Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोनाल्ड ट्रम्प यांचं पितळ पडलं उघडं; रशियाशी व्यापारावर प्रश्न विचारताच उडाला चेहऱ्याचा रंग

Donald Trump News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत कोणत्या ना कोणत्या विषयावरुन चर्चेचा विषय बनलेले असतात. सध्या ते रशियाशी अमेरिकेच्या व्यापारावरुन चर्चेचा विषय ठरले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 06, 2025 | 03:18 PM
Did Trump Get Trapped by India’s Russia Trade Nikki Haley Warns US Not to Break Ties with India

Did Trump Get Trapped by India’s Russia Trade Nikki Haley Warns US Not to Break Ties with India

Follow Us
Close
Follow Us:
  • डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिका आणि रशियाच्या व्यापार संबंधावर कोणतीही माहिती नाही.
  • तसेच ट्रम्प यांच्या चीनला टॅरिफमधून सूट आणि भारतावर टॅरिफवर निक्की हेली यांनी टीका केली आहे.
  • सध्या रशियाशी व्यापार हा मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे.

Donald Trump News Marathi : वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारताला रशियाशी व्यापार थांबवण्यास सांगितला आहे, यावर भारताने पलटवार करत अमेरिका स्वत:हा रशियाशी व्यापार करत असताना त्याने भारताला सल्ला देऊ नये असे म्हटले आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना ट्रम्पच्या चेहऱ्याचा रंग उडाला आहे. अमेरिका रशियाशी (Russia) व्यापार करतो यावर त्यांना कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले, यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

भारताच्या म्हणण्यानुसार, अमेरिका (America) रशियाकडून युरेनियम आणि इतर खते आयात करतो. दरम्यान यावर ट्रम्प यांना प्रश्न विचारला असता त्यांची भंबेरी उडाली आहे. ट्रम्प यांना रिपब्लकन नेत्या निक्की हेली यांनी ट्रम्प यांना भारताशी संबंध न बिघडवण्याचा सल्लाही दिला आहे.

ट्रम्प यांना भारताच्या उत्तरावर विचारण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी अमेरिका रशियाकडून किती आणि कशाचा व्यापार करतो याची माहिती नसल्याचे म्हटले. याची चौकशी त्यांना करावी लागले असे ट्रम्प यांनी सांगितले.

Pakistan News : पाकिस्तानामध्ये राजकीय गोंधळ! इम्रान खानच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले PTI कार्यकर्ते

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक दिवस आधी ट्रम्प यांनी भारतावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे, यामुळे रशियाला युक्रेनविरुद्धच्या युद्धात मदत मिळत आहे. तसेच भारत हे तेल आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये मोठ्या नफ्यासह विकत आहे. यावर भारताने देखील चोख उत्तर दिले होते. भारताने स्पष्ट केले होते की, अमेरिकेचे सर्व आरोप निराधार आणि चुकीचे आहेत. तसेच परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले होते की, भारताचे रशियाशी (Russia) व्यापार संबंध केवळ स्वतंत्र आणि राष्ट्रीय हिताचे आहेत.

तसेच त्यांनी सांगितले की,  अमेरिका रशियाकडून युरेनियम, पॅलेडियम आणि इतर खते आयात करते. यामुळे अमेरिकेची भारतावरील टीका अयोग्य आहे. शिवाय पूर्वी ट्रम्प यांनी स्वत:हा भारताला जागतिक बाजारपेठांमध्ये स्थिरता निर्माण करण्यासाठी रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्यास सांगितले होते. यामुळे भारत आपले राष्ट्रीय हित आणि आर्थिक सुरक्षितता जपण्यासाठी स्वतंत्र पावले उचलत राहिले असे स्पष्ट करण्यात आले.

निक्की हेली यांचा ट्रम्प यांना सल्ला

याच वेळी अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनी ट्रम्प यांच्या विधानाविर तीव्र टीका केली आहे. हेली यांनी ट्रम्प यांच्या भारतावर अशा विधानांमुळे अमेरिका-भारत संबंध बिघडू शकतात असे त्यांनी म्हटले आहे. याच वेळी दुसरीकडे ट्रम्प यांनी चीनला करातून सूट दिली आहे. यावर हेली यांनी शत्रू देशांना सवलती न देता भारतासारख्या मित्राशी संबंध बनवून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी ट्रम्प प्रशासनाच्या दुतोंडी धोरणांवरही टीका केली आहे.

India should not be buying oil from Russia. But China, an adversary and the number one buyer of Russian and Iranian oil, got a 90-day tariff pause. Don’t give China a pass and burn a relationship with a strong ally like India. — Nikki Haley (@NikkiHaley) August 5, 2025


भारत देईना डोनाल्ड ट्रम्प यांना भाव! एकीकडे धमकी सत्र सुरु असताना अधिकाऱ्यांची रशिया वारी

Web Title: Did trump get trapped by indias russia trade nikki haley warns us not to break ties with india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2025 | 03:13 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Russia
  • World news

संबंधित बातम्या

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 
1

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी
2

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा
3

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
4

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.