China to deploy peacekeeping force to Ukraine
बिजिंग: गेल्या तीन वर्षापासून रशिया-यूक्रेन युद्ध सुरु असून हे युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत चालेल आहे. जागतिक पातळीवर अमेरिकेसह अनेक देश युद्धथांवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. युरोपियन युनियन देश ब्रिटनने देखील मार्च महिन्याच्या सुरुवातीला कीव आणि मास्को यांच्या युद्धविरामासाठी युक्रेनमगध्ये शांतता सैन्य पाठवण्याचा प्रस्ताव युरोपियन देश आणि नाटो देशांसमोर मांडला होता. तसेच त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर देखील हा प्रस्ताव मांडला होता. दरम्यान रशियाने या प्रस्तावाला तीव्र विरोध केला होता.
मात्र, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनने या प्रस्तावाला सहमती दर्शवली असल्याचे म्हटले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सद्या बीजिंग युरोपियन भागीदारांशी याबाबत चर्चा करत असून यूक्रेनला पाठिंबा देण्याचा विचार करत आहे. चीनने यूक्रेनमध्ये शांतता सैन्या पाठवण्याचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे. ब्रिटन पंतप्रधानांच्या प्रस्तावामध्ये चीनचा सहभाग युक्रेनियनसाठी महत्वपूर्ण ठरु शकतो. यावर चीन पुनर्विचार करत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या निर्बंधांनंतर आणि युद्धादरम्यान चीनने रशियामध्ये मोठी गुंतवमीक केली आहे. अशा परिस्थितीत चीनचे सैन्य यूक्रेनमध्ये तैन्यात केल्यास हा रशियाचा विश्वाघात केल्यासारखे होईल. यामुळे रशियासोबतच्या संबंधांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. काही तज्ज्ञांनच्या म्हणण्यानुसार चीनच्या या हालचालींमुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा निर्णय काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या उत्पादनांवर 25% कर लागून केला आहे. तसेच अनेक कंपन्यांवरही निर्बंध लादले आहेत. चीन युरोपीय देशांमध्ये देखील उत्पादनांची निर्यात करतो. दरम्यान ब्रिटनच्या योजनेला पाठिंबा दिल्यास. यूक्रेनमध्ये सैन्य तैनात केल्यास चीन युरोपीय देशांमध्ये आपली प्रतिमा सुधारु शकतो. मात्र यामुळे रशिया-सोबत संबंध बिघडण्याची शक्यता आहे.
चीन आणि रशिया सर्वात मोठे व्यापारी भागीदार आहेत. रसियाने चीन, इराण आणि उत्तर कोरियासोबत भागीदारी ककुरन अमेरिकेच्या निर्बंधांना टाळण्याचा प्रयत्न केला आहे. याच रणनीचीचा वापर चीन करत आहे. चीन यूक्रेनमध्ये आपले सैन्य पाठवून युरोपीय देशांसोबत मैत्रीचा हात पुढे करत आहेत. मात्र यामुळे रशिया आणि चीनमध्ये तणावाची शक्यात आहे.