Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

War Alert: आता युद्धाची वेळ! अमेरिकेच्या छातीवर रशिया आणि इराणचे ‘300’ ड्रोन तैनात; ट्रम्पचा क्युबाला थेट लष्करी कारवाईचा इशारा

क्युबाने रशिया आणि इराणकडून ३०० हून अधिक लष्करी ड्रोन खरेदी केले आहेत. एका अमेरिकी अहवालानुसार, या ड्रोनचा वापर ग्वांतानामो बे आणि अमेरिकी जहाजांना लक्ष्य करण्यासाठी केला जाऊ शकतो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 18, 2026 | 03:15 PM
cuba russia iran 300 drones threat us guantanamo bay trump action 2026

cuba russia iran 300 drones threat us guantanamo bay trump action 2026

Follow Us
Follow Us:
  • क्युबामध्ये ३०० विनाशकारी ड्रोन दाखल
  • अमेरिकी नौदल तळ धोक्यात
  • ट्रम्प प्रशासनाचा कडक इशारा

Cuba Russia Iran Drone Deal 2026 : जागतिक भू-राजकारणात सध्या अत्यंत खळबळजनक आणि तितकीच धोकादायक घडामोड समोर आली आहे. अमेरिकेचे कट्टर शत्रू मानले जाणारे रशिया आणि इराण (US-Israel Iran War) यांनी मिळून अमेरिकेला तिच्याच दारात घेरण्याची संपूर्ण तयारी केली आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या धक्कादायक अहवालानुसार, अमेरिकेच्या अगदी जवळ असलेल्या क्युबा या द्वीपकल्पीय देशाने रशिया आणि इराणकडून ३०० हून अधिक अत्याधुनिक आणि घातक लष्करी ड्रोन खरेदी केले आहेत. अमेरिकन न्यूज वेबसाईट ‘ॲक्सिऑस’ (Axios) ने दिलेल्या वृत्तामुळे वॉशिंग्टन आणि ट्रम्प प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली असून, हा अमेरिकेला एकाच वेळी अनेक बाजूंनी वेढण्याचा रशियन-इराणी प्लॅन असल्याचे बोलले जात आहे.

अमेरिकेचे ‘ग्वांतानामो बे’ आणि फ्लोरिडा थेट रडारवर!

गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केलेल्या भीतीनुसार, क्युबाने घेतलेले हे ‘कामीकाझे’ आणि अटॅक ड्रोन अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाने सज्ज आहेत. हे ड्रोन अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या क्युबातील ‘ग्वांतानामो बे’ (Guantanamo Bay) या अत्यंत महत्त्वाच्या नौदल तळाला, कॅरिबियन समुद्रातील अमेरिकन युद्धनौकांना आणि थेट फ्लोरिडाच्या ‘की वेस्ट’ (Key West) या किनारपट्टीच्या भागाला काही मिनिटांत उद्ध्वस्त करू शकतात. सर्वात चिंतेची बाब म्हणजे, क्युबाची राजधानी हवानामध्ये सध्या इराणचे लष्करी सल्लागार आणि ड्रोन तज्ज्ञ ठाण मांडून बसले आहेत. शत्रू देशांचे हे सैन्य थेट अमेरिकेच्या दारात पोहोचल्याने ट्रम्प प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Earthquake : चीनमध्ये लोक गाढ झोपेत असतानाच भूकंपाचा महाभयंकर प्रहार; हाँगकाँगही हादरले, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

क्युबाचा पलटवार: “हा लष्करी कारवाईसाठी अमेरिकेचा कट!”

या गंभीर आरोपांनंतर क्युबाचे परराष्ट्र मंत्री ब्रुनो रॉड्रिग्ज परिला यांनी अमेरिकेवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट लिहिले की, “अमेरिका पूर्णपणे खोटे आणि कपोलकल्पित आरोप करत असून, क्युबाविरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर शत्रुत्वाचे वातावरण निर्माण करत आहे.” क्युबाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या मते, अमेरिकेला क्युबावर अधिक कडक आर्थिक निर्बंध लादायचे आहेत आणि भविष्यात थेट लष्करी हल्ला करण्यासाठी अमेरिका अशा प्रकारची खोटी कारणे शोधत आहे. त्यांनी स्पष्ट केले की क्युबाला कोणत्याही युद्धाची इच्छा नाही, मात्र त्यांनी ड्रोन खरेदीच्या करारावर थेट नकार देण्याचे टाळले.

