
UK submarine deployment
इराणच्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर ब्रिटन(UK) ने अरब समुद्रात आपली अण्वस्त्रधारी पाणबुडी HMS Anson तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय माध्यांमानी दिलेल्या वृत्तानुसार, युद्ध अधिक पेटले आहे. तसेच सध्या अमेरिकेची स्थिती कमकुवत होत आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रिटनने अमेरिकेला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनची ही पाणबुडी थेट इराणवर हल्ला करु शकते असे म्हटले आहे.
याशिवाय ब्रिटनने शुक्रवारी(२० मार्च) अमेरिकेला त्यांच्या ताळांचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. ज्यामुळए इराणच्या तळांना उद्ध्वस्त करणे अमेरिकेला सोपे जाणार आहे. सुरुवातील कोणत्याही लष्करी कारवाईत सहभाग घेण्यास ब्रिटनने नकारल दिले होता. मात्र डिएगो गार्सियावरील हल्ल्यानंतर स्टारमर यांनी आपल्या भूमिकेत बदल केला आहे.
इराणने पश्चिम आशियातील ब्रिटनच्या मित्रराष्ट्रांवर हल्ले केल्याने ब्रिटनने अमेरिकेला खुली साथ दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटीश नौदल अत्याधुनिक अणु पाणबुडी घेऊन ऑस्ट्रेलियातील पर्थ येथून अरब सागराकडे ५,५०० मैलांचा प्रवास करत उत्तर अरबी समुद्रात दाखल झाली आहे. ब्रिटनची ही पाणबुडी टोमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांनी सज्ज असून दर २४ तासांना एकदा समुद्राच्या पृष्ठभागावर येते.
इराणने पहिल्यांदाचा ४,००० किलोमीटर लांब असलेल्या डिएगो गार्सिया या ब्रिटिश-अमेरिकन लष्करी तळाला लक्ष्य केले. यामध्ये इराणने दोन लांब पल्ल्यांची बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागली होती. यातील एक क्षेपणास्त्र हवेतच निकामी झाले. तर दुसरे क्षेपणास्त्र अमेरिकेच्या ‘SM-3’ इंटरसेप्टरने पाडले. इराणची क्षेपणास्त्र झेप २,००० किमीच्या मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याचे चित्र दिसून आले आहे.
इराणने केलेल्या या हल्ल्यामुळे लोक थक्क झाले आहे. इराणने इशारा दिला आहे की, ब्रिटनच्या तळांचा वापर त्यांच्यावर हल्ल्यासाठी झाल्यास त्याला थेट इराणविरोधात आक्रमण मानले जाईल. यामुळे सध्या ब्रिटन युद्धात उतरणार का याबाबत अनिश्चितता मात्र आहे. मध्यपूर्वेतील ब्रिटनची लष्करी तळे इराणच्या निशाण्यावर आहेत.
Ans: इराणच्या डिएगो गार्सिया या लष्करी तळावरील हल्ल्यानंतर आणि मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनने आपली घातक अणु पाणबुडी अरब सागरातील आपली लष्करी उपस्थिती मजबूत करण्यासाठी आणि संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी ही तैनात केली आहे.
Ans: मध्यपूर्वेतील तणावामुळे जागतिक तेलाच्या किमती वाढणे, व्यापार मार्गांवर परिणाम, आणि जागतिक सुरक्षा तणाव वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Ans: इराणने इशारा दिला आहे की, ब्रिटनच्या तळांचा वापर त्यांच्यावर हल्ल्यासाठी झाल्यास त्याला थेट इराणविरोधात आक्रमण मानले जाईल.