Gaza Elections : गाझात नवा सुर्योदय! तब्बल २० वर्षानंतर पार पडले मतदान; लोकशाहीचा उदय होणार? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
युद्धात होरपळले बालपण! चिमुकल्यांचा मरणाचा खेळ पाहून तुमचेही हृदय पिळवटेल, Video Viral
२७ ऑक्टोबर २०२३ रोजी सुरु झालेल्या इस्रायल-हमास युद्धा(Israel Hamas War) मुळे आणि सततच्या हल्ल्यांमुळे गाझाच्या अनेक भागातील पायाभूक सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे कमी नुकसान बाधित असलेल्या दीर अल-बलाह शहरात निवडणुकीचे आयोजन करण्यात आले. पॅलेस्टिनी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ७० हजार नोंदणीकृत मतदार असून दिवसभर मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
याच वेळी गाझापट्टीजवळी वेस्ट बँक येथेही स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. विशेष म्हणजे दोन्ही निवडणुका अत्यंत शांततेत पार पडल्या. संपूर्ण पॅलेस्टिनी क्षेत्रात एकूण १८३ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान पार पडल्या असून १३ लाख नागरिक मतदानासाठी पात्र होते. गाझात वीज टंचाई आणि सुरक्षेच्या कारणास्तव ५ वाजेपर्यंतच मतदान सुरु होते, तर वेस्ट बँकेत रात्री ८ वाजेपर्यंत लोकांनी मतदानात सहभाग घेतला होता.
Palestinians are voting in Gaza’s first municipal elections in 21 years. Around 70,000 people are registered to vote, with councils elected through a list system requiring female representation, as residents attempt to restore local governance despite ongoing Israeli attacks. pic.twitter.com/1tFXqsiHmg — Al Jazeera English (@AJEnglish) April 25, 2026
महत्त्वपूर्ण बाब म्हणजे या निवडणुकीत एकूण ३२१ मतदार याद्यांची नोंद होती. प्रत्येक गटांत १५ उमेदवारांमध्ये किमान ४ महिलांचा सामावेश अनिवार्य करण्यात आला होता. यामुळे महिला सहभागाला प्रोत्साह मिळाले. हमास (Hamas) ने या निवडणुकीचे समर्थन करत विकासासाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले. तसेच भविष्यात संपूर्ण गाझात अशा निवडणुका घेतल्या जातील याचेही संकेत दिले.
गेल्या २० वर्षांपासून गाझात इस्रायल-हमास युद्ध सुरु आहे. यामुळे गाझा पट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून लोकांना पायाभूत सुविधा मिळणे देखील कठीण आहे. शिवाय राजकीय अस्थिरतेचाही सामाना लोकांना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत गाझावासीयांसाठी मतदान केवळ निवडणूक नसून जगण्याची नवी आशा आहे. गाझातील मतदारांना आपली प्रतिक्रिया देत म्हटले की, आम्ही अनेक वर्षे निवडणुकीबद्दल केवळ ऐकले होते, पण आज मतदानाचा अधिकार प्रत्यक्षात बजावला असून आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
गाझा ते इराण…. Trump-Netanyahu यांच्यात तीन तास चर्चा; बंद दाराआड नेमकं काय घडलं?
Ans: गाझात तब्बल दोन दशके म्हणजेच जवळपास २० वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान पार पडले आहे.
Ans: हमासने या निवडणुकीचे समर्थन करत विकासासाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले. तसेच भविष्यात संपूर्ण गाझात अशा निवडणुका घेतल्या जातील याचेही संकेत दिले आहेत.






