Canada Election 2025 Mark Carney announces Elections in Canada to be held on April 28
ओटावा: कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी 28 एप्रिल रोजी देशात निवडणूकांची घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी कॅनडावर टॅरिफ लादण्याच्या सतत दिलेल्या धमक्यांनंतर कार्नी यांनी हा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान कार्नी यांनी म्हटले आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना तोंड देण्यासाठी आपण एक मजबूत जनादेशाची स्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे पुढील महिन्यांत 28 एप्रिल रोजी कॅनडाच्या निवडणुका होतील असे मार्क कार्नी यांनी स्पष्ट केले आहे. सुरुवातीपासून त्यांनी अमेरिकेविरोधीत आक्रमक भूमिका ठेवली आहे. यामुळे त्यांच्या कार्यकाळात अमेरिका कॅनडा संबंध काय वळण घेईल हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे.
सध्या कॅनडा आणि अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयामुळे तणावपूर्ण संबंध आहेत.शिवाय ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकेचा 51 वां भाग बनण्याचा सल्लाही दिला होता. त्यांच्या या प्रस्तावामुळे कॅनडाचे माजी पंतप्रधान, कॅनडियन नागरिक आणि इतर महत्वपूर्ण व्यक्तींना मोठ्या प्रमाणात तीव्र आक्रोश दर्शवला होता. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिकच बिघडले. मार्क कार्नी यांच्या विधानातूनही हे दिसून येते की, दोन्ही देशांमधील संबंध अद्यापही गंभीर आहेत.
कार्नी यांनी 14 मार्च 2025 रोजी कॅनडाचे पंतप्राधान म्हणून शपथ घेतली. यावेळी त्यांनी ट्रम्पसोबत काम करण्याची आणि त्याचा आदराची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, 21 मार्च रोजी त्यांनी अमेरिकेविरोधात अधिक आक्रमक भूमिका स्वीकारली. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांना विरोध दर्शवला. कार्नी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यामुळे कॅनडाला मोठ्या संकटाचा सामाना करावा लागल्याचे म्हटले आहे.
कॅनडामध्ये 20 ऑक्टोबर 2025 मध्ये निवडणुका होणार होत्या, मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यामुळे मार्क कार्नी यांनी निवडणूक आणखी लवकर घेण्याचा निर्णय घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मजबूत जनादेशाची आवश्यकता मार्क कार्नी यांनी अदोरेखित केली. कार्नी यांच्या नेतृत्वाखाली लिबरल पक्षाला टांगला पाठिंबा मिळाला आहे.
नवनी सरकार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयाला योग्य आणि ठोस उत्तर देईल अशी आशा जनतेकडून व्यक्त केली जात आहे. शिवाय, विविध देशांसोबतच्या संबंधांनाच्या पुनरावलोकनाची प्रक्रिया देखील लवकरच सुरु होई. कॅनडाचे नवे सरकार आगामी निवडणुकांमध्ये आपल्या नागरिकांच्या आणि देशाच्या हितासाठी प्रभावी कार्य करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
मात्र, मार्क कार्नी यांच्या या निर्णयामुळे अमेरिका आणि कॅनडा संबंधामध्ये पुन्हा बिघाड होण्याची शक्यता आहे. मात्र, कॅनडाला त्यांच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आणि आर्थिक धोरणे मजबूत करण्यासाठी मजबूत जनादेशाची गरज आहे.