Canada will impose a 25 percent tax on US goods say Justin Trudeau
ओटावा: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यपदाची सुत्रे हाती घेताच कॅनडा आणि मेक्सिकोतून होणाऱ्या आयातीवर 25 टक्के कर लादण्याचा निर्णय घेतला होता. तसेच चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 10 टक्के कर जाहीर केला होता. यामुळे अमेरिकेचे तीन्ही देशांत व्यापर युद्ध सुरु झाले होते. ट्रम्प यांनी या देशांमधून होणारी ड्रग्ज तस्करी थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला होता. ट्रम्प यांनी हा निर्णय आजपासून लागू केला आहे. याच पार्श्वभूमीवर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूंडोंनी ट्रम्प यांना मोठा इशारा दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या कर लादण्याच्या पार्श्वभूमीवरच पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी किंग चार्ल्स तिसरे यांची भेट घेतली, यादरम्यान त्यांनी कॅनडाच्या सार्वभोमत्व आणि स्वातंत्र्यवर चर्चा केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकेचा 51 वा भाग बनण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला कॅनडातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. कॅनडा एक सार्वभौम आणि स्वतंत्र देश असल्याचेही पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी म्हटले होते. मात्र, यावर कॅनडाचे राज्यप्रमुख यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ट्रूडो यांच्यासोबतच्या त्यांच्या भेटीने लक्ष वेधले आहे.
I met with His Majesty King Charles III this morning.
We spoke about matters of importance to Canadians — including, above all, Canada’s sovereign and independent future. pic.twitter.com/eVjWWiTrrr
— Justin Trudeau (@JustinTrudeau) March 4, 2025
ट्रूडो आणि किंग चार्ल्स यांची भेट
मंगळवारी (04 मार्च) ला ट्रूडो यांनी किंग चार्ल्स यांच्यासोबतचा एक फोटो आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला. यामध्ये त्यांनी म्हटले की, “ मी आज सकाळी महामहिम किंग चार्ल्स तिसरे यांची भेट घेतली”, त्यांनी लिहिले की, “ आम्ही कॅनडियन नागरिकांसाठी महत्त्वाच्या बाबींवर चर्चा केली, सर्वात महत्त्वाचे म्हणजे कॅनडाचे सार्वभौम आणि स्वतंत्र भविष्य यावर चर्चा करण्यात आली”.
ट्रुडो यांनी सांगितले की, बैठकीदरम्यान कॅनडाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांच्या नागरिकांसाठी देशाचे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याच्या रक्षणापुढे काहीही महत्त्वाचे नाही.
कॅनडाही अमेरिकवर तितकाच कर लादेल
डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडातून होणाऱ्या वस्तूंच्या आयातींवर 25 टक्के कर लादण्याचा निर्णय मागे घेतला नाही, तर कॅनडा अमेरिकेवर 30 अब्ज कॅनडियन डॉलर्सच्या किमतीच्या 25 टक्के कर लादेल. ट्रुडो यांनी म्हटले होते की, अमेरिकन वस्तूंवर प्रत्युत्तरात्मक कर 21 दिवसांच्या आत लादण्यात येईल. ट्रूडोंनी स्पष्ट केले की, अमेरिकेने हा निर्णय मागे घेतला नाही तर कॅनडा देखील त्यांच्यावर तितकाच कर लादेल.