Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Blackout: ‘आमच्याकडे इंधन नाही!’ अखेर ‘या’ देशात झाले 22 तासांचे ‘महा-ब्लॅकआऊट’; ऊर्जा मंत्र्यांनी टीव्हीवर सांगितली हतबलता

Cuba Blackout:वीजपुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण देश अंधारात बुडाला आहे. ऊर्जा मंत्र्यांनी टीव्हीवर सांगितले की इंधन पूर्णपणे संपले आहे. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे २० ते २२ तास वीजपुरवठा खंडित होत होऊन जनजीवन विस्कळीत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 15, 2026 | 07:58 AM
cuba blackout energy crisis fuel shortage minister announcement 2026

cuba blackout energy crisis fuel shortage minister announcement 2026

Follow Us
Follow Us:
  • देश अंधारात
  • ऊर्जा मंत्र्यांची हतबलता
  • अमेरिकेचे निर्बंध

Cuba Blackout 2026 News : कॅरिबियन समुद्रातील एक छोटा पण सुंदर देश असलेला क्युबा (Cuba) सध्या इतिहासातील सर्वात मोठ्या ऊर्जा संकटाचा सामना करत आहे. राजधानी हवानासह देशातील प्रत्येक कोपरत सध्या अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, देशाचे ऊर्जा मंत्री व्हिसेंटे दे ला ओ लेव्ही यांना स्वतः टीव्हीवर येऊन जनतेला सांगावे लागले की, “आमच्याकडे आता इंधन शिल्लक नाही.” या एका वाक्याने संपूर्ण देशात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज २० ते २२ तास वीज नसल्यामुळे लोकांचे जगणे असह्य झाले असून, क्युबा आता कोसळण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे.

ऊर्जा मंत्र्यांची धक्कादायक कबुली

देशातील वीज पुरवठा विस्कळीत झाल्यानंतर ऊर्जा मंत्री व्हिसेंटे दे ला ओ लेव्ही यांनी थेट दूरचित्रवाणीवरून जनतेशी संवाद साधला. त्यांनी अत्यंत हतबलतेने सांगितले की, देशाकडे डिझेल आणि इंधन तेलाचा साठा आता शून्य झाला आहे. सध्या देशातील वीज यंत्रणा केवळ स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूवर ओढूनताणून चालवली जात आहे. मात्र, हे उत्पादन अत्यंत कमी असल्याने वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवणे अशक्य झाले आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारकडे सध्या कोणताही ठोस आराखडा नाही, ही वस्तुस्थिती मंत्र्यांनी मान्य केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : International Family Day: ‘घर असावे घरासारखे…’ आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन; जाणून घ्या नात्यांची वीण कशी जपायची?

अमेरिकेचे निर्बंध आणि कोसळलेली अर्थव्यवस्था

क्युबाच्या या परिस्थितीला तिथले सरकार अमेरिकेच्या कठोर आर्थिक धोरणांना जबाबदार धरत आहे. जानेवारी २०२६ मध्ये अमेरिकेने क्युबाला तेल पुरवठा करणाऱ्या जहाजांवर आणि कंपन्यांवर कारवाई करण्याची कडक चेतावणी दिली होती. या एका इशाऱ्यामुळे क्युबाला तेल पुरवणारे मुख्य स्रोत आटले आहेत. एकेकाळी क्युबाचा सर्वात मोठा आधार असलेला व्हेनेझुएला आता स्वतःच्या राजकीय अडचणीत आणि अमेरिकेच्या दबावात अडकल्याने त्याने तेल पुरवठा जवळजवळ बंद केला आहे. तसेच ‘पेमेक्स’ सारख्या मोठ्या पुरवठादारांनीही क्युबाकडे पाठ फिरवली आहे.

