Nijjar Murder Case: कॅनडा सरकारला मोठा धक्का; निज्जर हत्याकांड प्रकरणातील 4 आरोपींना मिळाला जामीन
ओटावा: सध्या कॅनडात पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय गोंधळ सुरु आहे. दरम्यान कॅनडाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. हरदीप सिंग निज्जर हत्त्या प्रकरणात कॅनडाने अटक केलेल्या चार आरोपींना जामीन मिळाला आहे. कॅनडाच्या सर्वोच्च न्यालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 फ्रेब्रुवारीला ठेवली आहे. कॅनडा पोलिसांकडे पुरावे नसल्यामुळे ते न्यायालयात हजर राहू शकले नाहीत, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने “स्टे ऑफ प्रोसीडिंग्स”च्या आधारे आरोपींना जामिनावर मुक्त करण्यात आले आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर गंभीर आरोप केलेल्या या प्रकरणात कॅनडा पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतरही न्यालयात हजेरी लावली नव्हती. यामुळे अटक करण्यात आलेल्या चार भारतीय आरोपींना जामिन मिळाला असून यामध्ये करण बरार, अमनदीप सिंग, कमलप्रीत सिंग आणि करनप्रीत सिंग यांचा समावेश आहे.
चार आरोपींना जामीन का मिळाला?
कॅनडा सरकारच्या कागदपत्रांनुसार, पोलिस न्यायालयात अनुपस्थित असल्याने आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 18 नोव्हेंबर रोजी याची पहिली सुनावणी झाली. पोलिसांच्या वागण्याकडे लक्ष देत न्यायालयाने आरोपींना जामिनावर सोडण्याचा आदेश दिला. सरकारी कागदपत्रांनुसार, आता हे चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात नाहीत.
मे 2024 मध्ये कॅनडा पोलिसांनी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी चार भारतीयांना अटक केली होती. करण बरार कमलप्रीत सिंग आणि करणप्रीत सिंग या तीन जणांना एडमंटनमधून अटक झाली होती. यांच्यावर फर्स्ट डिग्री हत्या आणि कट रचल्याचा आरोप होता. यानंतर अमरदीप सिंग याला 11 मे रोजी अटक करण्यात आली.
काय आहे हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरण ?
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची 18 जून 2023 रोजी कॅनडातील सरे येथे एका गुरुद्वाराबाहेर गोळी झाडून हत्या करण्यात आली. भारतात वॉन्टेड असलेल्या निज्जरवर 12 पेक्षा जास्त हत्या आणि दहशतवादी कृत्यांशी संबंधित गुन्हे दाखल होते. 1997 मध्ये तो कॅनडात पळून गेला. त्यानंतरही कॅनडा सरकारने त्याच्यावर कारवाई केली नाही. या हत्येनंतर भारत-कॅनडा संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला.
भारत-कॅनडा संबंधांतील तणाव
कनॅडाने 2024 मध्ये भारताविरोधात थेट भूमिका घेतली. त्यांनी भारताच्या राजनयिकांवर निज्जर हत्या प्रकरणात गुंतले असल्याचा आरोप केला. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनीही भारतावर आरोप केला की, त्यांच्या एजंटांचा या हत्येत हात आहे. भारताने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. सध्या जस्टिन ट्रुडो यांच्या राजिनाम्यानंतर कॅनडाच्या पंतप्रधानपदी कोण विराजमान होती आणि भारत-कॅनडा संबंधांमध्ये सुधारणा होईल का असा प्रशन उपस्थित होत आहे.