Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East Conflict : मध्यपूर्वेतील संकटावर भारत मैदानात; २४ तासांत जयशंकर यांची अनेक देशांशी थेट चर्चा, जगात खळबळ

S. Jaishankar Diplomacy : पश्चिम आशियात युद्धाचा मोठा भडका उडाला आहे. यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने हालचाली सुरु केल्या आहेत. जयशंकर यांनी अनेक देशांशी थेट चर्चा केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 12, 2026 | 09:49 AM
S. Jaishankar

S. Jaishankar

Follow Us
Close
Follow Us:
  • मध्यपूर्वेतील संकटावर भारत मैदानात
  • २४ तासांत जयशंकर यांची अनेक देशांशी थेट चर्चा
  • जगाचे वेधले लक्ष
India Diplomatic Outreach: नवी दिल्ली : मध्यपूर्वेतील अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण यांच्या सुरु असलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या युद्धामुळे जगात नवे उर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने आपल्या कूटनीतिक हालचाली सुरु केल्या आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी गेल्या २४ तासांत पश्चिम आशिया ते युरोप राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद साधून ग्लोबल आउटरीच मोहिम राबवली आहे.

World War 3: इराण युद्धावर Donal Trump यांचा खळबळजनक दावा, “माझी इच्छा असेल तेव्हा युद्ध…”

मिळालेल्या माहितीनुसार, एस.जयशंकर यांनी गेल्या २४ तासांत फ्रान्स(Frace), जर्मनी, इराण (Iran) आणि दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशी थेट चर्चा केली आहे. या चर्चेदरम्यान जयशंकर यांनी मध्यपूर्वेतील बिघडणारी सुरक्षा परिस्थिती, संभाव्य मानतावादी संकट आणि जागतिक शांतता आणि स्थिरतेवर होणाऱ्या परिणामांवर चर्चा केली आहे.

इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत थेट चर्चा

संकटाच्या केंद्र असलेल्या इराणशी भारताने थेट संपर्क साधला. मंगळवारी (१० मार्च) जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री सैयद अब्बास अराघची यांच्याशी दीर्घ चर्चा केली. या चर्चेत मध्यपूर्वेतील परिस्थितीवर सतत संपर्कात राहण्याचे मान्य करण्यात आले. तणाव कमी करण्यासाठी भारत मध्यस्थीची भूमिका बाजवू शकतो असे संकेत या चर्चेतून व्यक्त केले जात आहेत.

A detailed conversation this evening with Foreign Minister @araghchi of Iran on the latest developments regarding the ongoing conflict. We agreed to remain in touch. — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) March 10, 2026

युरोपीय राष्ट्रांशी संवाद आणि शांततेचा प्रयत्न

एस. जयशंकर यांनी बुधवारी (११ मार्च २०२६) फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन-नोएल बॅरोट यांच्याशी फोनवर सविस्तर चर्चा केली. जयशंकर यांनी ही चर्चा प्रशंनीय झाल्याचे वर्ण केले. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले की दोन्ही राष्ट्रांमध्ये पश्चिम आशियातील (मध्यपूर्व) संघर्षावर
विचारांची देवाणघेवाण झाली.

Appreciate the exchange of assessments today with FM @jnbarrot of France on the West Asia conflict. Look forward to continuing it in person. — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) March 11, 2026

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यांनतर तणाव शिगेला पोहाचला आहे. यामुळे संभाव्य मानवी संकट टाळण्यासाठी विचारांची देवाण-घेवाण झाली. याशिवाय एस. जयशंतर यांनी जर्मनीचे परराष्ट्र मंत्री योहान वेडेफुल यांच्याशीही
चर्चा केली.

Exchanged views with FM @JoWadephul of Germany on the ongoing conflict in West Asia. @AussenMinDE — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) March 10, 2026

एस. जयशंकर यांनी युरोपियन युनियनच्या उपाध्यक्ष, परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरण संघाची उच्च प्रतिनिधी काजा कल्लास यांच्याशीही मध्यपूर्वेतील परिस्थितीवर संवाद साधला. ही चर्चा सफल झाल्याचे परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले.

