canada khalistan links 2019 to 2024 update news
Canada admits Khalistani funding : भारताने अनेकदा कॅनडावर आरोप केला आहे की तिथे खलिस्तानी दहशतवादी संघटनांना आश्रय दिला जातो. अनेक वर्षांपासून भारताने ही बाब आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उचलून धरली होती. मात्र यावेळी स्वतः कॅनडाच्या सरकारनेच आपल्या अधिकृत अहवालातून हे कबूल केले आहे की त्यांच्या भूमीवरून खलिस्तानी दहशतवाद्यांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे.
कॅनडाच्या अर्थ मंत्रालयाने नुकताच “मनी लाँड्रिंग आणि टेररिस्ट फायनान्सिंग रिस्क मूल्यांकन अहवाल २०२५” प्रसिद्ध केला आहे. या अहवालाच्या ६२व्या पानावर स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की पंजाबमध्ये हिंसक मार्गांनी स्वतंत्र खलिस्तान राज्य स्थापन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अतिरेकी संघटना कॅनडासह जगभरातून निधी उभारत आहेत. या अहवालात असेही सांगण्यात आले आहे की बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) आणि इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशन (ISYF) यांसारख्या दहशतवादी संघटनांना कॅनडामध्ये थेट किंवा अप्रत्यक्ष आर्थिक मदत मिळत आहे. या संघटनांचे नाव कॅनडाच्या फौजदारी संहितेअंतर्गत दहशतवादी संघटनांच्या यादीत आहे. तरीदेखील त्यांचे नेटवर्क कॅनडामध्ये सक्रिय असल्याचे तपास संस्थांना आढळले आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एबीपी न्यूजने केलेल्या धक्कादायक खुलास्यानुसार, २०१९ ते ऑक्टोबर २०२४ या पाच वर्षांत कॅनडाच्या सरकारने तब्बल १,०४५ हून अधिक खलिस्तानी दहशतवाद्यांना आपल्या भूमीवर आश्रय दिला होता. यामुळे कॅनडा ‘खलिस्तानी दहशतवाद्यांचा बालेकिल्ला’ बनला असल्याची टीका भारतात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेनंतर भारतानेही दिला ग्रीन सिग्नल? ट्रम्प यांनी PM मोदींचे कौतुक केल्यावर एस जयशंकर यांची पहिलीच प्रतिक्रिया
अहवालात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. कॅनडामधील खलिस्तानी संघटना देणग्यांच्या नावाखाली पैसा गोळा करतात. स्थलांतरित शीख समुदायाला धर्माच्या नावाने प्रलोभन देऊन देणग्या मागितल्या जातात. हा पैसा एनपीओ (Non-Profit Organisations) च्या माध्यमातून गोळा केला जातो आणि नंतर विविध खात्यांत हस्तांतरित करून दहशतवादी कारवायांसाठी वापरला जातो.
कॅनडाच्या अहवालात हे मान्य केले असले तरी, निधीचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे हे स्पष्टपणे नमूद केलेले नाही. मात्र भारतीय गुप्तचर संस्थांच्या सूत्रांनुसार, खलिस्तानी दहशतवादी संघटनांसाठी पैशाचा सर्वात मोठा ओघ ड्रग्ज नेटवर्कमधून येतो. कॅनडा व अमेरिका येथे चालणाऱ्या या अमली पदार्थांच्या रॅकेटमधून मिळणारा पैसा थेट दहशतवादासाठी वापरला जात असल्याचे पुरावे आधीही समोर आले आहेत.
In a significant development validating #India’s concerns about anti-India activities on Canadian soil, a new report from #Canada’s Department of Finance has, for the first time, officially acknowledged that #Khalistani extremist groups are operating in the country and receiving… pic.twitter.com/8Jr3eozXug
— IndiaToday (@IndiaToday) September 6, 2025
credit : social media
भारतीय सरकारने अनेक वेळा कॅनडाला इशारा दिला होता की त्यांच्या भूमीवरून भारताच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या कारवाया होत आहेत. पण तेव्हा कॅनडा सातत्याने या आरोपांना नाकारत होता. आता मात्र त्यांच्या स्वतःच्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे की भारताची चिंता रास्त होती.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ZAPAD maneuvers : ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारत आणि पाकिस्तानचे सैन्य पहिल्यांदाच एकत्र दिसणार; रशिया ठरला मधला दुवा
कॅनडाच्या या कबुलीजबाबानंतर आंतरराष्ट्रीय दबाव वाढण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) यांसारख्या जागतिक संघटना आता कॅनडावर कठोर कारवाईची मागणी करू शकतात. भारतासाठी ही एक मोठी राजनैतिक विजयाची बाब मानली जाते. खलिस्तानी दहशतवाद ही केवळ भारतापुरती समस्या नाही, तर संपूर्ण जगाच्या सुरक्षिततेसाठी तो एक गंभीर धोका आहे. कॅनडाने केलेल्या या खुलाशानंतर आता आंतरराष्ट्रीय समुदायाकडून अपेक्षा आहे की या नेटवर्कवर लगाम घालण्यासाठी ठोस पावले उचलली जातील.