
फोटो सौजन्य सोशल मीडिया
एवढ्या दिवस सुरु असलेल्या युद्धामध्ये कोण जिंकले आणि कोण हारले हे नेमके सांगता येत नाही . काही जाणकारांच्या मते इराण वरचढ ठरला तर काहींची मते उलटी आहेत . पण कमजोर समजल्या जाणाऱ्या इराण ला ट्रम्प आणि नेतन्याहू मिळून हरवू शकले नाहीत . हे मान्य करावे लागेल .
थोड्या काळासाठी इराण अमेरिका यांनी एकमेकांवरचे हल्ले शिथिल केल्यानंतर युद्ध शांत झाल्यासारखे वाटले . पण शांतता ही मोठ्या वादळाचे संकेत देत असते . याप्रमाणे आंतरराष्ट्रीय वर्तुळात ही शांतता अमेरिका इराण वरील एका मोठ्या हल्ल्याच्या तयारीसाठी वापरत आहे .
अमेरिका आता थेट इराणशी जमिनीवरील युद्ध करू शकते . अशा चर्चा सुरु झाल्या आहेत पण याउलट इराण ही याच शांततेच्या काळात आपल्या सैन्याची ताकद वाढवत आहे . इराण ने आपली सैन्य संख्या आता जवळपास ४ लाखांपर्यंत नेह्ल्याचे इराणकडून सांगितले जात आहे . याची प्रचिती गेल्या काही दिवसांत इराण ने तेहरान मधील नागरिकांना युद्ध प्रशिक्षण आणि सराव मोहीम हाती घेऊन जगाला करून दिली .
यात पुरुषांबरोबर महिलाही अग्रेसर असल्याच्या दिसल्या आहेत . इराण आता जमिनीवरील हल्ला झाला तर त्याला प्रतिकार करण्यासाठी सज्ज होत आहे . आर्थिक नाकेबंदी करून , आकाशातील युद्ध करून पण इराणवर विजय मिळवता न आल्याने जमिनीवरचा घातक प्रकार अमेरिका इस्रायल निवडणार का यावर पुन्हा एकदा जगाचे लक्ष लागले आहे . यामुळे मध्य पूर्व पुन्हा पेटणार कि नाही हे पहावे लागेल .
इराण ने एक सूचना जाहीर केली आहे कि जर अमेरिका आता इराणवर जोरदार हल्ला करेल तर मध्य पूर्वेत ज्यांनी ज्यांनी अमेरिकेला आपली जमीन वापरण्यास दिली आहे . ज्या देशाच्या जमिनीवर अमेरिकेने आपले सैन्य स्थळ बनवून हल्ले केले आहेत . त्या देशांवर आणि अमेरिकेच्या सैन्य स्थळांवर जोरदार हल्ले होतील म्हणजे ,समजा जेथून एक मिसाईल इराणवर आली अगदी तिथेच इराण कडून तीन मिसाईल्स पुन्हा येतील . हे लक्षात ठेवावे .
काल रात्री युक्रेनने रशियाच्या तेल साठ्यावर हल्ला केला . तब्बल १६०० ड्रोन्स मॉस्कोवर सोडण्यात आले . यावर उत्तर म्हणून रशियाने सुद्धा युक्रेन आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे . तेव्हा हे सुरु असतानाच हुतींनी सौदीच्या तेल पाइपलाईनवर हल्ला करून उध्वस्त केली आहे . यावर युरोपला होणार तेलाचा पुरवठा एका आठवड्यासाठी बंद करण्यात आला आहे .
तसेच हुतींनी बाब अल मंदेब मध्ये ( लाल समुद्रात ) सौदीला पूर्णपणे बंदी केल्याने तो मार्ग ही बंद झाला आहे . आणि होर्मूझ तर बंदच आहे . अश्या सगळ्या परिस्थीवर अमेरिकेतील JP मॉर्गन बँकेने जाहीर केले आम्हाला माहीतच नाही कि हे युद्ध कधी बंद होईल आणि जागतिक तेल व्यवसाय पुन्हा पूर्वीसारखा सुरु होईल . त्यामुळे ट्रम्प यांच्या बेभरवशी वागण्याला कधी आळा बसेल यावर सगळे लोक लक्ष ठेवून आहेत .