अंधःकारमय इतिहासाची पुनरावृत्ती? चीनमध्ये परेड तर अमेरिकेत पेंटागॉनमध्ये धडाधड पिझ्झा ऑर्डर 'हा' जगासाठी धोक्याचा इशारा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Potential War Signs : जगातील महाशक्तींच्या हालचालींवर नेहमीच लक्ष ठेवले जाते. कारण, त्यांच्या प्रत्येक हालचालींमध्ये केवळ राजकारण दडलेले नसते तर कधी कधी भविष्यात घडू शकणाऱ्या घटनांची चाहूलही मिळते. अलीकडेच घडलेली एक विचित्र बाब पुन्हा चर्चेत आली आहे ती म्हणजे “पेंटागॉन पिझ्झा इंडेक्स”. चीनमध्ये विजय दिनाच्या परेडची जोरदार तयारी सुरू असताना, अमेरिकेतील पेंटागॉन परिसरात पिझ्झाच्या ऑर्डरमध्ये अचानक वाढ नोंदवली गेली. पाहता साधेसे वाटणारे हे प्रकरण प्रत्यक्षात जगभरात चर्चेचा विषय बनले आहे. कारण असे मानले जाते की, जेव्हा जेव्हा अमेरिकेत आणीबाणी येते किंवा युद्धाची तयारी सुरू असते, तेव्हा पेंटागॉन व व्हाईट हाऊसजवळील पिझ्झा विक्रीत प्रचंड वाढ होते.
१९९० च्या दशकात सोव्हिएत रशियाच्या गुप्तचर संस्थांनी प्रथम हा पॅटर्न ओळखला. त्यांचे म्हणणे असे होते की, पेंटागॉन किंवा सीआयए मुख्यालयात अचानक २४ तास काम सुरू झाले, की कर्मचारी बाहेर जाऊन खाण्यास वेळ काढू शकत नाहीत. त्यामुळे ते पिझ्झासारखे फास्ट फूडच मागवतात. आणि त्याचा थेट परिणाम म्हणजे जवळच्या डोमिनोज किंवा इतर पिझ्झा आउटलेटवर प्रचंड ऑर्डर येऊ लागतात. हा योगायोग इतका ठळक होता की १९९१ मध्ये कुवेत-इराक युद्धाच्या आधीही डोमिनोज फ्रँचायझीने पिझ्झा विक्रीत झालेल्या अचानक वाढीचा उल्लेख केला होता. त्यामुळे त्याला पुढे “पेंटागॉन पिझ्झा इंडेक्स” असे नाव मिळाले.
#VantageOnFirstpost: As China showcased its military might with a grand parade, a curious trend emerged— a massive spike in pizza orders near the Pentagon. Is this just a coincidence, or does the so-called Pentagon Pizza Index reveal something deeper? @palkisu tells you. pic.twitter.com/L8wWee6BnL
— Firstpost (@firstpost) September 5, 2025
credit : social media
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेनंतर भारतानेही दिला ग्रीन सिग्नल? ट्रम्प यांनी PM मोदींचे कौतुक केल्यावर एस जयशंकर यांची पहिलीच प्रतिक्रिया
१९९८ : तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोग प्रक्रिया सुरू झाली तेव्हाही पेंटागॉनभोवती पिझ्झाच्या ऑर्डर्समध्ये वाढ झाली होती.
इराणवरील हल्ला : अमेरिकेने इराणवर कारवाई केली तेव्हाही डोमिनोजच्या ऑर्डर्स अचानक उंचावल्या.
इराक-इराण युद्ध : युद्धाच्या आधी पेंटागॉन परिसरातील पिझ्झा शॉप्समध्ये विक्री अनेक पटींनी वाढली.
यामुळे, पिझ्झा ऑर्डर्स वाढल्या की, कुठेतरी संकट उभे आहे किंवा मोठ्या कारवाईची तयारी सुरू आहे असे मानले जाऊ लागले.
चीनमध्ये नुकत्याच झालेल्या विजय दिनाच्या मिलिटरी परेडमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन यांची उपस्थिती ही जगासाठी पुरेशी धक्कादायक होती. याच काळात, म्हणजे १ आणि २ सप्टेंबर रोजी, व्हाईट हाऊसजवळ डोमिनोज विक्रीत अचानक वाढ नोंदवली गेली. त्यानंतर पेंटागॉन परिसरातही असामान्य प्रमाणात पिझ्झा ऑर्डर झाल्या. ही वाढ केवळ एक योगायोग आहे का? की खरोखरच अमेरिकेत कुठल्या मोठ्या निर्णयाची तयारी सुरू आहे? या प्रश्नाने जगभरातील माध्यमांचे लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावर तर “Trump is Dead” हा ट्रेंड काही दिवसांत अचानक वाढला. यामुळे राजकीय वातावरण आणखीच तापले.
गंमत म्हणजे, पेंटागॉन पिझ्झा इंडेक्स हे कोणतेही अधिकृत युद्ध संकेतक नाही. पण अनेकदा इतिहासाने दाखवून दिले आहे की, अशा वाढीमुळे काहीतरी मोठी घटना घडण्याची शक्यता असते. काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की, हे फक्त “वर्क कल्चर” आहे. आणीबाणीच्या वेळी कर्मचारी ऑफिसमध्ये अडकतात आणि त्यांना पटकन मिळणारा पर्याय म्हणजे पिझ्झा. त्यामुळे विक्री वाढते, आणि जग त्याला युद्धाची चाहूल मानते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘हा विजयाचा संदेश आहे…’अमेरिकेचा पुन्हा आक्रमक पवित्रा, ट्रम्प यांनी पेंटागॉनचे नामकरण ‘डिपार्टमेंट ऑफ वॉर’ का केले?
आजच्या जागतिक राजकारणात प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवले जाते. चीनची मिलिटरी परेड, रशिया-उत्तर कोरियाचे जवळ येणे, आणि त्याच वेळी पेंटागॉनमधील पिझ्झा ऑर्डर्स वाढणे या सर्व घडामोडींनी जगाला एक गंभीर प्रश्न विचारायला भाग पाडले आहे. आगामी काळात आपण मोठ्या संघर्षाच्या उंबरठ्यावर आहोत का? उत्तर अजून मिळालेले नाही, पण “पेंटागॉन पिझ्झा इंडेक्स” पुन्हा एकदा चर्चेत आलाय, हे मात्र नक्की.