भारताच्या SPADEX ने रचला इतिहास; इस्रोची ही अंतराळ मोहीम का आहे इतकी खास? वाचा सविस्तर
अंतराळ संशोधनावर आधारीत हॉलिवूडच्या इंटरस्टेलर चित्रपटात डॉकिंग सिस्टम कशी काम करते याविषयी दाखवण्यात आलं आहे. अंतराळात एका यानातून दुसऱ्या यानात प्रवेश करण्यासाठी या सिस्टिमचा उपयोग केला जातो. अंतराळ मोहिमा वाढल्याने या सिस्टिमची अधिक गरज भासणार आहे. त्यासाठी भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने मोठं पाऊल उचललं आहे. ३० डिसेंबर रोजी याच्या चाचणीसाठी इस्रोने एक मिशन लॉंन्च केलं. नेमकी ही मोहीम काय आहे? आणि अंतराळात याचा कसा उपयोग होणार आहे, जाणून घेऊया…
भारताचं स्पॅडेक्स मिशन 30 डिसेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 11:00 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आलं. SPADEX म्हणजे स्पेस डॉकिंग प्रयोग. स्पेडेक्स मोहिमेचा उद्देश अवकाशयान ‘डॉक’ आणि ‘अनडॉक’ करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करणे आणि त्याचे प्रदर्शन करणे हा आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने दिलेल्या माहिती नुसार, PSLV-C60 रॉकेटच्या माध्यमातून स्पेडेक्स प्रक्षेपित करण्यात आलं.
स्पॅडेक्स मिशनमध्ये दोन लहान अंतराळयानांचा समावेश आहे. प्रत्येक यानाचं वजन अंदाजे 220 किलो असतं. PSLV-C60 रॉकेटद्वारे हे प्रक्षेपित केले जातील. पृथ्वीपासून 470 किलोमीटर वर हे उपग्रह प्रदक्षिणा घालतील. यापैकी, एक उपग्रह चेझर (SDX01) आणि दुसरा लक्ष्य (SDX02) आहे.या मोहिमेचा उद्देश डॉकिंग यशस्वी करणे, डॉक केलेल्या अवकाशयानामध्ये ऊर्जा हस्तांतरित करणे आणि अनडॉकिंगनंतर पेलोड ऑपरेट करणे हे आहे.
एका अंतराळयानाला दुस-या अंतराळात जोडण्याला ‘डॉकिंग’ म्हणतात आणि अंतराळात जोडलेले दोन अंतराळ यान वेगळे होण्याला ‘अनडॉकिंग’ म्हणतात. स्पॅडेक्स मिशन अंतर्गत, अंतराळ यानाला ‘डॉक’ आणि ‘अनडॉक’ करण्याच्या क्षमतेची चाचणी घेण्यात येणार आहे.भारताच्या अंतराळाशी संबंधित मोहिमांसाठी तंत्रज्ञान आवश्यक आहे. यामध्ये भारतीय अंतराळ स्थानकाची उभारणी आणि भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर पाठवणे यासारख्या योजनांचा समावेश आहे.
अंतराळात ज्यावेळी एखादी मोहीम पार पाडण्यासाठी अनेक रॉकेट प्रक्षेपित करणे आवश्यक असतं, त्यावेळी ‘इन-स्पेस डॉकिंग’ तंत्रज्ञान आवश्यक असतं. उदाहरणार्थ, स्पॅडेक्स मिशन अंतर्गत अंतराळात पाठवलेल्या दोन उपग्रहांपैकी एक चेझर (SDX01) आणि दुसरा लक्ष्य (SDX02)पृथ्वीभोवती प्रचंड वेगाने प्रदक्षिणा घालणार आहेत. दोन्ही एकाच कक्षेत एकाच गतीने बसवले जातील. त्याला ‘फार रेन्डेव्हस’ असंही म्हणतात.
स्पॅडेक्स मिशनच्या यशानंतर, भारत हा स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान असलेला जगातील चौथा देश बनला आहे. अंतराळात डॉकिंग करणं एक जटिल प्रक्रिया आहे.सध्या स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानाच्या बाबतीत फक्त अमेरिका, रशिया आणि चीन सक्षम मानले जातात.केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह म्हणाले होते की, हे मिशन स्पेस डॉकिंगमध्ये यश मिळवून भारताला विशेष देशांच्या यादीत स्थान मिळवून देईल.
ते म्हणाले की, “चांद्रयान-4” आणि भविष्यातील भारतीय अंतराळ स्थानकासारख्या दीर्घकालीन मोहिमांसाठी डॉकिंग तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. जितेंद्र सिंह यांनी देखील “गगनयान” मोहिमेसाठी हे तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण असल्याचं म्हटलं आहे.
या मोहिमेचा एक उद्देश डॉक केलेल्या अंतराळयानामधील शक्तीचे हस्तांतरण करणं आहे. स्पेस रोबोटिक्स सारख्या भविष्यातील प्रयोगांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बाजावणार आहे. याशिवाय, अंतराळयानाचे संपूर्ण नियंत्रण आणि अनडॉकिंगनंतर पेलोडचे ऑपरेशन यासारख्या गोष्टी देखील या मोहिमेच्या उद्दिष्टाचा भाग आहेत. स्पॅडेक्स PSLV चा चौथा टप्पा म्हणजे POEM-4 (PSLV ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल) प्रयोगांसाठी वापरण्यात येणार आहे.
२८,८०० किलोमीटर वेगाने फिरणाऱ्या ग्रहांना दोन उपग्रहांना डॉक करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे एक आव्हानात्मक काम असणार आहे.
चांद्रयान-4 मिशन LMV-3 आणि PSLV या दोन रॉकेटचा वापर करून वेगवेगळ्या उपकरणांचे दोन संच चंद्रावर प्रक्षेपित करण्यात येणार आहेत.हे यान चंद्रावर उतरेल, आवश्यक माती आणि खडकांचे नमुने गोळा करेल आणि पृथ्वीवर परत येईल. यातील प्रत्येक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेगवेगळी साधने तयार करण्यात आली आहेत. ही मोहीम यशस्वी झाली तर अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात भारताला खूप पुढे घेऊन जाईल. केंद्र सरकारने या योजनेला मान्यता दिली असून त्यासाठी 2104 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
२०४० पर्यंत मानवाला चंद्रावर उतरवण्याच्या दृष्टीने हे पुढचं पाऊल म्हणून पाहिलं जात आहे. या संदर्भात भारत सरकारच्या विज्ञान प्रसार संस्थेचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ टी.व्ही. व्यंकटेश्वरन यांनी मागील चांद्रयान मोहिमांचा हवाला देत बीबीसी तमिळशी संवाद साधला होता. या वेळी ते म्हणाले होते, “आता आम्ही सविस्तर अभ्यासासाठी चंद्राची माती आणि खडकांचे नमुने गोळा करणार आहोत.द्राच्या पृष्ठभागाचे नमुने गोळा करणे भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर 1967 पासून लागू असलेल्या चंद्र करारानुसार, कोणताही देश चंद्रावर मालकी हक्क सांगू शकत नाही. ज्या देशांनी चंद्रावरून नमुने आणले आहेत, त्यांना त्याचं संशोधन करण्याचा अधिकार आहे, हे दाखवून दिलं पाहिजे असंही ते म्हणाले.