Security Alert: U.S. Embassy Havana, Cuba (May 14, 2026) Location: Cuba Event: Cuba’s national electrical grid is increasingly unstable. Prolonged scheduled and unscheduled power outages occur daily across the country, including in Havana. Outages affect water supply,… pic.twitter.com/ITkmHCUAAh — Embajada de los Estados Unidos en Cuba (@USEmbCuba) May 15, 2026

credit – social media and Twitter

जनजीवन ठप्प आणि रस्त्यांवर आक्रोश

वीज नसल्याचा सर्वाधिक फटका रुग्णालये आणि अत्यावश्यक सेवांना बसत आहे. व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचे प्राण वाचवणे कठीण झाले असून शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत, तर कारखाने ठप्प झाल्याने बेरोजगारीचे संकट उभे राहिले आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इंधनाअभावी थांबली आहे. या त्रासाला कंटाळून आता जनता रस्त्यावर उतरली आहे. हवानासह अनेक प्रमुख शहरांमध्ये लोक घोषणाबाजी करत आंदोलने करत आहेत. “आम्हाला वीज द्या, आम्हाला जगू द्या,” अशा आर्त हाका क्युबाच्या गल्लोगल्लीत ऐकू येत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Henley Passport Index: जगातील सर्वशक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर; पाकिस्तानची पुन्हा चेष्टा, भारताच्या क्रमवारीत मोठा फेरबदल

काय होणार क्युबाचे भविष्य?

स्थानिक पातळीवर निर्माण होणारे कच्चे तेल देशाची संपूर्ण गरज भागवण्यासाठी पुरेसे नाही. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर तेल पुरवठा पुन्हा सुरू होत नाही, तोपर्यंत हा ‘ब्लॅकआऊट’ संपण्याची चिन्हे नाहीत. अमेरिकेसोबतचे राजनैतिक संबंध सुधारल्याशिवाय क्युबाचा हा अंधार दूर होणे कठीण आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत क्युबाची जनता केवळ अंधारात बसून भविष्याची वाट पाहत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: क्युबामध्ये वीजपुरवठा किती काळ खंडित होत आहे?

    Ans: क्युबामध्ये इंधनाअभावी दररोज २० ते २२ तास वीजपुरवठा खंडित होत असून संपूर्ण जनजीवन ठप्प झाले आहे.

  • Que: या ऊर्जा संकटाचे मुख्य कारण काय आहे?

    Ans: अमेरिकेने तेल पुरवठादारांवर लादलेले कडक निर्बंध आणि व्हेनेझुएलाकडून येणाऱ्या तेलाचा पुरवठा थांबणे हे या संकटाचे मुख्य कारण आहे.

  • Que: क्युबाच्या ऊर्जा मंत्र्यांनी काय म्हटले आहे?

    Ans: ऊर्जा मंत्री व्हिसेंटे दे ला ओ लेव्ही यांनी स्पष्ट केले की देशाकडे डिझेल आणि इंधनाचा साठा पूर्णपणे संपला असून तात्काळ तोडगा मिळणे कठीण आहे.

Web Title: Cuba blackout energy crisis fuel shortage minister announcement 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 07:58 AM

Topics:  

  • America
  • Electricity Issue
  • World news

संबंधित बातम्या

Great Wall Of China : कशी फुटली चीनची सर्वात मजबूत प्रसिद्ध भिंत? 19 फूट खोल खड्ड्यामुळे चिनी सरकारने घेतला मोठा निर्णय
1

Great Wall Of China : कशी फुटली चीनची सर्वात मजबूत प्रसिद्ध भिंत? 19 फूट खोल खड्ड्यामुळे चिनी सरकारने घेतला मोठा निर्णय

US Foreign Direct Investment : 34 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज, तरीही अमेरिकेत गुंतवणूकीचा महापूर! परदेशी गुंतवणूकदार का लावताहेत डाव?
2

US Foreign Direct Investment : 34 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज, तरीही अमेरिकेत गुंतवणूकीचा महापूर! परदेशी गुंतवणूकदार का लावताहेत डाव?

North Korea POW Row : राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर दक्षिण कोरिया भडकला; सेऊलची युक्रेनकडे माफीची मागणी
3

North Korea POW Row : राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर दक्षिण कोरिया भडकला; सेऊलची युक्रेनकडे माफीची मागणी

Abraham Accords : इराणची नजर अमेरिकेवर असताना नेतान्याहू अबू धाबीत; जाणून घ्या इस्रायल आणि यूएईच्या गुप्त बैठकीचे गूढ काय?
4

Abraham Accords : इराणची नजर अमेरिकेवर असताना नेतान्याहू अबू धाबीत; जाणून घ्या इस्रायल आणि यूएईच्या गुप्त बैठकीचे गूढ काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.