कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी आणि डोनाल्ड ट्रम्प (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अलीकडच्या काळात सतत चर्चेचा विषय राहिले आहे. एखादी गोष्ट त्यांना मिळवायची असेल तर ते ती मिळवतातच हे अलीकच्या काळात त्यांच्या काही निर्णयांवरुन दिसून आले आहे. दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा कॅनडाला अमेरिकेचा भाग बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी ट्रम्प यांनी कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यासमोर आणखी एक मोठा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
ट्रम्प टांनी कॅनडाला त्यांच्या १७५ अब्ज डॉलर्सच्या गोल्डन डोम क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीत सामील होण्याचे आवाहन केले आहे. यासाठी ट्रम्प कॅनडाला कोणतेही शुल्क देण्याची गरत नाही असे त्यांनी म्हटले आहे. पण ट्रम्प यांनी कॅनडासमोर एक अट ठेवली आहे. ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकेचा ५१ वा बाग बनवण्याची ऑफर ठेवली आहे.
ट्रम्प यांनी म्हटले की, मी कॅनडाला सांगितले की, त्यांचे राष्ट्र वेगळे राहिले तर त्यांना ६१ अब्ज डॉलर्स खर्च येईल, पण कॅनडा अमेरिकेचा ५१ वा भाग बनले तर त्यांना कोणाताही खर्च येणार नाही. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट करत कॅनडा या प्रस्ताववार विचार तरत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या या ऑफरला पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या कार्यालयाने ठामपणे नकार दिला आहे. कॅनडाच्या पंतप्रधान कार्यलायाने म्हटले आहे की, कॅनडा एक अभिमानी, स्वतंत्र देश आहे आणि आपल्या देशाच्या सार्वभौमत्वासाठी कोणतीही योजना सोडण्यास तयार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते, अमेरिकेची गोल्डन डोम प्रणाली ही त्यांना क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी आहे. यासाठी अंदाजे १७५ अब्ज डॉलर्स इतका आहे. जर कॅनडाला या प्रणालीचा भाग व्हायचा असेल तर त्यांना यासाठी पैसे द्यावे लागतील. पण अमेरिकेचा ५१ वा भाग बनल्यास कॅनडाला ही प्रणाली मोफत मिळेल.
दरम्यान ट्रम्प यांनी हा प्रस्ताव मांडतना कॅनडाच्या संरक्षण खर्चावर देखील टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, कॅऩाला त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवायचे असेल, तर त्यांना आर्थिक किंवा राजकीय या दोन्हीपैकी एकच मार्ग निवडावा लागले.
कॅनडा आणि अमेरिका आधीपासूनच नॉर्थ अमेरिकन एअरोस्पेस डिफेन्स कमांड (NORAD ) वर एकत्रितपणे कार्य करत आहे. NORAD च्या आधुनिकिकरणासाठी आणि राज्याच्या उत्तरी बागात संरकक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी ऑस्ट्रेलियासोबत ६ अब्ज डॉलर्सचा खर्च केला आहे.
कॅनडाने ट्रम्प यांचा प्रस्ताव नाकारला असून कोणतीही सहकार्य संरक्षण चर्चा ही परस्पर चर्चेवरच होईल असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे.