Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Explainer : कॅनडा खरंच अमेरिकेत विलिन होणार का? काय सांगतो इतिहास अन् दोन्ही देशाचं संविधान? वाचा सविस्तर

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर सर्वाधिक चर्चा आहे ती कॅनडाची. डोनाल्ड ट्रम्प यांनी कित्येक वेळा कॅनडाला अमेरिकेचं ५१ वं राज्य आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना गव्हर्नर म्हणून संबोधित केलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 08, 2025 | 06:11 PM
कॅनडा खरंच अमेरिकेत विलिन होणार का? काय सांगतो इतिहास अन् दोन्ही देशाचं संविधान? वाचा सविस्तर

कॅनडा खरंच अमेरिकेत विलिन होणार का? काय सांगतो इतिहास अन् दोन्ही देशाचं संविधान? वाचा सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर सर्वाधिक चर्चा आहे ती कॅनडा आणि जस्टिन ट्रूडो यांची. डोनाल्ड ट्रम्प यांनी कित्येक वेळा कॅनडाला अमेरिकेचं ५१ वं राज्य आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना गव्हर्नर म्हणून संबोधित केलं आहे. नाताळच्या मुहूर्तावरही त्यांनी याचा पुनरुच्चार केला. या प्रस्तावाचे फायदे सांगण्यासही ते विसरले नाहीत. ट्रुडो यांची त्यांच्या देशातील स्थिती चांगली नसताना ट्रम्प हे बोलत आहेत. दोन देशांमध्ये अशा प्रकारची चर्चा दशकांनंतर प्रथमच होत आहे. विशेषत: अमेरिकेतील पन्नास राज्यांपैकी अनेक राज्यांची अशीच रचना करण्यात आली आहे.

मैत्रीचा अंदाज त्यांच्या सीमेवरून येतो…

कॅनडा आणि अमेरिका ऐतिहासिकदृष्ट्या मैत्र देश आहेत. दोघांमध्ये जगातील सर्वात लांब असुरक्षित सीमा आहे, ज्यावर कोणताही वाद नाही यावरून त्यांच्या मैत्रीचा अंदाज लावता येतो. यावरून त्यांचा परस्पर विश्वास दिसून येतो. जरी वेळोवेळी दोघांमध्ये काही मतभेद होते, परंतु सर्वात मोठी बाब म्हणजे त्याचे मैत्री आणि शांततेचे संबंध. भाषा आणि संस्कृतीही त्यांना जोडून ठेवते. इमिग्रेशन आणि हवामान बदलासारख्या काही धोरणांवर दोघांमध्ये तणाव होता. पण आता हे बदलत आहे.

Special Story : भारताच्या SPADEX ने रचला इतिहास; इस्रोची ही अंतराळ मोहीम का आहे इतकी खास? वाचा सविस्तर

काय म्हणाले ट्रम्प?

डोनाल्ड ट्रम्प याच महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. याआधीही त्यांनी कॅनडाचे नेते जस्टिन ट्रुडो यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. प्रथम त्यांनी कॅनडावर शुल्क वाढवण्याची धमकी दिली. तसंच जर कॅनडाने अमेरिकेत सामील होण्यास सहमती दर्शवली तर शुल्क देखील माफ केले जाईल आणि कॅनडाला जागतिक दर्जाची लष्करी सुरक्षा देखील मिळेल. ट्रम्प यांच्या धमकीनंतर ट्रुडो त्यांना भेटण्यासाठी अमेरिकेत गेले पण ते रिकाम्या हातानी मायदेशी परतले. त्यानंतर ट्रम्प यांच्या ट्रुडो यांना गव्हर्नर म्हणण्यावरून चर्चा रंगली आहे.

कॅनडात प्रत्येकाची मान्यता आवश्यक

कॅनेडियन मीडिया नॅशनल पोस्टने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. त्यानुसार दोन्ही देशांनी एकत्र येण्याचा विचार केला तर ते संविधानाच्या माध्यमातूनच शक्य आहे. मात्र जर कॅनडाचा कोणताही भाग युनायटेड स्टेट्समध्ये सामील होऊ इच्छित असेल तर त्याला 1982 च्या संविधान कायद्याच्या कलम 41 अंतर्गत परवानगी घेणे आवश्यक आहे.

