Photo Credit- Social Media Court Case on Trump: शपथविधीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; लैंगिक अत्याचार प्रकरण पडणार महागात
अमेरिका: अमेरिकेत 20 जानेवारीला सत्तापरिवर्तन होणार आहे. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पदाची शपथ घेणार आहेत. पण त्याआधीच त्याला फेडरल अपील कोर्टाकडून मोठा धक्का बसला. लैंगिक अत्याचार प्रकरणात ट्रम्प यांनी कोर्टात माफीसाठी अर्ज केला होता, तो कोर्टाने फेटाळला आहे. तसेच ट्रम्प यांना दोषी ठरवून त्यांच्यावर दंड ठोठावण्याचा निर्णयही कायम आहे. आता मानहानी आणि लैंगिक गैरवर्तन प्रकरणी ट्रम्प यांना 5 दशलक्ष डॉलर्सचा दंड भरावा लागणार आहे.
एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, कोर्टाने 1996 च्या या प्रकरणात ट्रम्प यांना दोषी ठरवले आहे. एका उच्चस्तरीय डिपार्टमेंटल स्टोअरच्या ड्रेसिंग रूममध्ये एका स्तंभलेखकाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी ट्रम्प दोषी आढळले आहेत. दुसऱ्या यूएस सर्किट कोर्ट ऑफ अपीलने सांगितले की मॅनहॅटन ज्युरीचा निकाल रद्द केला जाणार नाही. ई. जीन कॅरोल यांची बदनामी आणि लैंगिक अत्याचार केल्याबद्दल ट्रम्प यांना $5 दशलक्ष दंड भरावा लागेल.
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात न्यायालयाचा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा ते दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्याची तयारी करत आहेत. आपल्या आदेशात, यूएस सर्किट कोर्टाने जीन कॅरोलची बदनामी आणि लैंगिक शोषण केल्याबद्दल ट्रम्प यांच्यावर मॅनहॅटन ज्युरीने लादलेली US $ 5 दशलक्ष नुकसान भरपाई कायम ठेवली आहे. जीन कॅरोलने 2023 मध्ये एका चाचणीत साक्ष दिली होती की 1996 मध्ये एका मैत्रीपूर्ण बैठकीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक स्टोअरच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अशी कोणतीही घटना घडल्याचा वारंवार इन्कार केला आहे परंतु त्यांना न्यायालयाकडून वारंवार दणकेच मिळत आहेत. जीन कॅरोल या एले मासिकासाठी स्तंभलेखक आहेत. न्यायालयाने ट्रम्प यांना त्यांच्या लैंगिक शोषणासाठी US $ 2 दशलक्ष आणि मानहानीसाठी US $ 3 दशलक्ष नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
‘जर रोहित शर्मा कर्णधार नसता तर बहुतेक प्लेईंग इलेव्हनमध्ये जागादेखील मिळाली नसती
डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रवक्ते स्टीव्हन च्युंग यांनी सांगितले की, या प्रकरणात देण्यात आलेल्या 5 दशलक्ष डॉलर्सच्या नुकसानीच्या विरोधात ते अपील करणार आहेत.
पीडितेने 2023 मध्ये एका खटल्यादरम्यान साक्ष दिली होती. 1996 मध्ये एका बैठकीत ट्रम्प हिंसक झाले होते, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते. या घटनेशिवाय, न्यायालयाने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रौढ चित्रपट स्टार स्टॉर्मी डेनियलशी संबंधित प्रकरणात दोषी ठरवले होते. आता ट्रम्प 2025 मध्ये दुसऱ्यांदा शपथ घेण्याची तयारी करत आहेत. यापूर्वी त्याचे अपील अमेरिकेच्या फेडरल अपील कोर्टाने फेटाळले होते.