच्या अधिकाराखाली (FOI) मिळवलेल्या आकडेवारीनुसार, या महाविद्यालयाशी संबंधित लैंगिक गुन्ह्यांचे प्रमाण अत्यंत गंभीर आहे. जून २०२६ पर्यंतच्या एका वर्षाच्या कालावधीतच नॉर्थ यॉर्कशायर पोलिसांना या महाविद्यालयाशी संबंधित १६ गंभीर लैंगिक गुन्ह्यांच्या तक्रारी मिळाल्या आहेत, ज्यामध्ये लैंगिक अत्याचार आणि अश्लील वर्तनाचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त, युकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या (MoD) अधिकृत आकडेवारीनुसार, जानेवारी २०१८ ते जून २०२५ या काळात हॅरोगेट महाविद्यालयात अयोग्य लैंगिक वर्तनाच्या एकूण १७६ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. यामध्ये महाविद्यालयाच्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांविरुद्ध ३२ आणि कनिष्ठ सैनिकांविरुद्ध १४४ गंभीर आरोपांचा समावेश होता. सध्या या महाविद्यालयात १९ वर्षांखालील एकूण ८८९ कनिष्ठ सैनिक प्रशिक्षण घेत असून, त्यात सुमारे ७० महिला भरतींचा समावेश आहे.

ब्रिटिश लष्कराचे स्पष्टीकरण आणि सुधारणांची घोषणा

हा संपूर्ण घोटाळा सार्वजनिक झाल्यानंतर ब्रिटिश लष्कर आणि संरक्षण मंत्रालयावर सर्वस्तरातून प्रचंड टीका होत आहे. ब्रिटनच्या संसदेतील संरक्षण समितीच्या सदस्यांनी या प्रकरणाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना ब्रिटिश लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, “सशस्त्र दलांमध्ये अशा कोणत्याही गुन्हेगारी किंवा अयोग्य वर्तनाला अजिबात स्थान नाही.”

लष्कराने दाव्यानुसार, पीडितांना तातडीने पाठिंबा देण्यासाठी नवीन सुधारणा लागू करण्यात आल्या आहेत. सैनिकी साखळीच्या बाहेर जाऊन स्वतंत्र मदत पुरवण्यासाठी ‘डिफेन्स सिरियस क्राईम कमांड’ (Defense Serious Crime Command) द्वारे तज्ज्ञ सहाय्य दिले जात आहे. मात्र, असे असतानाही ज्या प्रकारे किशोरवयीन मुलींना देशसेवेचे स्वप्न पाहताना या नरकयातना सहन कराव्या लागल्या, त्यामुळे ब्रिटिश सैन्यातील महिलांच्या सुरक्षिततेवर जगभरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Web Title: British army scandal harrogate military college physical violation marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • army
  • Great Britain
  • World news

संबंधित बातम्या

Munitions Shortage : ‘माहिती लीक करणाऱ्यांना सोडणार नाही!’ ट्रम्प यांचा संतप्त इशारा; अमेरिकन संरक्षण वर्तुळात खळबळ
1

Munitions Shortage : ‘माहिती लीक करणाऱ्यांना सोडणार नाही!’ ट्रम्प यांचा संतप्त इशारा; अमेरिकन संरक्षण वर्तुळात खळबळ

Nirmal Purja: पर्वतांचा राजा हरपला! निर्मल पुर्जा यांच्यासह 5 गिर्यारोहकांचे मृतदेह स्कार्दूला आणले; 8 व्या दिवशीही शोधमोहीम सुरू
2

Nirmal Purja: पर्वतांचा राजा हरपला! निर्मल पुर्जा यांच्यासह 5 गिर्यारोहकांचे मृतदेह स्कार्दूला आणले; 8 व्या दिवशीही शोधमोहीम सुरू

Mojtaba Khamenei: इराणच्या सर्वोच्च नेत्यांशी बोलणे अत्यंत कठीण; राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी उकलले त्या ‘गुप्त’ भेटीचे गूढ
3

Mojtaba Khamenei: इराणच्या सर्वोच्च नेत्यांशी बोलणे अत्यंत कठीण; राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी उकलले त्या ‘गुप्त’ भेटीचे गूढ

Taiwan War Drills: सायरन वाजले अन् राष्ट्राध्यक्षांनी घातले बुलेटप्रूफ जॅकेट; तैवानच्या ‘हान कुआंग’ सरावाने ड्रॅगॉनचा थरकाप
4

Taiwan War Drills: सायरन वाजले अन् राष्ट्राध्यक्षांनी घातले बुलेटप्रूफ जॅकेट; तैवानच्या ‘हान कुआंग’ सरावाने ड्रॅगॉनचा थरकाप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.