अणुऊर्जेचे स्वप्न अजूनही दूर! आशियाई देशांना लागते सर्वाधिक वीज; चीन आघाडीवर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय उर्जा संस्थेच्या (IAE) ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, 2025 पर्यंत आशियाई देशांचा जागतिक वीज वापराच्या प्रमाणात निम्मा वाटा आहे. यामध्ये चीनचा जागतिक वीज वापराच्या तीन तृतीयांश वाटा आहे. सध्या आशियामध्ये स्वच्छ उर्जेची मागणी वाढत आहे. परंतु वीजनिर्मितीसाठी मुख्य स्त्रोत म्हणून अद्याप कोळशाचाच वापर केला जातो. सध्या चीनसह 14 आशियाई देश वीजनिर्मितीसाठी कोळशावर अवलंबून आहे, मात्र गेल्या काही दशकांत हा वाटा दुप्पटीने वाढत आहे. मात्र अनेक देश, पवन उर्जा, सौर उर्जेच्या दिशेने पाऊल टाकत आहेत, परंतु या नैसर्गिक वायूंचा वापर जागतिक सरासरीपेक्षा कमी आहे.
आंतरराष्ट्रीय उर्जा संस्थेच्या अहवालानुसार, सध्या चीनमध्ये प्रचंड वीज मागणीची वाढ होत आहे. रिपोर्टनुसार, 1990 मध्ये चीनचा जागतिक वीज मागणीत केवळ 5% टक्के वाटा होता. मात्र, 2025 च्या अखेरीस हा वाटा वाढून 33% पर्यंत जाण्याची शक्यता आहे. सध्या चीन हा जगातील सर्वात मोठा वीज उत्पादक आहे. जगातील सर्वात जास्त वीज उत्पादक देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकेचे नाव येते. परंतु चीन अमेरिकेच्या दुप्पट वीज उत्पादन करतो.
वीज उत्पादनासाठी चीन सर्वाधिक जास्त वापर कोळशाचा करतो. रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये चीनने कोळशापासून 5. 339 टेरावाट तास (Terawatt-hour – एक ट्रिलियन वॅट-तास दर्शविणारे ऊर्जेचे एकक) 62% वीज निर्मिती झाली. सध्या चीन पर्यावरणपूरक स्त्रोतांचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आहे.
भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विद्युत उत्पादन करणारा देश आहे. सध्या भारत सरकारने अणुउर्जेच्या वापरावर लक्ष केंद्रित केले असून पुढील दोन वर्षांमध्ये यामध्ये 80% पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. 2023-24 मध्ये भारताने एकूण 1949 टेराव्हॅट तास, वीज निर्मिती केली होती. यातील 1,734 टेराव्हॅट तास उर्जा सरकारी कंपन्यांनी निर्मित केली होती. तसेच भारत जलविद्युत उर्जेचाही मुख्य क्षेत्रांमध्ये वापर करतो. जपान, दक्षिण कोरिया आणि चीनसारखे देशही अणु उर्जेच्या वापरावर भर देत आहेत.
सध्या आशियाई देश विजेच्या प्राथमिक स्त्रोतांसाठी कोळशावर अबलंबून आहेत. शिवाय, सौर, पवन आणि अणुउर्जेचा वापर जागतिक सरासरापेक्षा अद्यापही कमी प्रमाणात आहे. 2011 च्या फुकुशिमा दुर्घटनेनंतर जपानचे अणुऊर्जेवरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.
तसेच सौदी अरेबियातील विजेचा प्राथमिक स्त्रोत 2016 पासून तेलापासून बनणाऱ्या नैसर्गिक वायूकडे राहिला आहे, यामुळे वीज निर्यातीसाठी तेलाच्या उपलब्धतेत वाढ झाली आहे. तर भारतात 2000 पासून विजेचा वापरात दुप्पटीने वाढ झाली आहे. यामध्ये कोळसा, तेल आणि घन बायोमासाद्वारे वीज निर्मितीवर भर देण्यात येत आहे.