Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

XiJinping Health: 7 वर्षांनंतर भारत दौरा अन् अचानक बिघडली तब्येत; चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रकृतीबाबत चर्चांना उधाण

XiJinping Health : चायनीज डेमोक्रॅटिक पार्टी' (CDP) चे अध्यक्ष जी वानजुन यांनी दावा केला आहे की, भारतात झालेल्या ब्रिक्स परिषदेवरून परतताच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना सैन्य हेलिकॉप्टरने 'बीजिंग ३०१ रुग्णालयात' नेण्यात आले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 16, 2026 | 01:52 PM
Xi Jinping Health News Xi Jinping Beijing 301 Hospital BRICS Summit New Delhi Xi Jinping

Xi Jinping Health News Xi Jinping Beijing 301 Hospital BRICS Summit New Delhi Xi Jinping

Follow Us
Follow Us:
  • रुग्णालयात दाखल केल्याचा दावा
  • ब्रिक्स परिषदेतील अस्वस्थता
  • अधिकृत पुष्टी झालेली नाही

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ‘(XiJinping Health) यांच्या आरोग्याबाबत आंतरराष्ट्रीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर पुन्हा एकदा उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. चायनीज डेमोक्रॅटिक पार्टीचे (CDP) अध्यक्ष जी वानजुन (Wanjun Xie) यांनी दावा केला आहे की, भारतात आयोजित १८ व्या ब्रिक्स (BRICS) शिखर परिषदेत सहभागी होऊन बीजिंगला परतल्यानंतर शी जिनपिंग यांची प्रकृती अत्यंत बिघडली. या दाव्यानुसार, बीजिंग विमानतळावर उतरताच त्यांना लष्करी हेलिकॉप्टरच्या साहाय्याने थेट ‘बीजिंग ३०१ मिलिटरी हॉस्पिटल’ (PLA General Hospital) मध्ये नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर आपत्कालीन उपचार सुरू करण्यात आले.

जी वानजुन यांनी कथित प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने सांगितले की, जेव्हा शी जिनपिंग विदेश दौऱ्यावरून चीनमध्ये परततात, तेव्हा विमानतळावर अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती असते आणि रेड कार्पेटसह औपचारिक स्वागत केले जाते. मात्र, या वेळी विमानतळावर कोणताही औपचारिक सोहळा पार पडला नाही किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांची गर्दी नव्हती. जिनपिंग यांना अत्यंत गुप्ततेने थेट रुग्णालयात नेण्यात आले, ज्यावरून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे संकेत मिळतात.

ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी केली होती विचारपूस

नवी दिल्लीत पार पडलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पहिल्या सत्रादरम्यान राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग अस्वस्थ असल्याचे अनेक उपस्थितांच्या निदर्शनास आले होते. बैठकीत आपले भाषण सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही सेकंदांसाठी भाषण थांबवून जिनपिंग यांच्या अस्वस्थतेची दखल घेतली. पंतप्रधान मोदींनी जिनपिंग यांच्यासोबत असलेल्या भाषांतराकाराला (Interpreter) “ते ठीक आहेत का?” (Is it OK?) असा प्रश्न विचारला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Mecca Attack : सर्वात पवित्र मुस्लिम शहरावर ड्रोन हल्ला; मक्कामध्ये प्रथमच वाजली धोक्याची घंटा, 500हून अधिक जण दगावण्याची शक्यता

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये चीनी अधिकाऱ्याने जिनपिंग यांच्याजवळ जाऊन त्यांना काहीतरी दिल्याचे दिसते. काही भारतीय माध्यमांनी ही बाब मायक्रोफोन किंवा ट्रान्सलेशन उपकरणाशी संबंधित असू शकते असे म्हटले असले, तरी आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी जिनपिंग यांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Before the BRICS summit even concluded, Xi Jinping ended his visit to India and returned to Beijing ahead of schedule. When boarding the plane, Xi Jinping walked with difficulty, his steps faltering, his body repeatedly leaning to the left. All of this suggests that Xi Jinping is… pic.twitter.com/E4vM7clJhu — Wanjun Xie (@xie_wanjun) September 13, 2026

credit – social media and Twitter

पंतप्रधान मोदींच्या गाला डिनरला अनुपस्थिती

ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा पार पडली. मात्र, परिषदेच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी पंतप्रधान मोदींनी सर्व जागतिक नेत्यांसाठी आयोजित केलेल्या अधिकृत मेजवानीला (Gala Dinner) शी जिनपिंग यांनी हजेरी लावली नाही. चिनी शिष्टमंडळाने त्यांच्या अनुपस्थितीचे कोणतेही स्पष्ट कारण अधिकृतपणे जाहीर केले नाही, परंतु सूत्रांनुसार, थकवा आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी हॉटेलात विश्रांती घेणे पसंत केले. याशिवाय, विमानाच्या पायऱ्या चढताना त्यांचा डावा भाग कमकुवत दिसत असल्याचे आणि त्यांचा तोल जात असल्याचे काही छायाचित्रे व व्हिडिओंवरून समोर आले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : FTA Trade Deal: ‘अशक्य ही करून दाखवले…’; India-New Zealand मुक्त व्यापार मंजुरीनंतर पंतप्रधान लक्सन भावूक

दाव्यांची स्वतंत्र पडताळणी प्रलंबित

जी वानजुन आणि विरोधी गटांनी केलेले हे दावे किती खरे आहेत, याची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही. चीन सरकार, कम्युनिस्ट पार्टी किंवा बीजिंग ३०१ रुग्णालयाकडून शी जिनपिंग यांच्या आरोग्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अथवा वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. चीनमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि आरोग्याबद्दल कमालीची गुप्तता बाळगली जात असल्याने या दाव्यांमधील सत्यता पडताळणे कठीण बनले आहे.

Web Title: China president xi jinping health claims hospitalized after brics summit india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • Brics Council
  • World news
  • Xi Jinping China

संबंधित बातम्या

FTA Trade Deal: ‘अशक्य ही करून दाखवले…’; India-New Zealand मुक्त व्यापार मंजुरीनंतर पंतप्रधान लक्सन भावूक
1

FTA Trade Deal: ‘अशक्य ही करून दाखवले…’; India-New Zealand मुक्त व्यापार मंजुरीनंतर पंतप्रधान लक्सन भावूक

Mecca Attack : सर्वात पवित्र मुस्लिम शहरावर ड्रोन हल्ला; मक्कामध्ये प्रथमच वाजली धोक्याची घंटा, 500हून अधिक जण दगावण्याची शक्यता
2

Mecca Attack : सर्वात पवित्र मुस्लिम शहरावर ड्रोन हल्ला; मक्कामध्ये प्रथमच वाजली धोक्याची घंटा, 500हून अधिक जण दगावण्याची शक्यता

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?
3

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?

Iran War : युद्ध की पैशांचा महापूर? अमेरिकेने खर्च केले तब्बल ३३.४ अब्ज डॉलर
4

Iran War : युद्ध की पैशांचा महापूर? अमेरिकेने खर्च केले तब्बल ३३.४ अब्ज डॉलर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.