Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Currency War: डॉलरला चेकमेट अन् युआनचा उदय; शी जिनपिंग आणि ट्रम्पमध्ये सुरु झालाय इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक संघर्ष

Yuan vs Dollar: चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी जागतिक बाजारपेठेत अमेरिकन डॉलरसमोर एक मोठे आव्हान उभे केले आहे. चीन आता आपले चलन, युआन, हे जागतिक राखीव चलन बनवू इच्छित आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 01, 2026 | 07:36 PM
china us currency war xi jinping yuan challenge dollar trump tariffs 2026

china us currency war xi jinping yuan challenge dollar trump tariffs 2026

Follow Us
Follow Us:
  • डॉलरला थेट आव्हान
  • ट्रम्प विरुद्ध जिनपिंग
  • नवे आर्थिक पर्याय

US China Currency War 2026 : जगातील दोन महासत्ता असलेल्या अमेरिका आणि चीन यांच्यातील संघर्ष आता केवळ व्यापारापुरता मर्यादित राहिला नसून, तो थेट चलनाच्या वर्चस्वापर्यंत पोहोचला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (xi jinping) यांनी नुकताच आपला इरादा स्पष्ट केला असून, अमेरिकन (America) डॉलरला जागतिक बाजारपेठेतून हद्दपार करण्यासाठी त्यांनी ‘युआन’चा (RMB) पत्ता टाकला आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या ‘क्यूशी’ (Qiushi) या मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात जिनपिंग यांनी युआनला जगातील सर्वात शक्तिशाली ‘राखीव चलन’ बनवण्याचे आवाहन केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांना चिनी प्रत्युत्तर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हाती घेतल्यापासून चीनवर सातत्याने भारी आयात शुल्क (Tariffs) लादले आहेत. काही वस्तूंवर हे शुल्क चक्क १२५% ते १४५% पर्यंत नेल्याने चीनच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. याला उत्तर म्हणून चीनने केवळ अमेरिकन वस्तूंवर कर लादला नाही, तर डॉलरवरील आपले अवलंबित्व कमी करण्यास सुरुवात केली आहे. चीनला आता असे वाटते की, जोपर्यंत जागतिक व्यापारात डॉलरचा ६०% वाटा आहे, तोपर्यंत अमेरिका जगावर हुकूमत गाजवत राहील. त्यामुळेच जिनपिंग यांनी आता “युआनला मजबूत आणि आंतरराष्ट्रीय करा” असा आदेश दिला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Election : नेपाळमध्ये ‘MI-6’ चा गुप्त प्रवेश! माजी RAW एजंटचा खळबळजनक खुलासा; भारतावर होणार आघात?

कसे सुरू आहे ‘डी-डॉलरलायझेशन’?

चीन केवळ बोलत नाही, तर प्रत्यक्षात कृती करत आहे. मागील वर्षी चीनच्या ६.२ ट्रिलियन डॉलर्सच्या एकूण व्यापारापैकी तब्बल एक तृतीयांश व्यवहार हे युआनमध्ये झाले आहेत. रशियाकडून तेल आणि नैसर्गिक वायू खरेदी करताना चीन आता डॉलरऐवजी युआनमध्ये पैसे देत आहे. यासाठी चीनने रशियाच्या मदतीने CIPS (Cross-Border Interbank Payment System) ही नवीन यंत्रणा उभी केली आहे. ही यंत्रणा पाश्चात्य देशांच्या ‘SWIFT’ यंत्रणेला एक सक्षम पर्याय म्हणून समोर येत आहे.