Useful discussion with EU HRVP @kajakallas on the West Asia conflict and its repercussions. — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) March 11, 2026

उर्जा सुरक्षा आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर चिंता व्यक्त

याशिवाय जयशंकर यांनी दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चो ह्यून यांच्याशीही फोनवरुन चर्चा केली. या चर्चेत जागतिक उर्जा सुरक्षेवर भर देण्यात आला. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे कच्चा तेलाच्या किमती आणि जागतिक पुरवठा साखळीवरील परिणामांबाबात दोन्ही देशांनी चिंता व्यक्त केली. तसेच जागतिक शांतता आणि आर्थिक स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही राष्ट्रांनी सुरक्षा उपाययोजनांवर सहमती दर्शवली.

A good conversation with @FMChoHyun of RoK. Discussed advancing our bilateral agenda. As also the situation in West Asia, including its energy implications. — Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) March 10, 2026

Middle East War : युद्धामुळे जगाचा श्वास कोंडणार? होर्मुज खाडी बंद झाल्यास ‘हे’ मार्ग असतील शेवटचा आधार

💡

Frequently Asked Questions

  • Que: मध्यपूर्वेतील संघर्षावर भारताची काय भूमिका आहे?

    Ans: भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांच्या परराष्ट्र मंत्र्याशी थेट संवाद साधला आहे. शांतता आणि रानैतिक सहमतीने वाद सोडवण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरु आहेत.

  • Que: मध्यपूर्वेतील संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने कोणत्या देशांशी चर्चा केली ?

    Ans: या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने फ्रान्स, जर्मनी, दक्षिण कोरिया, रशियाच्या परराष्ट्र मंत्र्याशी चर्चा केली आहे. तसेच युद्धाच्या केंद्रस्थानी असलेल्या इराणशी देखील भारताने थेट संवाद साधला आहे.

Web Title: India diplomacy middle east conflict jaishankar talks many countries 24 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 08:59 AM

Topics:  

  • S. Jaishankar
  • US-Israel Iran War
  • World news
  • World War 3

संबंधित बातम्या

US Iran War : ‘आम्ही पहिल्याच तासांत युद्ध जिंकले होते’ ; ट्रम्प यांची इराणविरुद्ध विजयाची घोषणा, जगभरात खळबळ
1

US Iran War : ‘आम्ही पहिल्याच तासांत युद्ध जिंकले होते’ ; ट्रम्प यांची इराणविरुद्ध विजयाची घोषणा, जगभरात खळबळ

Al-Aqsa Mosque: ‘अल-अक्सा’चे दरवाजे उघडा, अन्यथा…’ युद्धाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ 8 इस्लामिक देशांनी इस्रायलविरुद्ध थोपटले दंड
2

Al-Aqsa Mosque: ‘अल-अक्सा’चे दरवाजे उघडा, अन्यथा…’ युद्धाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ 8 इस्लामिक देशांनी इस्रायलविरुद्ध थोपटले दंड

World War 3: ‘ते आधीच युद्धात उतरले होते..’ इराणच्या क्षेपणास्त्रांवर रशियाचा ‘ठसा’; तर संकटात भारताची ‘अशी’ स्मार्ट खेळी
3

World War 3: ‘ते आधीच युद्धात उतरले होते..’ इराणच्या क्षेपणास्त्रांवर रशियाचा ‘ठसा’; तर संकटात भारताची ‘अशी’ स्मार्ट खेळी

Oil Spill: जगावर इंधन संकट! इराणने पार केल्या सर्व मर्यादा; इराकच्या हद्दीत घुसून अमेरिकन जहाजांवर स्फोटकांचा पाऊस, VIDEO VIRAL
4

Oil Spill: जगावर इंधन संकट! इराणने पार केल्या सर्व मर्यादा; इराकच्या हद्दीत घुसून अमेरिकन जहाजांवर स्फोटकांचा पाऊस, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.