Columbia Election : कोलंबियात गदारोळ! ट्रम्प-समर्थित उमेदवाराच्या विजयानंतर रस्त्यावर आग; आंदोलकांनी अमेरिकन झेंडे जाळले? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
३१ मे रोजी कोलंबियात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडली होती. परंतु या फेरीत कोणत्याही नेत्याला ५० टक्क्याहून अधिक मते न मिळाल्याने २१ जून रोजी पुन्हा फेर निवडणूक घेण्यात आली. यावेळी उजव्या विचारसरणीचे अबेलार्दो दे ला एस्प्रिएला यांचा विजय झाला. त्यांनी डाव्या विचारसरणीचे इव्हान सेपेदा यांचा अत्यंत कमी फरकारने परभव केला. अबेलार्दो यांना ४९.६५% तर इव्हान यांना ४८.७०% मते मिळाली.
अबेलार्दो यांना ट्रम्प समर्थित नेते मानले जाते. या निवडणुकीत ट्रम्प यांनी पाठिंबा दिला होता. त्यांच्या विजयामुळे अमेरिका आणि कोलंबितील संबंध सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु डाव्या विचारसरणीच्या लोकांनी निवडणुकीच्या निकालात अमेरिकन हस्तक्षेप झाल्याचा आरोप केला आहे. यामुळे विरोधकांनी अमेरिकन झेंडे जाळले असल्याचे सांगितले जात आहे.
निकाल जारी झाल्यानंतर निवृत्त होणारे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेत्रो यांनीही मतांची पुन्हा सखोल मोजणी करण्याची मागणी केली आहे. निवडणूक सॉफ्टवेअर हॅक झाल्याचा आरोप पेत्रो यांनी केला आहे. परंतु याबाबत कोणताही पुरावा देण्यात आलेला नाही.
अबेलार्डो स्वत:चा उल्लेख वाघ म्हणून करतात. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी सत्तेवर आल्यावर बंडखोर गटांशी शांतता चर्चा रद्द केली जाईल असे सांगितले होते. तसेच या बंडखोर गटांविरुद्ध लष्करी कारवाईची घोषणाही केली आहे. सध्या त्यांच्या या आक्रमक घोषणांमुळे कोलंबियात राजकीय आणि सामाजिक अशांतता पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोलंबियात बंडखोर गट गुरिल्लासोबत दहा वर्षांपूर्वी शांतता करार झाला होता. परंतु तरीही अनेक भारांमध्ये या टोळ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी करतात. कोलंबियातील काही विशिष्ट भागांमध्ये या गटांचे वर्चस्व अद्यापही संपुष्टात आलेले नाही. अशा परिस्थिती या गटाविरोधात लष्करी कारवाई आणखी अस्थिरता निर्माण करेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Tras los resultados, los vándalos petristas vuelven a mostrar su verdadero rostro.
No son opositores, son parásitos del Estado fallido que salen a las calles a sembrar destrucción, caos y violencia.
Basura humana que no respeta al pueblo, ni sus decisiones, ni sus… — Jhonf Fonseca (@Jhonffonseca) June 22, 2026






