Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतासोबत बिघडलेले संबंध आणि ट्रम्प यांची भेट..; कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो लवकरच देणार राजीनामा

Justin Trudeau News: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो सध्या चर्चेचा विषय बनत आहेत. सध्या त्यांच्या राजीनाम्याची जागतिक स्तरावर चर्चा सुरु असून ते लवकरच पदाभार सोडू शकतात असे म्हटले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 06, 2025 | 11:57 AM
भारतासोबत बिघडलेले संबंध आणि ट्रम्प यांची भेट..; कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो लवकरच देणार राजीनामा

भारतासोबत बिघडलेले संबंध आणि ट्रम्प यांची भेट..; कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो लवकरच देणार राजीनामा

Follow Us
Close
Follow Us:

ओटावा: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो सध्या चर्चेचा विषय बनत आहेत. सध्या त्यांच्या राजीनाम्याची जागतिक स्तरावर चर्चा सुरु आहे. जस्टिन ट्रुडो आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असून लवकरच पदाभार सोडू शकतात असे म्हटले जात आहे. इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ट्रुडो सोमवारी( 6 जानेवारी) राजीनाम्याची घोषणा करु शकतात. लिबरल पार्टीतील अंतर्गत गोंधळ आणि पक्षातील सदस्यांच्या दबावामुळे ट्रुडो यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

कॅनडाटे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी 2015 मध्ये पहिल्यांदा निवडणूक जिंकून कॅनडाचे पंतप्रधानपद भूषवले. त्यानंतर 2019 आणि 2021 च्या निवडणुकांमध्येही त्यांनी लिबरल पार्टीला विजय मिळवून दिला. मात्र, सध्या परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रुडो सध्या मुख्य विरोधी पक्ष कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे नेते पियरे पॉइलीवर यांच्या तुलनेत 20 टक्क्यांनी पिछाडीवर आहेत. या घसरणीमुळे त्यांच्या नेतृत्वावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- बांगलादेशच्या ‘या’ निर्णयामुळे दहशतवादविरोधी लढाईवर प्रश्नचिन्ह; जागतिक स्तरावर खळबळ

राजीनाम्याचे कारण 

लिबरल पार्टीच्या अनेक सदस्यांनी म्हटले आहे की, जस्टिन ट्रुडो यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवणे कठीण आहे. यामुळे पक्षातील नाराजी वाढत असून काही सदस्यांनी खुलेपणाने त्यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. काही काळापूर्वी ट्रुडो यांना पदावरून हटवण्यासाठी सिग्नेचर कॅम्पेनही राबवण्यात आले होते. या प्रक्रियेदरम्यान ट्रुडो यांना अनेक कठोर प्रश्नांचा सामना करावा लागला. त्यामुळे राजीनाम्याचा दबाव वाढत गेला आहे. यामुळे जस्टिन ट्रुडो लवकरच राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

लिबरल पार्टीपुढील आव्हाने

जस्टिन ट्रुडो राजीनामा दिल्यास, लिबरल पार्टीला नव्या नेत्याची निवड करावी लागेल. सध्या पक्षाची स्थिती कमकुवत झाली असून नव्या नेतृत्वाशिवाय पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये यश मिळवणे कठीण होईल. जर ट्रुडोंनी राजीनामा दिला नाही, तर पक्षाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो, असा अनेकांचा विश्वास आहे.

भविष्यातील राजकीय परिणाम
जर ट्रुडो राजीनामा देतात, तर कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे नेते पियरे पॉइलीवर यांना कॅनडाच्या आगामी निवडणुकांमध्ये मोठा फायदा होऊ शकतो. लिबरल पार्टीसाठी हा मोठा टप्पा ठरू शकतो, ज्यामध्ये पक्षाला आपले संघटन मजबूत करावे लागेल आणि जनतेचा विश्वास पुन्हा मिळवावा लागेल. कॅनडाच्या राजकीय परिस्थितीत हा एक मोठा बदल ठरू शकतो. जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्यामुळे देशाच्या राजकारणात नवीन वळण येण्याची शक्यता आहे. लिबरल पार्टीला नव्या नेतृत्वाखाली आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाला टक्कर देण्यासाठी प्रभावी रणनीती आखावी लागेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- कोण होता एली कोहेन? ज्याचा इस्त्रायलने सीरियाकडून 60 वर्षांनंतर परत मागितला मृतदेह

Web Title: Canada pm justin trudeau to announce resignation today nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 11:29 AM

Topics:  

  • Canada
  • Justin Trudeau
  • World news

संबंधित बातम्या

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद
1

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा
2

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक
3

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात
4

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.