Sin excusa legítima alguna, el gobierno de #EEUU construye, día tras día, un expediente fraudulento para justificar la guerra económica despiadada contra el pueblo cubano y la eventual agresión militar. Medios de prensa específicos le hacen el juego, promoviendo calumnias y… — Bruno Rodríguez P (@BrunoRguezP) May 17, 2026

credit – social media and Twitter

ट्रम्प यांचा ‘क्युबा’वर कब्जा करण्याचा इशारा आणि वीजटंचाई

अमेरिका आणि क्युबा यांच्यातील संबंध गेल्या काही दशकांतील सर्वात वाईट टप्प्यावर पोहोचले आहेत. ट्रम्प प्रशासनाने क्युबाला कच्च्या तेलाचा पुरवठा करणाऱ्या देशांवर भारी शुल्क आणि निर्बंध लावण्याची खुली धमकी दिली आहे. अमेरिकेच्या या आर्थिक नाकेबंदीमुळे क्युबामध्ये भीषण वीजटंचाई निर्माण झाली असून संपूर्ण देश अंधारात बुडाला आहे. काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी “अमेरिका लवकरच क्युबावर लष्करी ताकदीने कब्जा करू शकते,” असे खळबळजनक विधान केले होते. त्यापाठोपाठ सीआयए (CIA) प्रमुख जॉन रॅटक्लिफ यांनी थेट क्युबाचा दौरा करून, “क्युबाने अमेरिकेच्या शत्रूंना (रशिया-इराण) आश्रय देणे थांबवावे, अन्यथा परिणाम वाईट होतील,” असा थेट इशारा दिला होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Oil Crisis 2026 : बाप रे! पेट्रोल-डिझेलचे रेशनिंग सुरू होणार? इराण युद्धामुळे 76 देशांमध्ये आणीबाणी जाहीर

१९६२ च्या ‘क्युबन मिसाईल क्राईसिस’ची पुनरावृत्ती होणार?

इतिहासतज्ज्ञ या संपूर्ण प्रकरणाची तुलना १९६२ मधील प्रसिद्ध ‘क्युबन मिसाईल क्राईसिस’शी (Cuban Missile Crisis) करत आहेत, जेव्हा सोव्हिएत युनियनने क्युबामध्ये आपल्या अण्वस्त्रांची तैनात केली होती आणि जग अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर उभे राहिले होते. आज अण्वस्त्रांची जागा इराण आणि रशियाच्या स्वस्त पण अत्यंत अचूक मारा करणाऱ्या ३०० ड्रोननी घेतली आहे. हा केवळ क्युबाचा अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न नसून, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि इराणचे सर्वोच्च नेते यांनी अमेरिकेला बॅकफूटवर आणण्यासाठी रचलेला हा एक आंतरराष्ट्रीय चक्रव्यूह आहे. आता ट्रम्प प्रशासन या दारात आलेल्या संकटाचा सामना कसा करते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Cuba russia iran 300 drones threat us guantanamo bay trump action 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • America
  • US-Israel Iran War
  • World War 3

संबंधित बातम्या

Marco Rubio: ‘ट्रम्प इराणला अणुबॉम्ब बनवू देणार नाहीत’; मार्को रुबियो यांनी आखली ‘लक्ष्मणरेषा’, क्षेपणास्त्रे-ड्रोनवरही मोठे विधान
1

Marco Rubio: ‘ट्रम्प इराणला अणुबॉम्ब बनवू देणार नाहीत’; मार्को रुबियो यांनी आखली ‘लक्ष्मणरेषा’, क्षेपणास्त्रे-ड्रोनवरही मोठे विधान

भारतीय कुस्तीपटूंच्या स्वप्नांना ब्रेक? अमेरिकेने व्हिसा नाकारल्याने U23 वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी खळबळ
2

भारतीय कुस्तीपटूंच्या स्वप्नांना ब्रेक? अमेरिकेने व्हिसा नाकारल्याने U23 वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी खळबळ

US-Iran War: 60% संवर्धित इंधन कशासाठी? अन्यथा युद्ध सुरूच राहणार…; जेडी व्हान्स यांच्या अटींनी युद्धात शांततेच्या आशांना धक्का
3

US-Iran War: 60% संवर्धित इंधन कशासाठी? अन्यथा युद्ध सुरूच राहणार…; जेडी व्हान्स यांच्या अटींनी युद्धात शांततेच्या आशांना धक्का

Nidal Malik Hasan: ‘अल्लाहू अकबर’ म्हणत 13 जणांची हत्या, 30 हून अधिक जखमी; ट्रम्प यांची निदाल हसनच्या फाशीला मंजुरी
4

Nidal Malik Hasan: ‘अल्लाहू अकबर’ म्हणत 13 जणांची हत्या, 30 हून अधिक जखमी; ट्रम्प यांची निदाल हसनच्या फाशीला मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.