कोण आहे ॲलन? ज्याने Donald Trump यांच्यावर केला गोळीबार, तरुणाला सुरक्षा रक्षकांनी घेतलं ताब्यात, VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, पहिल्या महिला लेडी मेलिनायि ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ हिल्टन हॉटेलमध्ये व्हाईट हाऊस कॉरकस्पोंडेंट्स डिनरसाठी उपस्थित होते. यावेळी ही घटना घडली, सुदैवाने सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. अध्यक्ष ट्रम्प यांच्यासह सर्व प्रमुख व्यक्तींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेनंतक सुरक्षा दलांनी तातडीने हल्लेखोराला ताब्यात घेतले असून तपास सुरु करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, युनायटेड स्टेट्स सीक्रेट सर्व्हिसने तातडीने कारवाई करत हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. हल्लेखोराची ओळख ३१ वर्षीय, कोल थॉमस ॲलन अशी पटवण्यात आली आहे. हा तरुण मूळचा कॅलिफोर्नियाचा रहिवासी असून व्यवसायाने इंजिनिअर आहे. धक्कादायक बाब म्हणजेतो हिल्टन हॉटेलमध्ये पाहुणा म्हणून आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने हॉटेलच्या मुख्य दरवाजाजवळील सुरक्षा यंत्रणेकडे धाव घेत घुसण्याचा प्रयत्नव केला. यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखले. यामुळे हल्लेखोराने सीक्रेट सर्विहसच्या एका अधिकाऱ्यावर गोळी धाडली. संबंधित अधिकाऱ्याने बुलेटप्रूफ जॅकेट घातले होते, ज्यामुळे त्याचे प्राण थोडक्यात बचावले. यानंतर तातडीने रक्षकांनी त्याला जमिनीवर पाडले आणि अटक केली. त्याची झडती घेतल्यास त्याच्याकडे, शॉटगन, हँडग आणि अनेक चाकू सापडले आहे. सध्या या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. हल्लेखोराचा नेमका काय हेतू होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेने संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान ट्रम्प यांनी या घटनेवर सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एका पोस्टमध्ये सीक्रेट सर्विहसच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. तसेच आरोपीचा फोटो आणि सीसीटीव्ही फुटेजही शेअर केला आहे. त्यांनी म्हटले की, सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत धाडसाने आणि जलद कारवाई केली. यानंतर कार्यक्रम सुरुच ठेवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
🇺🇸 Reported image of the White House Correspondents Dinner shooter. pic.twitter.com/71lIDTDtXu — Commentary: Trump Truth Social Posts On X (@TrumpTruthOnX) April 26, 2026
Ans: मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्यावर एका कार्यक्रमात गोळीबार करण्यात आला असून संशियाताचे नाव कोल थॉमस ॲलन असे त्याची ओळख पटवण्यात आली आहे. ३१ वर्षीय ॲलन हा मूळचा कॅलिफोर्नियाचा रहिवासी आहे. ॲलन व्यवसायाने इंजिनियर आहे.
Ans: अमरिकेचे राजधानी वॉशिग्टंन येथील हिल्टन हॉटलमध्ये व्हाईट हाऊस कॉरकस्पोंडेंट्स डिनरदरम्यान ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला. हल्लेखोराने मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा अधिकाऱ्यांच्या दिशेने धाव घेत एका सीक्रेट सर्विहस अधिकाऱ्यावर हल्ला केला. त्याला तातडीने ताब्यात घेण्यात आले आहे.
Ans: सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्यावर हल्ला करणाऱ्याकडून चाकू आणि शॉटगन, एक हँडगन जप्त करण्यात आले आहेत.






