Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Donald Trump यांच्या हत्येचा डाव पुन्हा हुकला; यापूर्वी यमसदनी पाठवण्याचे ‘हे’ मास्टरप्लॅन

Trump Assassination Attempt : ट्रम्प यांच्या हत्येचा पुन्हा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यांच्यावर वॉशिंग्टन येथील एका कार्यक्रमात गोळीबार झाला आहे, सुदैवाने सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे त्यांचे प्राण बचावले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 26, 2026 | 11:37 AM
Trump Assassination Attempt

Trump Assassination Attempt

Follow Us
Follow Us:
  • दोन वर्षात दोन वेळा हल्ला
  • वादग्रस्त डोनाल्ड ट्रम्पला यमसदनी पाठवण्याचा पुन्हा हुकला चान्स
  • काय घडलं होतं यापूर्वी?
Donald Trump Assassination Attempt :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donad Trump) यांच्यावर पुन्हा एकदा प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. शनिवारी(२५ एप्रिल) रात्री उशिरा वॉशिंग्टन येथील एका हॉलेलमध्ये डिनरदरम्यान त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. सुदैवाने सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षातील ट्रम्प यांच्यावरील हा दुसरा सर्वात मोठा हल्ला असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Gaza Elections : गाझात नवा सुर्योदय! तब्बल २० वर्षानंतर पार पडले मतदान; लोकशाहीचा उदय होणार?

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प वॉशिंग्टन येथील हिल्टन हॉटेलमध्ये व्हाईट हाऊस कॉरकस्पोंडेंट्स डिनर गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत मेलानिया ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांच्यासह मंत्रिमंडळही उपस्थित होते. यचा दरम्यान हल्लेखोराने हॉटेलच्या मुख्य दरवाजाजवळील सुरक्षा यंत्रणेकडे धाव घेत घुसण्याचा प्रयत्नव केला. परंतु एका सुरक्षा रक्षकाने त्याला तातडीने रोखले. यामुळे हल्लेखोराने सीक्रेट सर्व्हिसच्या एका अधिकाऱ्यावर गोळीबार केला. सुदैवाने अधिकाऱ्याने बुलेटप्रूफ जॅकेट घातले होते, ज्यामुळे त्याचे प्राण बचावले.

तसेच सीक्रेट सर्व्हिस अधिकाऱ्यांनी तातडीने अध्यक्ष ट्रम्प यांच्यासह सर्व प्रमुख व्यक्तींना सुरक्षितपणे बाहेर काढले आणि सुरक्षित स्थळी हलवले. यामुळे मोठा अनर्थ टळला. यानंतर तातडीने रक्षकांनी त्याला जमिनीवर पाडत अटक केली.

यापूर्वीही झाले होते हल्ले

हा ट्रम्प यांचा जीवे मारण्याचा दुसरा प्रयत्न होता. यापूर्वी ट्रम्प यांच्यावर १३ जुलै २०२४ मध्ये पेनसिल्व्हेनिया येथील एका निवडणूक रॅलीदरम्यान गोळीबार करण्यात आला होता. मात्र यावेळी एक गोळी त्यांच्या कानाला स्पर्श करुन गेली आणि त्यांचे प्राण थोडक्यात बचावले. अवघ्या दोन वर्षात हा दुसरा सर्वात मोठा हल्ला असून यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ माजली आहे.

या हल्ल्याच्या दोन महिन्यांतर, सप्टेंबर २०२४ मध्ये ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. मार-ए-लागो येथील गोल्फ कोर्सजवळ एक संशयिताने सशस्त्रांसह घुसखोरी केली होती. यावेळी देखील ट्रम्प थोडक्यात बचावले होते. यापूर्वी २०१६ मध्येही एका निवडणूक रॅलीत त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता.

वादग्रस्त वक्तव्य अन् निर्णय..

ट्रम्प त्यांच्या आक्रमक निर्णयांसाठी आणि वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर त्यांनी अनेक आक्रमक निर्णय घेतले आहेत. यातील आंतरराष्ट्रीय निर्णयांमुळे विशेष करुन इराणशी युद्धामुळे त्यांच्याविरोधात असंतोष पाहायला मिळत आहे. तसेच त्यांच्या इमिग्रेशन आणि परराष्ट्र धोरणांविरोधातही लोक रस्त्यावर उतरले आहेत. अमेरिकेतील नागरिकांनी देखील ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेला विरोध केला आहे.

या घटनेनंतर जागतिक स्तरावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह जगभरातील अनेक नेत्यांनी हिंसाचाराचा निषेध केला आहे. हिंसेला लोकशाहीत स्थान नाही, अशा शब्दात मोदींनी विरोध केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.

कोण आहे ॲलन? ज्याने Donald Trump यांच्यावर केला गोळीबार, तरुणाला सुरक्षा रक्षकांनी घेतलं ताब्यात, VIDEO

💡

Frequently Asked Questions

  • Que: ट्रम्प यांच्यावर किती वेळा हल्ले झाले आहेत?

    Ans: ट्रम्प यांच्यावर जवळपास चार ते पाच वेळा हल्ले झाले आहेत.

  • Que: ट्रम्प यांच्यावर यापूर्वी कधी झाले होते हल्ले?

    Ans: ट्रम्प यांचा जीवे मारण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला आहे. २०२४ मध्ये पेनसिल्व्हेनिया येथील एका निवडणूक रॅलीत ट्रम्प यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती. तर या हल्ल्याच्या दोन महिन्यानंतरही त्यांच्या गोल्फ क्लबमध्ये घुसखोरीचा प्रयत्न झाला होता. याशिवाय २०१६ आणि २०१७ मध्येही ट्रम्प यांच्यावर हल्ले झाले होते. सुदैवाने या सर्व हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले आहेत.

Web Title: Donald trump assassination plot foiled again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • World news

संबंधित बातम्या

US Issues Alert: मध्य पूर्वेतील परिस्थितीचा भीषण उद्रेक, अमेरिकेकडून आपत्कालीन सुरक्षा सूचना जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
1

US Issues Alert: मध्य पूर्वेतील परिस्थितीचा भीषण उद्रेक, अमेरिकेकडून आपत्कालीन सुरक्षा सूचना जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Yemen Civil War : येमेनमध्ये पुन्हा हिंसेचा भडका! सरकारी सैन्य अन् हुथी बंडखोरांमध्ये भीषण युद्ध; 24 तासांत 44 ठार
2

Yemen Civil War : येमेनमध्ये पुन्हा हिंसेचा भडका! सरकारी सैन्य अन् हुथी बंडखोरांमध्ये भीषण युद्ध; 24 तासांत 44 ठार

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू
3

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच
4

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.