जगातील 'या' देशात सापडली 8 हजार वर्षांपूर्वीची रहस्यमय आकृती; एलियन अस्तिवाचा पुरावा? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कुवैत: एलियन हा विषय नेहमीच मानवासाठी कुतूहलाचा केंद्रबिंदू राहिला आहे. आत्तापर्यंत अनेकठिकाणी एलियन्स अवशेष सापडेले, तर कोणी युएफओ पाहिल्याचे अनेक घटना समोर आल्या. मात्र, याबाबत ठोस काही पुरावे अद्याप सापडलेले नाही. सध्या कुवैतमधील सुबिया भागात उत्खननादरम्यान सापडलेली एक रहस्यमय आणि प्राचीन मातीची बनवलेली मानवाकृती खूप चर्चेत आली आहे. या मूर्तीचा संबंध एलिन्सशी असल्याचे म्हटले जात आहे.
तज्ञांनी दावा केला आहे की, ही आकृती सुमारे 8000 वर्षे जुनी आहे. वारसॉ विद्यापीठ आणि कुवैती-पोलिश ऐतिहासिक मिशनने दिलेल्या माहितीनुसार, ही कलाकृती बहरा-1 नावाच्या पुरातत्वीय स्थळावर सापडली आहे, जे अरब प्रायद्वीपातील सर्वात प्राचीन आणि मोठ्या वसाहतींपैकी एक मानले जाते. मात्र याचा संबंध एलिन्सशी जोडला जात आहे.
प्राचीन उबैद संस्कृतीशी संबंध
असे मानलेजात आहे की, ही आकृती प्राचीन मेसोपोटामियाच्या उबैद संस्कृतीशी संबंधित असून, ही कांस्ययुगापूर्वीची असल्याचे म्हटले आहे. पुरातत्वतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही मूर्ती सुमारे सहाव्या सहस्रक ईसा पूर्वकाळात तयार करण्यात आली होती. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची लांबट खोपडी, तिरक्या डोळ्यांची रचना, आणि चपट्या नाकाचा आकार. या विशिष्ट लक्षणांमुळे ती त्या काळातील अन्य उबैद मूर्तींपेक्षा पूर्णपणे वेगळी वाटते.
एलियनशी संबंधाबाबत अंदाज
ही मूर्ती एलियनशी संबंधित असल्याच्या अंदाज अनेक लोकांनी लावला आहेत. काहींच्या तज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही कलाकृती एलियन्सचा पुरावा असू शकते आणि यामुळे हे सिद्ध होईल की सात ते आठ हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर एलियनचे अस्तित्व होते. मात्र, या दाव्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध करण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.
बहरा स्थळावर सापडली मूर्ती
बहरा-1 स्थळ हे अरब नवपाषाण संस्कृती आणि प्राचीन मेसोपोटामिया व अनातोलिया यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाण समजण्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. येथे प्राचीन मातीच्या भांड्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असे. उत्खननादरम्यान सापडलेल्या भांड्यांमध्ये वनस्पतींचे पुरावे मिळाले आहेत, जे या क्षेत्रातील प्राचीन सभ्यतेबद्दल महत्त्वाची माहिती देऊ शकतात.
पुरातत्त्वतज्ज्ञांचे मत
डॉ. रोमन होवसेपियन यांनी या शोधाबाबत सांगितले की, प्राथमिक विश्लेषणात स्थानिक मातीच्या भांड्यांमध्ये जंगली वनस्पतींचे चिन्ह आढळले आहेत. हे पुरावे बहरा-1 स्थळाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वाला अधिक अधोरेखित करतात. या क्षेत्रातील शोधांमुळे प्राचीन काळातील संस्कृतींच्या देवाणघेवाण प्रक्रियेला नवीन दृष्टिकोन मिळण्याची शक्यता आहे. 8000 वर्षे जुन्या या आकृतीने प्राचीन संस्कृती, कला, आणि संभवित एलियन अस्तित्वाबद्दल अनेक प्रश्न उभे केले आहेत. जरी हे दावे सिद्ध होण्यासाठी आणखी संशोधनाची गरज असली, तरी या शोधामुळे मानवाच्या प्राचीन इतिहासाच्या अभ्यासाला नवीन दिशा मिळाली आहे.