'Deliberate massacre' At least three Palestinians killed by Israeli fire amid aid stampede
गाझा: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गाझामध्ये अन्न मिळवण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी जमली होती. या दरम्यान लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. यामुळे 3 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 46 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काहीजण बेपत्ता देखील झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, इस्रायलच्या सैनिकांनी अन्ना वाटपादरम्यान गोळीबार केल्याने लोक भीतीने सैरावर पळू लागले. यामुळे गर्दीत चेंगरुन लोकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले.
गाझाच्या राफा शहरात अमेरिकेच्या मदतीन चालवले जाणारे मदत केंद्राबाहेर ही घटना घडली. हे केंद्र गाझातील लोकांना पायाभूत सुविधांची मदत पुरवते. गाझाच्या राज्य कार्यालयाने यासंबंधी एक निवेदन जारी कले आहे. निवेदनात,आज राफामध्ये इस्रायली सैनिंकांनी अन्न वाटपादरम्यान गोळीबार केला. यामुळे लोकांमध्ये भागदौड झाली. यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४६ जखमी झाले आहेत. इस्रायली सैनिकांची ही कृती जाणूनबुजून केलेला हत्याकांड आणि थेट युद्ध गुन्हा आहे.
सध्या अमेरिकन निधीतून गाझातील लोकांना एका आठवड्यासाठी मदत पुरवली जात आहे. या काळात इस्रायलने अन्न वाटप करण्यासाठी वितरण केंद्र उभारले आहे. ही केंद्र इस्रायली सैनिकांच्या देखेरेखीखाली आहेत. तसेच नव्या व्यवस्थेअंतर्गत गाझाच्या लोकांना गाझा ह्युमॅनिटेरियन फाऊडेशन (GHF)द्वारे मदत केली जाणार आहे.
परंतु या योजनेवर जगभरातील मदत संस्थांकडून टीका केली जात आहे. संस्थांच्या म्हणण्यानुसार, मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. GHF चे कार्यालय स्वित्झर्लंडमध्ये आहे. हे माजी अमेरिकन मरीन जेक वुड्स यांच्याद्वारे चालवले जाते. परंतु संयुक्त राष्ट्रासंघाने या संस्थेसोबत काम करण्यास नकार दिला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून गाझामध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. गाझात इस्रायलच्या हल्ल्यांमुळे पायाभूत सुविधा देखील नष्ट झाल्या आहे. गाझातील लोकांना अन्नधान्याच्या कमतरतेमुळे उपासमारीचा सामाना करावा लागत आहे.
अनेक देशांकडून इस्रायलवर दबाव वाढत आहे. गाझातील कारवाया थांबवण्याचे इस्रायलकेड आवाहन केले जात आहे. परंतु इस्रायलच्या गाझामधील कारवाया सुरुच आहेत.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी, गाझात दुष्काळ पडू नये म्हणून आम्ही गाझाला मदत पुरवत आहोत, पण हमासविरुद्ध सुरु असलेल्या लष्करी कारवाया थाबणार नाहीत. गरजू लोकांसाठी मदत सुनिश्चित केली जाईल, पण हमासपर्यंत नाही.
दरम्यान पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने युद्धबंदीसाठी सहमती दर्शवली आहे. अमेरिकेने नवा प्रस्ताव मांडला आहे. याअंतर्गत 10 इस्रायली ओलिसांची सुटका आणि 70 दिवसांचा युद्धविराम करण्यात येणार आहे. पण अद्याप इस्रायलने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.