Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा हिंदू मृत्यू सर्वाधिक? 1971 नंतर सध्याच्या बांगलादेशमधील हिंसाचारावर ‘या’ नेत्याने व्यक्त केली चिंता

Bangladesh Hindu Violence: भारत-बांगलादेश संबंध सध्या अधिकच चिघळले आहे. एकीकडे शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणावरुन वाद सुरु असतानाच भारतीय-अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती यांनी बांगलादेशातील हिंसाचारावर संताप व्यक्त केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 09, 2025 | 12:12 PM
'1971मध्ये सर्वाधिक हिंदूंचा मृत्यू...; बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराविरोधात भारतीय वंशाच्या खासदारांची तीव्र प्रतिक्रीया

'1971मध्ये सर्वाधिक हिंदूंचा मृत्यू...; बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराविरोधात भारतीय वंशाच्या खासदारांची तीव्र प्रतिक्रीया

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: भारत-बांगलादेश संबंध सध्या अधिकच चिघळले आहे. शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणावरुन पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. याचदरम्यान भारतीय-अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी बांगलादेशातील हिंदू आणि इतर धार्मिक अल्पसंख्यांकावर होणाऱ्या हिंसारावर कडाडून टीका केली आहे. अमेरिकी प्रतिनिधी सभेत संबोधित करताना कृष्णमूर्ती यांनी धार्मिक अत्याचारांविषयी चिंता व्यक्त केली आणि शेख हसीना यांच्या पदत्यागानंतर हिंदूंवरील वाढत्या हल्ल्यांबद्दल आपले विचार मांडले.

1971ची आठवण

राजा कृष्णमूर्ती यांनी 1971 च्या बांगलादेश स्वातंत्र्य संग्रामाच्या काळातील हत्याकांडाची आठवण करून दिली. त्यांनी म्हटले की, “त्या वेळी सुमारे 3,00,000 ते 30 लाख लोकांचा बळी गेला होता आणि बहुतांश हिंदूंचा यामध्ये समावेश होता.” आजही पुन्हा एकदा हिंदूंनाच लक्ष्य केले जात आहे. त्यांच्या घरांवर आणि व्यसायंवर हल्ले होत आहेत, मंदिरांमध्ये तोडफड करण्यात येत आहे. बांगलादेश अधिक हिंसक बनत चालला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- युद्धादरम्यान इस्रायलने जारी केला वादग्रस्त नकाशा; हमास आणि अरब देशात तीव्र आक्रोश, नेमकं प्रकरण काय?

शेख हसीना यांच्यानंतर हिंसाचारात वाढ

कृष्णूर्ती यांनी शएख हसीना यांच्या देश सोडून गेल्यानंतर हिंसाचारात वाढ झाली असल्याचे म्हटले आहे. त्यांनी मोहम्मद युनूस सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “शेख हसीना यांनी पद सोडल्यानंतर धार्मिक अल्पसंख्यांवर हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. फक्त ऑगस्ट 2024 च्या महिन्यात 2,000 हून अधिक घटनांची नोंद झाली असून हे धक्कादायक आहे.” त्यांनी अमेरिकी परराष्ट्र विभागाशी यावर चर्चा केल्याचे सांगितले आणि पुढील कारवाईसाठी आव्हान केले.

तसेच कृष्णमूर्ती यांनी बांगलादेशातील अल्पसंख्यांकांना संरक्षण देण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. त्यांनी 1971 चा काळ पुन्हा येऊ नये असे म्हटले. तसेच धार्मिक अल्पसंख्यकांवरील हल्ल्यांना आळा घालण्यासाठी आपण त्वरित पावले उचलली पाहिजेत, असेही ते म्हणाले.

अंतरिम सरकारच्या काळात कट्टरवादाचा उदय

ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना यांनी पद सोडल्यावर नोबेल शांतता पुरस्कार विजेते मुहम्मद यूनुस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारची स्थापना करण्यात आली. मात्र, या सरकारच्या कार्यकाळात कट्टरतावादी शक्तींना अधिक बळ मिळाले असून, अल्पसंख्यांक समुदाय आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य केले जात आहे.

बांगलादेशातील हिंदूंच्या मंदिरांवर हल्ले होत असून त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येत आहे. अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी पावले उचलण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप होत आहे. राजा कृष्णमूर्ती यांच्या या विधानाने जागतिक समुदायाचे लक्ष बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या स्थितीकडे वेधले आहे आणि त्वरित उपाययोजनांची मागणी जोर धरत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- जगातील ‘या’ देशात सापडली 8 हजार वर्षांपूर्वीची रहस्यमय आकृती; एलियन अस्तिवाचा पुरावा?

Web Title: Congressman raja krishnamurthy speaks against violence on hindu in bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2025 | 12:07 PM

Topics:  

  • America
  • Bangladesh
  • World news

संबंधित बातम्या

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण
1

US Tariff : डोनाल्ड ट्रम्पने भारतावर का लादला टॅरिफ बॉम्ब? व्हाइट हाउसने स्पष्टच सांगितले कारण

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये
2

BRICS Rupee Trade : भारतासाठी सुवर्ण क्षण! BRICS देशांचा मोठा निर्णय, व्यापार होणार डॉलरऐवजी ‘Indian Rupee’मध्ये

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
3

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
4

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.