नवीन वर्ष सुरु होताच जस्टिन ट्रुडोंचे बदलले तेवर; डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा म्हणाले...
ओटावा: जगभरात नवीन वर्षाचा उत्साह सुरु आहे. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असून देशभरातून लोक आपल्या कुटूंबीयांसोबत नवीन वर्षाचे स्वागत करत आहे. दरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी देखील आपल्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, ट्रुडो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच धमकी दिली आहे. ट्रम्प यांच्या कॅनडाला अमेरिकेच्या 51 वा भाग बनवण्याच्या प्रस्तावाला ट्रुडोंनी सडोतोड उत्तर दिले आहे.
जस्टिन ट्रूडो यांची सोशल मीडिया पोस्ट
जस्टिन ट्रूडो यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधित एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “ देशभर काउंटडाउन सुरू झाले आहे. तसेच तुम्ही देशात असाल किंवा परदेशात, 2025 तुमच्यासाठी नवीन आव्हाने आणि संधी घेऊन येईल, परंतु एक गोष्ट आम्हाला माहित आहे की, कॅनडा हा देश मजबूत आणि स्वतंत्र आहे. हा देश आमचे घर असून याचा आम्हाला अभिमान आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा कॅनडा.”
या पोस्टवरुन त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिला आहे की, कॅनडा एक स्वतंत्र्य राज्य असून त्याला अमेरिकेचा 51वा भाग बनवण्याचा त्यांचा कोणतीही हेतू नाही. सध्या ट्रुडोंच्या या पोस्ट बद्दल सर्वत्र चर्चा होत आहे.
The countdown is on across the country. Whether you’re home or homesick overseas, 2025 will bring new challenges and opportunities. But one thing we know: this nation is strong and free — and we’re proud to call it home.
Happy New Year, Canada. 🇨🇦
— Justin Trudeau (@JustinTrudeau) January 1, 2025
डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला 51 वा भाग बनण्याचा सल्ला दिल्यानंतर जस्टिन ट्रुडो यांनी त्यांच्या या प्रस्तावाला कोणतेही उत्तर दिले नव्हते. त्यानंतर ट्रम्प यांनी अनेकवेळा हा प्रस्ताव मांडला होता, मात्र ट्रुडोंनी मौन साधले होते. अगदी डोनाल्ड ट्र्म्प यांच्या भेटीसाठी गेल्यानंतर ट्रुडोंना त्यांनी गर्व्हनर म्हणून संबोधले होते. यामुळे राजकीय स्तरावर खळबळ उडाली होती. तसेच ट्रम्प यांचे ट्रुडोंवर त्यानंतरही वार चालूच होते.
ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकेचे राज्य बनवण्याची ऑफर दिली होती
ट्रम्प यांनी कॅनडा जर अमेरिकेचा भाग बनला तर त्यांच्या करात 60 टक्क्यांहून अधिक कपात केली जाईल, असे म्हटले होते. तसेच त्यांनी कॅनडाचा व्यापर क्षेत्रात विस्ताप बोईल आणि कॅनडाला अमेरिकेचे लष्करी संरक्षण देखील मिळेल असेही ट्रम्प यांनी म्हटले होते. ट्रम्प ने शनल हॉकी लीग (NHL) दिग्गज वेन ग्रेट्स्की यांनी देशाचे नेतृत्व करण्याचे सुचवले होते. ट्रम्प यांच्या या विधानामुळे जागतिक स्तरावर राजकीय खळबळ उडाली होती. हा जाणूनबुजून केलेला अपमान आहे का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता.