भारत देईना डोनाल्ड ट्रम्प यांना भाव! एकीकडे धमकी सत्र सुरु असताना अधिकाऱ्यांची रशिया वारी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
India Russia Relations : नवी दिल्ली/मॉस्को : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल (Ajit Doval) सध्या रशियाच्या (Russia) दौऱ्यावर गेले आहे. त्यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रशियाकूडने तेल खरेदीमुळे भारतावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादण्याची धमकी देत आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या दौऱ्यादरम्यान डोवाल रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. तसेच राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन(Vladimir Putin) यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे.
रशियाच्या सरकारी माध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित डोवाल यांचा हा दौरा रशिया आणि भारताच्या धोरणात्मक संबंधांना मजबूत करण्यासाठी होत आहे. हा दौरा अतिशय नाजूक परिस्थितीत होत आहे.
Russia Ukraine War : युक्रेन युद्ध थांबण्यासाठी आज होणार चर्चा? रशिया आणि अमेरिका येणार आमने-सामने
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) भारतावर रशियाकडून तेल खरेदी करण्यावरुन नाराज आहेत. त्यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहे. ट्रम्प यांच्या मते, भारत रशियाकडून तेल खरेदी करुन जागतिक बाजारपेठांमध्ये मोठ्या किमतीमध्ये विकत आहे. शिवाय यामुळे रशियाला युक्रेनविरुद्धच्या युद्धामध्ये अप्रत्यक्ष मदत पुरवत आहे.
भारताला युक्रेनमध्ये लोक मरत आहेत याची कोणतीही पर्वा नाही, परंतु आम्हाला आहे. यामुळे भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवली पाहिजे. भारताने रशियाशी व्यापार न थांबवल्यास भारीभरक टॅरिफ लागू करणार असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी येत्या २४ तासांत भारतावरील कर २५% पेक्षा अधिक वाढवण्याची धमकी दिली आहे.
याच वेळी ट्रम्प यांनी रशियाला ८ ऑगस्टपर्यंत युद्धबंदी लागू करण्याचा अल्टीमेटम दिला आहे. याअंतर्गत आज मॉस्कोमध्ये क्रेमलिनचे अधिकारी आणि अमेरिकेचे प्रतिनिधी स्टीव्ह वीटकऑप यांच्यात चर्चा होणार आहे. मात्र अद्याप रशियाकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान ट्रम्प यांनी युद्धबंदी लागू न झाल्यास रशियावरील निर्बंध कडक करण्याची धमकीही दिली आहे.
अजित डोवाल यांचा हा दौरा अतिशय तणावपूर्ण परिस्थितीत होत आहे. यामुळे हा दौरा अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे. या दौऱ्याचा उद्देश भारत आणि रशियामध्ये सुरक्षा संबंधांना अधिक मजबू करणे आहे. यादरम्यान प्रादेशिक तणावावर चर्चा होणार आहे. तसेच रशियाच्या तेल खरेदीवरीही चर्चा होणार आहे.
या दौऱ्यादरम्यान अजित डोवाल रशियासोबत संरक्षण करारावरही चर्चा करणार आहेत. भारत रशियाकडून S-400 सरंक्षण प्रणालीची खरेदी करणार आहे. यासाठी सुमारे ४० हजार कोटींचा करार करम्यात आला आहे. या संरक्षण प्रणालीची डिलिव्हरी ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.