Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

UK Parliament: ब्रिटिश हिंदू रस्त्यावर! लंडनमध्ये ‘हनुमान चालीसा’ पठण करत बांगलादेश सरकारचा निषेध, ब्रिटन संसदही संतप्त

Bangladesh Hindu violence: बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांवरील अत्याचारांवर ब्रिटनने कडक भूमिका घेतली आहे, युनूस सरकारचा निषेध केला आहे आणि फेब्रुवारीमध्ये पारदर्शक निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 16, 2026 | 04:42 PM
british parliament debate bangladesh hindu violence bob blackman priti patel 2026

british parliament debate bangladesh hindu violence bob blackman priti patel 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • ब्रिटिश संसदेत पडसाद
  • निवडणुकांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न
  • आंतरराष्ट्रीय दबाव

Bangladesh Hindu violence British Parliament debate : बांगलादेशात (Bangladesh) हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर सुरू असलेल्या हिंसाचाराचे पडसाद आता सातासमुद्रापार उमटले आहेत. ब्रिटिश (Britain) संसदेच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये या विषयावर अत्यंत गंभीर चर्चा झाली, ज्यामध्ये लोकप्रतिनिधींनी बांगलादेशातील परिस्थितीला “विनाशकारी” (Disastrous) असे संबोधले. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी मांडलेल्या प्रस्तावाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले असून, युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारवर आता मोठा आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण झाला आहे.

“रस्त्यावर हिंदूंची हत्या होत आहे” : खासदारांचा टाहो

खासदार बॉब ब्लॅकमन यांनी संसदेत अत्यंत विदारक चित्र मांडले. ते म्हणाले, “मी घाबरलो आहे, कारण बांगलादेशातील हिंदूंची रस्त्यावर निर्घृण हत्या केली जात आहे. त्यांची घरे पेटवून दिली जात आहेत आणि मंदिरांची विटंबना सुरू आहे.” ब्लॅकमन यांनी चिन्मय प्रभू यांची अटक आणि दीपू दास यांची झालेली हत्या (Lynching) यांचा विशेष उल्लेख करत, बांगलादेशातील धार्मिक स्वातंत्र्याचा गळा घोटला जात असल्याचे सांगितले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : UK PM News: ब्रिटनमध्ये नवा वाद! धोरणात्मक अपयश झाकण्यासाठी स्टारमर यांचा ‘कामसूत्र’ ड्रामा; पाहा VIRAL VIDEO

फेब्रुवारी २०२६ च्या निवडणुका आणि ‘लोकशाहीचा’ पेच

केवळ हिंसाचारच नाही, तर बांगलादेशातील आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या विश्वासार्हतेवरही ब्रिटनने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकांमधून सर्वात मोठा राजकीय पक्ष ‘अवामी लीग’ला वगळण्यात आले आहे. “३० टक्के जनतेचा पाठिंबा असलेल्या पक्षाला निवडणूक लढवण्यापासून रोखणे, हे लोकशाहीच्या विरोधात आहे,” असे मत ब्लॅकमन यांनी व्यक्त केले. तसेच, इस्लामिक कट्टरतावादी देशाचे संविधान बदलण्यासाठी जनमत चाचणीची मागणी करत असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.

#BREAKING: British MP @BobBlackman raises concerns in British Parliament over killing of Minority Hindus and burning of temples in Bangladesh. He also raised concerns on ban on Awami League ahead of elections. Asks Yunus Govt to protect minorities, ensure free and fair elections. pic.twitter.com/1xxjPVQikD — Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) January 15, 2026

credit – social media and Twitter

प्रीती पटेल यांचा पत्रप्रपंच आणि लंडनमधील निदर्शने

भारतीय वंशाच्या खासदार आणि छाया परराष्ट्र सचिव प्रीती पटेल यांनी या प्रकरणी थेट हस्तक्षेप केला आहे. त्यांनी परराष्ट्र सचिव यवेट कूपर यांना पत्र लिहून, बांगलादेशात हिंदूंच्या सुरक्षेसाठी ब्रिटनने आपल्या राजनैतिक अधिकारांचा वापर करावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, लंडनमध्ये ‘बंगाली हिंदू आदर्श संघ’ (BHAS) आणि इतर प्रवासी संघटनांनी बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर मोठी निदर्शने केली. “हिंदूंचे आयुष्य महत्त्वाचे आहे” (Hindu Lives Matter) अशा घोषणांनी लंडनचा परिसर दणाणून गेला होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Poseidon Drone: पुतिनकडे आहे पाण्याखालील प्रलयकाळाचा अग्रदूत; जो कुठेही आणू शकतो 500 फूट उंचीची त्सुनामी, वाचा खासियत

