Russia-Ukraine War: मॉस्को बॉम्बस्फोटात रशियच्या न्यूक्लियर चीफचा मृत्यू; हत्येमागे युक्रेनचा हात असल्याचा दावा
मॉस्को: सध्या रशिया-युक्रेन युद्ध संघर्ष वाढतच चालला आहे. दरम्यान एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मास्कोत झालेल्या बॉम्ब स्फोटात रशियाच्या न्यूक्लियर चीफचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. अशी माहिती रशियाच्या तपास समिनतीने दिली.स्फोटाचे केंद्र क्रेमलिनपासून केवळ 7 किमी अंतरावर असल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
हत्येमागे युक्रेनचा हात असल्याचा दावा
तपास दलाच्या समितीने दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या अणु, जैविक आणि रासायनिक सुरक्षा दलाचे प्रमुख जनरल इगोर किरिलोव्ह यांच्या घराबाहेर हा स्फोट झाला. या स्फोटामुळे क्रेमिनलच्या सुमारे सात किलोमीटरपर्यंत नुकसान झाले. तसेच न्यूक्लियर चीफसह त्यांच्या सहाय्यकांचाही या बॉम्बस्फोटात मृत्यू झाला असल्याचे रशियाच्या तपास समितीने सांगितले.
इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या हत्येमागे युक्रेनचा हात असल्याचा दावा करण्यात आला आहे. युक्रेनची सिक्युरिटी सर्व्हिस (SBU) ही हत्या घडवून आणल्याचे म्हटले जात आहे. रशियन तपास यंत्रणांनी सांगितले की, स्फोटासाठी 300 ग्राम TNT चा वापर करण्यात आला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की आसपासच्या 4 मजली इमारतींच्या खिडक्यांचे काच फुटले.
4 महिन्यात 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, किरलोव यांच्या मृत्यूसह गेल्या 4 महिन्यामध्ये तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी मिसाईल तज्ज्ञ मिखाइल शेतस्की यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. तसेच तीन महिन्यांपूर्वी ड्रोन स्पेशलिस्ट कर्नल अलेक्सी कोलोमीतसेव मृत अवस्थेत आढळले होते.
कोण होते इगोर किरिलोव
इगोर किरिलोव हे रशियाच्या रेडिएशन, केमिकल आणि जैविक शस्त्र विभागाचे प्रमुख होते. त्यांनी 2024 साली युक्रेनवर डर्टी बम तयार करण्याचा आरोप केला होता. याशिवाय, त्यांनी अमेरिका आणि जॉर्जिया बॉर्डरवर बायोलॉजिकल प्रयोगशाळा चालवल्याचा आरोप देखील केला होता. युक्रेन सिक्युरिटी सर्व्हिसने किरिलोववर जंगमध्ये बॅन केमिकल शस्त्र वापरण्याचे आरोप करत त्यांना दोषी ठरवले होते. तसेच त्यांच्याविरुद्ध सजा सुनावण्यात देखील आली होती.
रशिया युक्रेन युद्ध
रशिया-युक्रेन युद्धानंतर जागतिक स्तरावर परमाणु शस्त्रांची पारदर्शकता कमी झाली आहे, अशी माहिती SIPRI ने सांगितले. 2021 मध्ये UNSC सदस्य देशांनी परमाणु शस्त्र कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, युद्धानंतर ही शस्त्रे हाय-अलर्ट वर असल्याची भीती व्यक्त केलीआहे. किरिलोव यांच्या हत्येनंतर रशियाने या हल्ल्याचा बदला घेण्याचे संकेत दिले असून, जागतिक पातळीवर तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे.