Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

China: नेपाळ-तिबेट सीमेवर 676 जणांचा बळी; चीनकडून पुराचे VIRAL VIDEO डिलीट, माहितीवर कडक सेन्सॉरशिप

China : Nepal Tibet मधील पुरामुळे झालेल्या ६७६ मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर, चीनवर व्हिडिओ हटवल्याचा आणि परदेशी पत्रकारांच्या प्रवेशावर निर्बंध घातल्याचा आरोप होत आहे. तिबेटमधील पूर वार्तांकनावर चीनने केलेल्या कारवाईमागील कारणे जाणून घ्या.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 30, 2026 | 02:31 PM
China deletes Tibet flood videos 2026 Nepal Tibet border flash flood glacial breach

China deletes Tibet flood videos 2026 Nepal Tibet border flash flood glacial breach

Follow Us
Follow Us:
  • माहितीवर कडक सेन्सॉरशिप
  • सरकारी माध्यमांचा एकतर्फी प्रचार
  • परदेशी पत्रकारांवर प्रवेशबंदी

नेपाळ आणि तिबेटच्या  सीमावर्ती भागात हिमनदी फुटल्यामुळे (Glacial Collapse) आलेल्या विनाशकारी महापुराने हाहाकार उडवून दिला आहे. या भीषण आपत्तीत नेपाळ आणि तिबेट मिळून ६७६ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून, तब्बल ३,००० हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत. मात्र, या महाविनाशाच्या काळात चीन सरकारवर पुन्हा एकदा माहिती दडपल्याचा आणि कठोर सेन्सॉरशिप (China Censorship) लागू केल्याचा गंभीर आरोप होत आहे. तिबेटमधील ग्यिरोंग काउंटी आणि सीमावर्ती भागातील स्थानिक रहिवाशांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेले भीषण पुराचे आणि भूस्खलनाचे व्हिडिओ चिनी प्रशासनाकडून तात्काळ डिलीट केले जात आहेत.

‘द न्यू यॉर्क टाईम्स’ आणि ‘द टेलिग्राफ’ या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, तिबेटमधील ग्यिरोंग पोर्ट (Gyirong Port) या मुख्य व्यापारी सीमा चौकीवर पुराचे पाणी आणि ढिगारा शिरल्याचा अत्यंत भीषण व्हिडिओ स्थानिकांनी चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला होता. परंतु, काहीच वेळात हा व्हिडिओ चिनी इंटरनेटवरून पूर्णपणे गायब करण्यात आला. सरकारी माध्यमांनी या व्हिडिओऐवजी केवळ एका स्थिर छायाचित्राचा (Still Image) वापर केला. चिनी नागरिक आणि जगासमोर केवळ सरकारला हवे असलेले आणि मदत कार्याचे फुटेज दाखवले जात असून, विनाशाची खरी तीव्रता लपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India Bhutan Railway: भारत आणि भूतान दरम्यान धावणार पहिली आंतरराष्ट्रीय ट्रेन; भारताच्या ₹4,000 कोटींच्या प्रकल्पाने चीन अस्वस्थ

मदत कार्यावर भर, पण विनाशाची आकडेवारी गायब

चिनी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत वृत्तपत्र ‘पीपल्स डेली’ आणि ‘शिन्हुआ’ या सरकारी वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आदेशानंतर चिनी लष्कर (PLA), आपत्ती व्यवस्थापन पथके, ड्रोन आणि हेलिकॉप्टर पूरग्रस्त भागात तैनात करण्यात आले आहेत. परंतु, या अहवालांमध्ये केवळ सरकारच्या मदत कारभाराची प्रशंसा केली जात आहे. तिबेटच्या बाजूला किती गावे वाहून गेली, किती लोकांचे घरे उध्वस्त झाली, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नाही. चीनने अधिकृतपणे आपल्या भागात केवळ ७ जणांचा मृत्यू आणि ५५० हून अधिक लोक बेपत्ता असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे नेपाळमध्ये ६६९ हून अधिक मृतदेह बाहेर काढण्यात आले असून २४०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत.

#World I China Censoring Tibet’s Flood Horror? Online Videos Vanish As Questions Grow Over Beijing’s Blackout#China #Tibet #Beijing #NaturalDisaster #InternationalNews https://t.co/Ip1UhBIuMb — News18 (@CNNnews18) August 29, 2026

credit – social media and Twitter

परदेशी पत्रकारांना तिबेटमध्ये प्रवेश करण्यास आणि तेथील नागरिकांशी दूरध्वनीवरून संवाद साधण्यास चिनी प्रशासनाने अत्यंत कडक प्रतिबंध घातले आहेत. १९५० च्या दशकात चीनने तिबेटवर ताबा मिळवल्यापासून हा भाग अत्यंत संवेदनशील मानला जातो. लंडनच्या ‘SOAS युनिव्हर्सिटी’च्या चायना इन्स्टिट्यूटचे संचालक स्टीव्ह त्सांग यांनी ‘द गार्डियन’शी बोलताना स्पष्ट केले की, “चीन तिबेटकडे केवळ राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहतो. त्यामुळे सरकारच्या सर्वोच्च पातळीवरील मंजुरीशिवाय तेथील कोणतीही खरी बातमी किंवा नकारात्मक चित्र बाहेर येऊ दिले जात नाही.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : North Korea च्या लष्करात किम जोंग उन यांचा मोठा सर्जिकल स्ट्राईक; संरक्षणमंत्र्यांची गच्छंती, नवीन शस्त्रास्त्रांची निर्मिती

नेपाळचे माजी खासदार अन् आंतरराष्ट्रीय समुदायाकडून प्रश्न उपस्थित

चीनच्या या अपारदर्शक कारभारावर शेजारील नेपाळमधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नेपाळचे माजी खासदार राजेंद्र बजगाईं यांनी चिनी प्रशासनावर टीका करताना म्हटले आहे की, “विनाशाचे आणि पुराचे व्हिडिओ इंटरनेटवरून हटवून चीन नक्की काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे? पुराचे पुरावे नष्ट केल्याने सत्य बदलणार नाही, उलट यामुळे चिनी प्रशासनाच्या हेतूवर गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.”

युएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) च्या माहितीनुसार, हिमनदीचा मोठा भाग कोसळल्यामुळे पाण्याचा प्रचंड लोंढा नदीपात्रात आला आणि काही मिनिटांतच सीमेवरील वस्त्या पाण्याखाली गेल्या. बचाव पथकांनी आतापर्यंत नेपाळमधून ३,७०० हून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. मात्र, सीमेच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या तिबेटमध्ये नेमकी किती जीवित आणि वित्तहानी झाली आहे, याचा अंदाज बांधणे चिनी सेन्सॉरशिपच्या कडक भिंतीमुळे अशक्य बनले आहे.

Web Title: China censors tibet nepal flood videos deleted foreign media restricted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • China
  • nepal
  • Nepal Flash Flood
  • World news

संबंधित बातम्या

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट
1

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट

Bangladesh: नवरात्रीच्या काळात बांगलादेशात मंदिरासमोर चिथावणीखोर कृत्य; मंदिरासमोर गायी कापून शिजवल्याचा गंभीर आरोप
2

Bangladesh: नवरात्रीच्या काळात बांगलादेशात मंदिरासमोर चिथावणीखोर कृत्य; मंदिरासमोर गायी कापून शिजवल्याचा गंभीर आरोप

Air India Saudi: सौदी अरेबियाला जाणारी सर्व उड्डाणे रद्द, एअर इंडिया, इंडिगोने जारी केली सूचना, प्रवाशांना रिफंड मिळणार का?
3

Air India Saudi: सौदी अरेबियाला जाणारी सर्व उड्डाणे रद्द, एअर इंडिया, इंडिगोने जारी केली सूचना, प्रवाशांना रिफंड मिळणार का?

Earthquake Prediction: चीन-ब्राझीलच्या शास्त्रज्ञांचे 12 पैकी 10 भूकंपांचे अंदाज ठरले अचूक; जाणून घ्या पृथ्वीच्या पोटातील हालचाली
4

Earthquake Prediction: चीन-ब्राझीलच्या शास्त्रज्ञांचे 12 पैकी 10 भूकंपांचे अंदाज ठरले अचूक; जाणून घ्या पृथ्वीच्या पोटातील हालचाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.