ब्रिटिश सरकारची भूमिका

ब्रिटीश सरकारने या वादावर अधिकृत भूमिका मांडताना सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. हाऊस ऑफ कॉमन्सचे नेते अॅलन कॅम्पबेल यांनी स्पष्ट केले की, ब्रिटन सरकार मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारशी सतत संपर्कात आहे. “धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण करणे ही सरकारची पहिली जबाबदारी आहे. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुका पारदर्शक आणि सर्वसमावेशक असाव्यात, यासाठी आम्ही दबाव टाकत राहू,” असे आश्वासन त्यांनी दिले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ब्रिटिश संसदेत बांगलादेशातील कोणत्या घटनेवर चर्चा झाली?

    Ans: बांगलादेशात हिंदूंची होणारी हत्या, मंदिरे जाळणे आणि फेब्रुवारी २०२६ च्या निवडणुकांमधून प्रमुख पक्षांना वगळणे यावर चर्चा झाली.

  • Que: बॉब ब्लॅकमन आणि प्रीती पटेल यांची मागणी काय आहे?

    Ans: त्यांनी युनूस सरकारने हिंदूंचे रक्षण करावे आणि फेब्रुवारीमध्ये पारदर्शक व सर्वसमावेशक निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी केली आहे.

  • Que: लंडनमध्ये निदर्शने कोणी केली?

    Ans: 'बंगाली हिंदू आदर्श संघ' (BHAS) आणि भारतीय प्रवासी संघटनांनी लंडनमध्ये बांगलादेश सरकारविरोधात निदर्शने केली.

Web Title: British parliament debate bangladesh hindu violence bob blackman priti patel 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Great Britain
  • Hindu
  • international news
  • Keir Starmer

संबंधित बातम्या

UK PM News: ब्रिटनमध्ये नवा वाद! धोरणात्मक अपयश झाकण्यासाठी स्टारमर यांचा ‘कामसूत्र’ ड्रामा; पाहा VIRAL VIDEO
1

UK PM News: ब्रिटनमध्ये नवा वाद! धोरणात्मक अपयश झाकण्यासाठी स्टारमर यांचा ‘कामसूत्र’ ड्रामा; पाहा VIRAL VIDEO

Bangladesh Attacks On Hindu: धार्मिक कट्टरतेचा बळी! सिल्हेटमध्ये प्रतिष्ठित हिंदू शिक्षकाच्या घराची राखरांगोळी, पाहा VIRAL VIDEO
2

Bangladesh Attacks On Hindu: धार्मिक कट्टरतेचा बळी! सिल्हेटमध्ये प्रतिष्ठित हिंदू शिक्षकाच्या घराची राखरांगोळी, पाहा VIRAL VIDEO

New World Order: ‘चीन, भारत, रशिया आणि युरोप…’ जन्म घेतेय एक नवीन जागतिक व्यवस्था; पण कॅनडा होणार का नेता?
3

New World Order: ‘चीन, भारत, रशिया आणि युरोप…’ जन्म घेतेय एक नवीन जागतिक व्यवस्था; पण कॅनडा होणार का नेता?

Nobel Prize : ‘आम्ही आमचे पदक देऊ शकतो, पण नाव नाही!’ नोबेल समितीने ट्रम्पला चांगलेच सुनावले, जगभरात बनले हसू
4

Nobel Prize : ‘आम्ही आमचे पदक देऊ शकतो, पण नाव नाही!’ नोबेल समितीने ट्रम्पला चांगलेच सुनावले, जगभरात बनले हसू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.