युद्धादरम्यान इस्रायलने जारी केला वादग्रस्त नकाशा; हमास आणि अरब देशात तीव्र आक्रोश, नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जेरुसेलम: सध्या गाझापट्टीवर इस्त्रायल हमास युद्ध सुरु असून हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता आहे. यामागचे कारण म्हणजे, इस्त्रायलने एक वादग्रस्त नकाशा जारी केला आहे. यामुळे हमास आणि अरब देशांनी तीव्र आक्रोश व्यक्त केला आहे. या नकाशात ग्रेटर इस्त्रायलच्या क्षेत्रामनध्ये कब्जा केलेल्या फिलिस्तीनी प्रदेशांचा आणिशेजारील अरब देशांच्या भूमींचा समावेश दाखवण्यात आला आहे.
यामुळे अरब देशांमध्ये आणि हमासमध्ये तीव्र संतापाची लाट उफाळून आली आहे. इस्त्रायलच्या या नाकाशामुळे मध्ये पूर्वेत मोठा कूटनीतिकवाद उभा झाला आहे.
इस्त्रायलचे साम्राज्य 3 हजार वर्षापूर्वीचे
इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने अरबी भाषेतील ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “तुम्हाला माहीत आहे का की इस्त्रायलचे साम्राज्य 3000 वर्षांपूर्वी स्थापन झाले होते?” या नकाशाच्या माध्यमातून इस्त्रायलने त्यांच्या प्राचीन त्यांच्या साम्राज्याच्या हक्काचा दावा पुन्हा एका दा उचलून धरला आहे. मात्र, या नकाशावर फिलिस्तीन आणि अन्य अरब देशांनी कठोर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
هل تعلم ان مملكة إسرائيل كانت قائمة منذ 3000 سنة؟
أول ملك حكمها لمدة 40 عاما كان الملك شاؤول (1050–1010) ق. م. ثم تلاه الملك داود الذي حكمها 40 عاما تقريبا (1010-970 ) ق.م. وعقبه الملك سليمان الذي حكم ايضا لمدة 40 عاما في الفترة (970-931) ق.م.
دام حكم الملوك الثلاثة… pic.twitter.com/xK7jjORdOK
— إسرائيل بالعربية (@IsraelArabic) January 6, 2025
अरब देशांची प्रतिक्रिया
अरब देशांनी या नकाशाला त्यांच्यावर होणारा सार्वभौमत्वाचा थेट हल्ला मानले असून, त्यांनी इस्त्रायलच्या विस्तारवादी धोरणाचा पुरावा असल्याचे म्हटले आहे. जॉर्डन, संयुक्त अरब अमिरात (UAE), आणि कतार यांनी इस्त्रायलच्या या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. जॉर्डनच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा नकाशा फिलिस्तीनी राज्याच्या स्थापनेला अडथळा निर्माण करण्यासाठी प्रचाराचा भाग असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारचे नकाशे प्रादेशिक शांततेच्या प्रयत्नांना धक्का पोहोचवू शकतात असे अरब देशांचे म्हणणे आहे.
कतारने इस्त्रायलच्या या कृतीला आंतरराष्ट्रीय नियमांचा गंभीर उल्लंघन म्हटले आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने या नकाशामुळे क्षेत्रीय शांतता धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाने त्यांची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी पार पाडावी, अशी मागणी केली आहे. संयुक्त अरब अमिरातने (UAE) या नकाशाला कब्जा विस्ताराचा एक जाणूनबुजून प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. त्यांनी हे क्षेत्रीय स्थिरता आणि शांततेसाठी गंभीर अडथळा असल्याचे सांगितले.
फिलिस्तीनी प्रशासन व हमासचा संताप
फिलिस्तीनी प्रशासन आणि हमास यांनीही या नकाशावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी इस्त्रायलच्या या कृतीला त्यांच्या विस्तारवादी धोरणाचा एक भाग मानले असून, आंतरराष्ट्रीय समुदायाने त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. इस्त्रायलच्या या पावलामुळे प्रादेशिक शांतता व स्थैर्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणि त्यामुळे कूटनीतिक तणाव आणखी वाढला आहे.