UK PM News: ब्रिटनमध्ये नवा वाद! धोरणात्मक अपयश झाकण्यासाठी स्टारमर यांचा 'कामसूत्र' ड्रामा; पाहा VIRAL VIDEO ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Keir Starmer Kamasutra comment PMQs : ब्रिटीश (Britain) संसदेच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये सध्या एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे पंतप्रधान कीर स्टारमर (Keir Starmer) यांनी केलेले एक वादग्रस्त विधान. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान (PMQs) विरोधी पक्षनेत्या केमी बॅडेनोच यांनी सरकारच्या धोरणात्मक धरसोडीवर प्रश्न विचारले असता, स्टारमर यांनी चक्क ‘कामसूत्र’ या प्राचीन ग्रंथाचा संदर्भ देत विनोद केला. या विधानानंतर संसदेत काही काळ शांतता पसरली, तर सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेचा वर्षाव सुरू झाला आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल( होत आहे.
बुधवारी झालेल्या संसदेच्या सत्रात विरोधी पक्षनेत्या केमी बॅडेनोच यांनी सरकारवर ‘U-turns’ (धोरणात्मक माघार) घेतल्याचा आरोप केला होता. विशेषतः डिजिटल आयडी योजना अनिवार्य करण्यावरून सरकारने घेतलेल्या माघारीवर त्यांनी बोट ठेवले. याला उत्तर देताना पंतप्रधान स्टारमर म्हणाले, “गेल्या १४ वर्षात या लोकांनी (कंझर्व्हेटिव्ह) कामसूत्रापेक्षा जास्त वेळा आपली भूमिका (Positions) बदलली आहे. त्यामुळेच ते आता थकले आहेत आणि त्यांनी देशाला संकटात टाकले आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Poseidon Drone: पुतिनकडे आहे पाण्याखालील प्रलयकाळाचा अग्रदूत; जो कुठेही आणू शकतो 500 फूट उंचीची त्सुनामी, वाचा खासियत
स्टारमर यांचा हा विनोद जुना आणि वारंवार वापरलेला असला तरी, एका महिला खासदारासमोर आणि संसदेच्या गंभीर वातावरणात त्याचा वापर केल्याने वादाला तोंड फुटले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, स्टारमर यांनी केवळ विनोद केला नसून, तो विरोधी पक्षनेत्या केमी बॅडेनोच यांच्यासाठी अपमानजनक ठरला आहे. यामुळे पंतप्रधानांच्या नेतृत्व क्षमतेवर आणि त्यांच्या गांभीर्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Blimey. Did I really just hear Keir Starmer say this “They had more positions in 14 years than the Kama Sutra. No wonder they are knackered and they left the country screwed”#PMQs pic.twitter.com/h12ePONGk2 — Peter Stefanovic (@PeterStefanovi2) January 14, 2026
credit – social media and Twitter
कीर स्टारमर यांचे सरकार सध्या अनेक आघाड्यांवर टीकेचे धनी ठरत आहे. दरवर्षी ३ लाख घरे बांधण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात येत असलेल्या अडचणी, वाढता बांधकाम खर्च आणि ‘डिजिटल आयडी’ सारख्या वादग्रस्त योजना मागे घेतल्यामुळे जनतेमध्ये असंतोष आहे. या गंभीर मुद्द्यांवर ठोस उत्तर देण्याऐवजी पंतप्रधानांनी अशा प्रकारे विनोदाचा आधार घेतल्याने विरोधी पक्षाने त्यांना ‘असंवेदनशील’ म्हटले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Defense Deals: ‘आम्ही शस्त्रेही देऊ आणि तंत्रज्ञानही!’ जर्मनीच्या पंतप्रधानांनी भारताला दिली जागतिक बाजारपेठ हादरवणारी महाऑफर
संसदेतील या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी पंतप्रधानांना “टोने डेफ” (परिस्थितीचे गांभीर्य न समजणारे) म्हटले आहे. ब्रिटन सध्या आर्थिक आव्हानांशी झुंजत असताना देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीने अशा भाषेचा वापर करणे योग्य नाही, अशी भावना सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
Ans: विरोधी पक्षनेते केमी बॅडेनोच यांनी सरकारच्या धोरणात्मक बदलांवर (U-turns) टीका केली होती. त्याला उत्तर देताना स्टारमर यांनी त्यांच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकेची तुलना कामसूत्रातील 'पोझिशन्स'शी केली.
Ans: संसदेच्या गांभीर्याला न शोभणारे आणि एका महिला खासदारासमोर केलेले हे विधान असंवेदनशील आणि अपमानजनक मानले जात आहे.
Ans: केमी बॅडेनोच या ब्रिटनमधील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या कंझर्व्हेटिव्ह पार्टीच्या नेत्या आहेत.