कोणा कोणाची संमती मिळवावी लागले

  • कॅनडाच्या संसदेकडून (सिनेट आणि हाऊस ऑफ कॉमन्स) संमती .
  • सर्व 10 राज्यांच्या विधानसभेची मंजुरी .
  • हे सोपे नाही कारण देशात अनेक पक्ष आणि अनेक मते आहेत. देशाचा एक छोटासा भाग वेगळा होत असेल तरी तो एकटा निर्णय घेऊ शकत नाही. त्यासाठीही या मोठ्या प्रक्रियेतून जावं लागणार आहे.
  • कॅनडाने अमेरिकेत विलिन होण्याची मंजुरी दिली तरी, अमेरिकेच्या संमतीचा विषयही महत्त्वाचा आहे.
अमेरिकेच्या राज्यघटनेच्या कलम 5 च्या कलम 3 मध्ये असे नमूद केले आहे की जर त्याला बहुमत असेल तर यूएस काँग्रेस आपल्या देशातील नवीन प्रांताचा समावेश करू शकते आणि त्यांना राज्याचा दर्जा देखील देऊ शकते. याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे हवाई हे ऑगस्ट १९५९ मध्ये अमेरिकेचे राज्य बनले. पण जर कॅनडा किंवा त्याचा कोणताही भाग विलिन करायचा असेल तर त्याआधी अमेरिकेच्या संसदेला इतर प्रांतांना राज्याचा दर्जा द्यावा लागेल.

Explainer : लोकशाही प्रक्रियेत विरोधी पक्षनेतेपद इतकं महत्त्वाचं का असतं? जनतेशी काय असतो संबंध? वाचा सविस्तर

डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया अर्थात वॉशिंग्टन डीसी ही देशाची राजधानी आहे, मात्र पूर्ण विकसित राज्य नाही. अनेक दिवसांपासून राज्य स्थापनेसाठी जोर धरला जात आहे, मात्र अद्याप त्यावर एकमत होऊ शकलेलं नाही. हे क्षेत्र कोणत्याही एका राज्याच्या नियंत्रणाखाली नसावे, संपूर्ण देशाचं प्रतिनिधी असावं, असे अमेरिकन संसदेचे मत आहे. पोर्तो रिको देखील त्याच प्रक्रियेत आहे परंतु यावरही अद्या एकमत होऊ शकलेलं नाही.

अमेरिकेने यापूर्वीही अनेक प्रांत विकत घेऊन स्वत:ची राज्य निर्माण केली आहेत. उदाहरणार्थ, 19व्या शतकात फ्रान्सकडून लुईझियाना विकत घेतले. यानंतरच मिसिसिपी नदीच्या पश्चिमेकडील अनेक भाग प्रथम अमेरिकन प्रदेश बनले आणि नंतर त्यांना राज्याचा दर्जा दिला. पण आता हे शक्य नाही. कॅनडा हा प्रचंड संपत्ती आणि राजकीय प्रभाव असलेला देश आहे आणि तो विकला जाऊ शकतो असे कोणतेही संकेत त्या देशाने कधीही दिलेले नाहीत.

1845 मध्ये टेक्सास अमेरिकेशी जोडले गेले. त्याआधी एक दशकापर्यंत टेक्सास मेक्सिकोचा भाग होता. मात्र नंतर येथे स्वातंत्र्यासाठी चळवळी झाल्या आणि 1836 मध्ये ते टेक्सास प्रजासत्ताक बनले. जवळजवळ एक दशक स्वतंत्र देश म्हणून काम केल्यानंतर त्याने स्वतः अमेरिकेत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली. वास्तविक या छोट्या देशाला मेक्सिको पुन्हा वरचढ ठरेल, अशी भीती होती. अमेरिकेने हा प्रस्ताव स्वीकारला आणि 1845 मध्ये टेक्सास हे अमेरिकेचे राज्य बनले. त्यामुळे सध्या कॅनडा आणि अमेरिकेत सुरू असलेल्या चर्चा खऱ्या ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: Canada really merge with us what is united states history and both countries constitution know it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2025 | 05:58 PM

Topics:  

  • Canada
  • Donald Trump
  • Justin Trudeau

संबंधित बातम्या

H-1B Visa : ट्रम्पच्या कडक व्हिसा नियमांचा धसका; अमेरिकेत घरातच अडकले भारतीय 
1

H-1B Visa : ट्रम्पच्या कडक व्हिसा नियमांचा धसका; अमेरिकेत घरातच अडकले भारतीय 

Israel Hamas War : ‘… वेळ संपत चाललीय’ ; नेतन्याहूंशी बैठकीनंतर ट्रम्प यांचा हमासला कडक इशारा
2

Israel Hamas War : ‘… वेळ संपत चाललीय’ ; नेतन्याहूंशी बैठकीनंतर ट्रम्प यांचा हमासला कडक इशारा

BRICS Gold Reserves: डॉलरच्या वर्चस्वाची उलटी गिनती सुरू? ब्रिक्सचा सोन्याकडे निर्णायक कल
3

BRICS Gold Reserves: डॉलरच्या वर्चस्वाची उलटी गिनती सुरू? ब्रिक्सचा सोन्याकडे निर्णायक कल

रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या मार्गावर? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4

रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या मार्गावर? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.