ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच भारत-पाकिस्तानची सैन्य एकत्र, रशियामध्ये सुरू ऐतिहासिक युद्धसराव ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
zapad maneuvers : भारत आणि पाकिस्तान, हे दोन शेजारी देश गेल्या सात दशकांपासून कट्टर वैरी मानले जातात. फाळणीनंतर युद्ध, कारगिल संघर्ष, दहशतवाद, सीमावाद, सर्जिकल स्ट्राईक अशा अनेक घटनांनी दोघांचे संबंध तणावपूर्ण राहिले. मात्र “ऑपरेशन सिंदूर” संपल्यानंतर प्रथमच भारतीय आणि पाकिस्तानी सैन्य पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. ही घटना केवळ सामरिकदृष्ट्या नाही तर जागतिक राजकारणाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वपूर्ण ठरत आहे.
रशियामध्ये १ ते १७ सप्टेंबर दरम्यान ‘झापड’ बहु-राष्ट्रीय लष्करी सराव सुरू आहे. यात भारत, पाकिस्तान, रशिया, चीन यांच्यासह जवळपास २० देशांच्या सैन्याचा सहभाग आहे. भारतीय लष्कराची ७० सदस्यांची टीम या सरावासाठी रवाना झाली आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर प्रथमच रशिया असा बहु-राष्ट्रीय सराव आयोजित करत आहे. या सरावात दोन गट तयार केले जातात. सूत्रांच्या माहितीनुसार, भारताला रशियाच्या गटात तर पाकिस्तानला चीनच्या गटात ठेवले जाईल. तरीही रणांगणावर दोन्ही देशांच्या सैनिकांची उपस्थिती एकाच ठिकाणी असणे हे स्वतःमध्येच ऐतिहासिक आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘हा विजयाचा संदेश आहे…’अमेरिकेचा पुन्हा आक्रमक पवित्रा, ट्रम्प यांनी पेंटागॉनचे नामकरण ‘डिपार्टमेंट ऑफ वॉर’ का केले?
याआधी २०१८ मध्ये, रशियाच्या चेबरकुल (चेल्याबिन्स्क प्रांत) येथे झालेल्या एससीओ सरावात प्रथमच भारत आणि पाकिस्तानच्या सैन्याने एकत्र भाग घेतला होता. १९४७ च्या फाळणीनंतर हे पहिलेच पाऊल होते. त्यावेळीही परिस्थिती खूप संवेदनशील होती. २०१६ मधील सर्जिकल स्ट्राईकनंतर दोन्ही देशांतील तणाव उच्चांकावर होता, पण रशियाने मध्यस्थी करून सराव घडवून आणला होता.
भारत आज केवळ पाकिस्तान किंवा चीनसोबतच्या सीमावादापुरता मर्यादित नाही, तर जागतिक पातळीवर आपली लष्करी ताकद दाखवत आहे. सध्या भारतीय लष्कर एकाच वेळी अनेक आंतरराष्ट्रीय सरावांत सहभागी होत आहे.
अमेरिकेसोबत ‘युद्ध अभ्यास’ (१-१४ सप्टेंबर) अलास्कामध्ये सुरू आहे.
‘ब्राइट स्टार’ सराव इजिप्तमध्ये सुरू आहे, ज्यात भारतीय सैन्याच्या तिन्ही शाखा : सेना, नौदल आणि हवाईदल सहभागी आहेत.
यातून भारताने अमेरिकेसोबतची भागीदारी घट्ट केली असली, तरी रशियाशी असलेले जुने मैत्र जपण्याचीही संधी या सरावातून मिळत आहे.
🚨🚨🚨 Moscow presents Zapad 25 as a major Russia–Belarus 🇷🇺🇧🇾 strategic exercise. But behind the announcements, the image of strength collapses, it’s propaganda dressed up as military credibility. ▪️ Officially, 13,000 troops are said to participate. In reality, past Zapad… pic.twitter.com/MBgaf2OnJL — Russian Forces Spotter (@TiaFarris10) September 4, 2025
credit : social media
दुसरीकडे पाकिस्तानची परिस्थिती वेगळी आहे. आर्थिक संकटे, दहशतवादी कारवाया आणि राजकीय अस्थिरता यामुळे पाकिस्तानवर मोठे दडपण आहे. अशा वेळी रशियामध्ये होत असलेल्या या सरावात भाग घेणे म्हणजे पाकिस्तानसाठी स्वतःला ‘आंतरराष्ट्रीय मंचावर अजूनही महत्त्वाचा खेळाडू’ म्हणून दाखवण्याची एक संधी आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : एकाच पत्नीचे 15 पती, पंजाबहून इंग्लंडला पोहोचले सर्व जण मग कथेत आला एक अनोखा ट्विस्ट; पाहून पोलिसही थक्क
या सरावात भारत आणि पाकिस्तान एकत्र दिसणे म्हणजे दोन्ही देशांतील संबंध सुधारतीलच असे नाही. मात्र युद्धसराव हा संघर्षाऐवजी संवाद आणि समन्वयाचा संदेश देतो. रशियाने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे दोन्ही देशांना थेट लढाईच्या पलीकडे एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. भारत-पाकिस्तानचे सैन्य रणांगणावर समोरासमोर उभे राहिले की तणाव, वैर आणि संघर्षाचीच आठवण होते. पण रशियामध्ये सुरू असलेला हा बहु-राष्ट्रीय सराव दाखवतो की जागतिक पटलावर वैरापेक्षा सहकार्यालाच अधिक महत्त्व आहे. २०१८ प्रमाणेच २०२५ मधील हा प्रसंगही इतिहासात नोंदवला जाणार आहे.