China is steadily removing the dollar from its trade system. – Yuan trade settlement rose from ~12% in 2019
– It climbed to roughly 30% by 2024–2025
– That is a ~170% increase in 6 years
China has a dominant global role: – China is the biggest trade partner to most countries
-… pic.twitter.com/aHKaJWDTGY
— Lukas Ekwueme (@ekwufinance) January 30, 2026

credit – social media and Twitter

ब्रिक्स (BRICS) देशांची साथ आणि भविष्यातील संकट

चीनचे हे पाऊल केवळ स्वतःपुरते मर्यादित नाही. भारत, रशिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेसह १० सदस्य असलेल्या ‘ब्रिक्स’ (BRICS) गटामध्ये आता डॉलरऐवजी स्वतःचे सामायिक चलन किंवा स्थानिक चलनात व्यापार करण्यावर चर्चा सुरू आहे. जर ब्रिक्स देशांनी स्वतःची स्वतंत्र पेमेंट सिस्टम (BRICS Pay) सुरू केली, तर अमेरिकन डॉलरची जागतिक मागणी प्रचंड कमी होऊ शकते. हे घडल्यास अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसेल आणि जागतिक अर्थव्यवस्थेत चीनचा प्रभाव वाढेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert : युद्धाची ठिणगी महाभयानक आगीकडे! खमानेईंचा ट्रम्पना अंतिम इशारा; ‘हल्ला केला तर पूर्ण पश्चिम आशिया पेटवून देऊ’

आव्हाने अजूनही मोठी आहेत

शी जिनपिंग यांनी मान्य केले आहे की चीनची अर्थव्यवस्था मोठी आहे, पण ती अजून ‘मजबूत’ नाही. युआनला जागतिक दर्जा मिळवण्यासाठी चीनला आपले भांडवली बाजार अधिक खुले करावे लागतील आणि पाश्चात्य मॉडेल्सपेक्षा वेगळी, पण विश्वासार्ह आर्थिक यंत्रणा उभी करावी लागेल. ट्रम्प यांनी आधीच इशारा दिला आहे की, जर ब्रिक्स देशांनी डॉलरला आव्हान दिले तर अमेरिका त्यांच्यावर प्रचंड निर्बंध लादेल. यामुळे आगामी काळ हा जागतिक अर्थकारणासाठी अत्यंत संघर्षाचा ठरणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: 'डी-डॉलरलायझेशन' म्हणजे नक्की काय?

    Ans: आंतरराष्ट्रीय व्यापारात अमेरिकन डॉलरचा वापर कमी करून त्याऐवजी इतर स्थानिक चलनांचा (उदा. युआन, रुपी) वापर वाढवण्याच्या प्रक्रियेला डी-डॉलरलायझेशन म्हणतात.

  • Que: CIPS पेमेंट सिस्टम काय आहे?

    Ans: ही चीनने विकसित केलेली आंतरराष्ट्रीय पेमेंट यंत्रणा आहे, जी पाश्चात्य 'SWIFT' यंत्रणेला पर्याय म्हणून वापरली जाते.

  • Que: युआन डॉलरला पर्याय ठरू शकतो का?

    Ans: चीन ही जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था असल्याने युआनचा वापर वाढत आहे, मात्र डॉलरची विश्वासार्हता आणि व्याप्ती अजूनही युआनपेक्षा खूप जास्त आहे.

Web Title: China us currency war xi jinping yuan challenge dollar trump tariffs 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 07:36 PM

Topics:  

  • currency
  • Donald Trump
  • World War 3
  • Xi Jinping China

संबंधित बातम्या

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे
1

US-China Trade War: ‘प्रतिस्पर्धी नाही, भागीदार बना’; शी जिनपिंग यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे व्यापार करार दोन महिने पुढे

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!
2

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली
3

Trump vs US Media : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा धक्का; CNN सह 3 माध्यम संस्थांवरील बंदी अखेर उठवली

Trump-Xi Meet : रेड कार्पेट, 21 तोफांची सलामी अन् B-1 बॉम्बरची गर्जना; जिनपिंग यांचे USमध्ये जंगी स्वागत, चर्चेत 4 मोठे मुद्दे
4

Trump-Xi Meet : रेड कार्पेट, 21 तोफांची सलामी अन् B-1 बॉम्बरची गर्जना; जिनपिंग यांचे USमध्ये जंगी स्वागत, चर्चेत 4 मोठे मुद्दे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.