civil war broken out again in Sudan The issue is related to Islam's holy pilgrimage Mecca, read in detail
खार्तूम: एप्रिल 2023 मध्ये सुरु झालेले गृहयुद्ध सुदानमध्ये पुन्हा एकदा भडकले आहे. अलीकडचे सुदानमध्ये सशस्त्र दल (SAF) आणि रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) हे दोन गट आमने सामने आले. या दोन्ही गटांमध्ये तीव्र संघर्ष झाला. यामुळे 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पण हे युद्ध पुन्हा का उफाळून आले? तर यामागचे कारण म्हणजे दोन्ही गट सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, या संघर्षामध्ये सामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.
दरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गृहयुद्धासाठी केवळ हे दोन गट जबाबदार नसून यामध्ये काही बाह्य देशांनी आगीत घी ओतण्याचे काम केले आहे. काही बाह्य देशांनी या संघर्षात अप्रत्यक्षपण हस्तक्षेप केला असल्याचे मानला जात आहे. गेल्या दोन दशकांमध्ये सुदानचा मध्य आशियाई देशांशी सर्वाधिक संवाद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशेष करुन सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) या देशांची यामध्ये सक्रिय भूमिका असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
मीडिया रोपोर्टनुसार, सौदी अरेबिया आणि UAE ने सुदानमधील युद्धात आर्थिक आणि ल्ष्करी स्वरुपात पाठिंबा दिल्याचा आरोप दोन्ही देशांवर करण्यात आला आहे. मात्र, अद्याप या देशांनी उघडपणे हे आरोप मान्य केलेले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, 1956 पासून सौदी अरेबिया आणि सूदानचे संबंध दृढ आहेत. सूदानचे भौगोलिक स्थान मक्का आणि मदिना या इस्लामिक पवित्र स्थळांच्या जवळ असल्या कारणाने दोन्ही देशांमध्ये गेल्या अनेक काळापासन, ऐतिहासिकस, धार्मिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ आहेत.
संयुक्त अरब अमिराती(UAE) देखील नव्या सहस्राब्दीच्या सुरुवातीपासून आफ्रिकेत आर्थिक प्रभाव वाढवला आहे. विशेष करुन सुदानमध्ये पोर्ट लॉजेस्टिक क्षेत्रामध्ये UAE ने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. यामुळे सुदान अरब अमिरातीसाठी एक महत्वपूर्ण आघाडीचे शहर बनले आहे. दरम्यान 2015 मध्ये सौदीच्या नेतृत्वाखाली येमेनमधील हुथीबंडखोरांविरोधात लढण्यासाठी देखील 10 हजार सैनिकांचे पाठबळ सुदानला मिळाले होते. यामुळे सुदानी लष्कर आणि RSF दलांचे सौदी अरेबिया आणि UAE या आखाती देशांसोबत थेट संबंध निर्माण झाले.
2014-15 मध्ये ओमार अल-बशीर यांच्या नेतृत्वाखाली सौदी अरब आणि UAE सुदानींवर राजकीय प्रभाव वाढत गेला. 2019 नंतर बशीर यांच्या सत्तापालटानंतरही दोन्ही देशांनी आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयतन् केला. विशेष करुन सौदी अरेबियाने सुदानी लष्करप्रमुख अब्देल फत्ताह अल-बुहरान यांना पाठिंबा दिला, तर दुसरीकड UAE ने रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) चे प्रमुख डागालो उर्फ हेमेदती यांच्याशी संबहंध प्रस्थापित केले. या विरोधी पाठिंब्यामुळे सुदानमध्ये संघर्ष अधिक तीव्र झाला.
सध्या दोन्ही देशांच्या बाह्य पाठिंब्यामुळे पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आला असून हा संघर्ष केवळ आंतरिक राजकारणाचे परिणाम नसून, बाह्य शक्तींच्या प्रभावाच्या स्पर्धेचेही एक कटू उदाहरण बनले आहे.