
Sheikh Hasina
Bangladesh News in Marathi : ढाका : सध्या बांगलादेशात (Bangladesh) भीषण परिस्थिती आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्यावरील आरोपांवर आज निकाल लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. ठिकठिकाणी स्फोट घडवून आणले जात आहे. देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. यामुळे पोलिस आणि सुरक्षा दलांना हाय अलर्ट जाी केला आहे.
बांगलादेशातील परिस्थितीत
बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये भीषण स्फोट घडवनू आणण्यात आले आहेत. रविवारी (१६ नोव्हेंबर) रात्री ढाकाच्या सेंट्रल रोडवरील पर्यावरण, वन आणि हवमान बदल मंत्र्यांच्या सल्लागाराच्या घरासमोर स्फोट (Blast) झाले आहेत. तसेच बांगला मोटर परिसरात कॉकटेल स्फोट झाला आहे. अनेक बसेसही पेटवण्यात आल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. आज बांगलादेशचे ICT न्यायालय शेख हसीना यांच्यावरील आरोपांवर निकाल देणार आहे.
अवामी लीगच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे की, या प्रकरणामध्ये हसीना यांना दोषी ठरवण्यासाठी अडथळा निर्माण केली जाईत. यामुळे हसीना यांच्या बांगलादेशात परतणे कठीण होईल. यामुळे या निकालामध्ये कोणही हस्तक्षेप करु नये यासाठी अवामी लीगचे लोक रस्त्यावर उतरले आहे.
शेख हसीना यांच्यावर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणा (ICT) अंतर्गत अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यावर मानवी गुन्ह्यांचे, हत्येचे, लोकांना बेपत्ता केल्याचे आरोप आहेत.
ICT अंतर्गत हसीना यांच्यावर पोलिस आणि सुरक्षा दलाचा आंदोलन थांबवण्यासाठी गैर-वापर केल्याचा आरोप आहे. यामध्ये हसीना यांनी पोलिस आणि सुरक्षा दलांना आदेश मारहाणीचे आदेश दिल्याचा, हत्येच्या आदेशाचा, लोकांवर अत्याचाराच्या आदेश दिल्याचा आरोप आहे.
तसेच २०२४ ऑगस्टमध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान त्यांच्यावर ड्रोन, हेलिकॉप्टर द्वारे हल्ल्याचे आदेश दिल्याच्या अमानवीय कृत्याचा आरोप हसीना यांच्यावर करण्यात आला आहे.
तसेच हसीना यांच्यावर आरोप असदुज्जझमान खान कमाल आणि चौधरी अब्दुल्ला अली यांच्यावर बेगम रोकेया विद्यापीठातील विद्यार्थी अबू सईद याच्या हत्येचा आरोप देखील करण्यात आला आहे.
ढाका येथे चंखरपुल भागात ६ निष्पाप विद्यार्थी व लोकांना मारल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच ढाका सोडण्यापूर्वी आशुलियामध्ये पाच जणांना गोळ्या झाडून त्यांना जाळण्याचा, तसेच एकाला जिंवत जाळण्याचा आरोपही हसीना यांच्यावर आहे.
एकूणच हसीना यांच्यावर हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या हत्येचा आणि लोकांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या या सर्व आरोपांमुळे हसीना यांना मृत्यूदंड देण्याची मागणी केली जात आहे. त्यांचा पासपोर्टही रद्द करण्यात आला आहे. अंतरिम चौकशी आयोगात २३ ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली होती, आज अंतरिम आयोगाच्या निर्णायवर ICT निकाल जाहीर करणार आहे.
Bangladesh Violence : पाच धमाके, १७ बस पेटवल्या…; बांगलादेशात पुन्हा पेटली हिंसाचाराची आग, का?